आमदार संग्राम जगताप होणार अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर:  राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाल्यावर या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर नागपूरचे हिवाळी अधिवेशन या मंत्रिमंडळाने पार पाडले. या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे सुतोवाच आघाडीच्या नेत्यांनी केले होते. त्यामुळे आता त्याचे वेध लागले आहेतज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, … Read more

कचरामुक्त शहरासाठी विद्यार्थी, पालकांमध्ये जागृती करावी – महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- माझे शहर स्वच्छ व सुंदर असले पाहिजे, अशी मानसिकता सर्वांनीच तयार करणे आवश्यक आहे. शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक हे नवीन पिढी घडविण्याचे महत्वाचे काम करतात. त्यांनी विद्यार्थ, पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिल्यास जनजागृती होईल. शहर कचरामुक्त होण्यासाठी शाळांचे व शिक्षकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. … Read more

कारागृहातून पळून जाण्यासाठी कैद्याने उचलले हे धक्कादायक पाऊल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- शहरातील उपजिल्हा कारागृहाच्या स्वयंपाक घरातील चाकू हातात घेऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या पावलस कचरू गायकवाड या बंदीने बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जखमी महिला पोलिस कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात महिला पोलिस … Read more

प्लॅस्टिक बंदीला अडथळा आणणाऱ्या दोन बड्या व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर : बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांमार्फत सुरू असलेल्या कारवाई मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी कापड बाजारातील दोन व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.17) कापडबाजारात मनपा कर्मचार्‍यांना कारवाईस मज्जाव करुन हालकून लावण्यात आले होते. दरम्यान, मनपाच्या कठोर कारवाईमुळे … Read more

आ. संग्राम जगताप यांनी विधानसभेत केली ही मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जकात व त्यानंतर एलबीटी बंद झाल्यामुळे महापालिकांना स्वउत्पन्नाचे आर्थिक स्रोतच राहिलेले नाहीत. त्यामुळे १५ वर्षात निर्माण झालेल्या “ड” वर्ग महापालिका सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत. या महापालिकांमध्ये विकासकामे सोडा, कर्मचार्‍यांचे पगार व पथदिवे आणि पाणी योजनांचे विजबील भरणेही अवघड झाले आहे. त्यामुळे राज्यशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन … Read more

या दिवशी ठरणार अहमदनगर जिल्हापरिषदेचा नवा अध्यक्ष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण बसणार याचा फैसला होणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 31 डिसेंबर रोजी होणार आहे. महसूलच्या उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकरी असून,  स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते. पंचायत राज व्यवस्थेत महत्वाची … Read more

वाडियापार्क गाळेधारकांचे पुनर्वसन करणे गरजेचे : संभाजी कदम

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या पार्किंगच्या जागेवर उभारलेली ‘बी’ इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली आहे. याठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायीक हे बेरोजगार होणार नाही याची काळजी घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याशी केली आहे. येथील वाडियापार्कमधील बी बिल्डींग पाडण्याची कारवाई महापालिकेने … Read more

आनंदाची बातमी : तर भविष्यात अहमदनगरमध्येही धावणार बुलेट ट्रेन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- सध्या देशात अनेक ठिकाणी बुलेट ट्रेनचे काम सुरू असून, नगर शहरासाठी भविष्यात बुलेट ट्रेनची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले आहे. जलयुक्त शिवार योजना शहरात सुरू करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या असे सांगतानाच जिल्हा नियोजन समितीतून शहरातील आमदारांना शहर विकासासाठी निधी देण्यात यावा, अशी … Read more

आता अहमदनगरचे बसस्थानकही गेले खड्ड्यात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- कायम वर्दळीचे आणि गजबजलेले स्थानक म्हणून माळीवाडा बसस्थानकाची ओळख आहे. मात्र स्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसते. मध्यवर्ती ठिकाण असल्याने दररोज शेकडो बसगाड्यांची आणि हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. अलीकडेच झालेल्या पावसाचा जसा शहरातील रस्त्यांना फटका बसला, तसाच तो बसस्थानकांनाही बसला आहे. डांबरीकरण आणि सिमेंटचे ब्लॉक बसविण्यात … Read more

अशोक लांडे खून प्रकरणातील या आरोपीस जामीन मंजूर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /अहमदनगर :- बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या अमोल भानुदास कोतकर याला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे. लॉटरी विक्रेता लांडे याच्या खुनाच्या खटल्यात भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप, अमोल यांना नाशिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध शिक्षा झालेल्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल … Read more

मनपाच्या त्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- मनपाच्या प्रभाग ६ (अ) मधील एका जागेसाटी पोटनिवडणूक होणार आहे. या प्रभागात मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडमूक आयोगाने जाहीर केला आहे. २७ डिसेंबरला मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. पोटनिवडणुकीसाठी ४ ऑक्टोबरला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार … Read more

शेतकर्‍यांनी भविष्यात पिकवण्यापेक्षा विकण्याचे नियोजन करावे – प्रा. नामदेवराव जाधव

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- परखड विचारांची समाजाला गरज आहे. विचाराने एकत्र आलेली माणसं जग जिंकू शकतात. शिवाजी महाराज, संभाजी महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिजेत. गुजराती माणूस वाटप करतो आणि मराठी माणूस वाटे करतो ही शोकांतिका असल्याची भावना शिवाजी द मॅनेजमेंट गुरूचे लेखक तथा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केली. मराठा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अहमदनगर : हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आले आहे. हाॅटेल सन राइज वाकोडी फाटा अहमदनगर येथे हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर धाड टाकून 2 आरोपिंना अटक करण्यात आली 2 पिडीत तरुणींची सुटका केली. या बाबत सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगरमधील वाकोडी फाटा येथील सन राईस लाॅजीग येथे आज संध्याकाळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री,सागर पाटील … Read more

शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधीचा गंडा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील पिंप्रीनिर्मळ येथील प्रसाद दत्तात्रय सोनवणे (वय-३४) यांना सहा.शिक्षक पदावर नियुक्ती करून देतो. म्हणून त्यांची २६ लाख ३० हजार रूपयांची फसवणूक केल्याची फिर्याद त्यांनी भिंगार … Read more

महापालिकेकडून ‘अब की बार, थ्री स्टार’चा नारा

अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिकेकडून स्वच्छता विषय उपाययोजनांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती व प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिकेच्या उत्कृष्ट सफाई कर्मचार्‍यांचा व शहरातील शाळा, शासकीय कार्यालये, हॉस्पिटल व हॉटेल या आस्थापनांना स्वच्छता पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि.16) शानदार सोहळ्यात करण्यात आले. महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्वांना शुभेच्छा देतांनाच ‘अब … Read more

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करताना बीएड अथवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस पाठवलेल्या १३३ जणांवर कारवाईची टांगती तलवार असून, या शिक्षकांकडून पुराव्यासह लेखी खुलासा प्रशासनाच्या वतीने मागवण्यात आला आहे. पदोन्नती, वेतनश्रेणीत वाढ होण्यासाठी शिक्षकांना बीएड, पदवीची आवश्यकता असते. अनेकदा शिक्षक त्यासाठी मुक्त विद्यापीठ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- बंगला नावावर करण्याची धमकी,महिला डॉक्टरने अखेर संपविले जीवन !

अहमदनगर :- अहमदनगर शहरात गुलमोहोर रोड, नवनाथनगर, कोहिनूर मंगल कार्यालयाच्यामागे प्लॉट क्र. २ संतोषी निवास येथे राहणाऱ्या डॉ. सुजाता आसाराम साळवे, वय ४९ या डॉक्टर महिलेला चौघा आरोपींनी वेळोवेळी त्यांच्या नावावरील बंगला आरोपींच्या नावावर करण्यासाठी मारहाण करुन शिवीगाळ केली दमदाटी केल्याने डॉ . सुजाता आसाराम साळवे, वय ४९ (अहमदनगर) या महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. सुजाता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहपूर्व प्रेमसंबंध पतीला सांगण्याची धमकी देत,लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार !

पुणे ;- विवाहपूर्व प्रेमसंबंध पतीला सांगण्याची धमकी देत प्रथम महिलेला घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत संबंधीत महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात नवील अब्दुल रेहमान (२२, रा. अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला … Read more