माजीमंत्री राधाकृष्ण विखेंच्या मदतीला देवेंद्र फडणवीस !

अहमदनगर :- माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे तसेच शिवाजी कर्डिले व स्नेहलता कोल्हे या भाजपच्या जिल्ह्यातील तीन माजी आमदारांनी आमदार टीका केल्यांनतर त्यांचा विरोध लवकरच मवाळ होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात एल्गार पुकारला असला तरी या तिघांचा विखेविरोध पेल्यातील वादळ ठरण्याची शक्यता आहे कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास … Read more

रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने चालक ठार

अहमदनगर :- रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील चालक ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्याद देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब धोंडीराम घोडके (रा. सम्राटनगर, दत्तनगर, श्रीरामपूर) हे आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून श्रीरामपूरहून बाभळेश्वरच्या दिशेने चालले होते. नांदूर गावच्या शिवारातील ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळील कॉर्नरला समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षाने त्यांना जोराची धडक दिली. यात घोडके ठार झाले. … Read more

अहमदनगर :- महापालिकेच्या 32 सफाई कर्मचार्‍यांचा सन्मान !

अहमदनगर :- स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जनजागृती व प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. याचाच भाग म्हणून मागील आठ महिन्यात स्वच्छताविषयक उत्कृष्ट काम करणार्‍या 32 सफाई कर्मचार्‍यांसह शासकीय कार्यालये, शाळा, हॉटेल व हॉस्पिटल अशा 12 संस्थांचाही गौरव सोमवारी (दि.16) महापालिकेच्या वतीने केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. अनिल बोरगे … Read more

अहमदनगर जिल्हापरिषदेत ह्या निर्णयामुळे सदस्य झाले आक्रमक

अहमदनगर : शासनाने ग्रामपंचायत विभागाचा चौदाव्या वित्त आयोगातून परस्पर जो निधी कपात केला आहे. त्यात नगर जिल्ह्याचे एकूण ७४ कोटी रूपयांचा निधी कपात केलेला आहे. या निधी कपातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध दर्शवला. हा कपात केलेला निधी कोठे गेला. याबाबत जोपर्यंत शासन योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही पाणीयोजनेचे वीज कनेक्शन तोडू नयेत, अशी … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांची विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. माजीमंत्री शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा तर झाला नाही उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसानच झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी … Read more

जामीनदार न झाल्याने आतेभावाचा खून करणार्या आरोपीस जन्मठेप !

अहमदनगर :- जेलमध्ये असताना जामीनदार झाला नाही.याचा राग धरून आरोपी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळे, रा.वडुले बु. काळे वस्ती ता.शेवगाव.याने त्याचा आतेभाऊ मयत संदिप दत्तात्रय जर्गे याचा चाकूने भोसकून खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायाधीश क्र. २ श्री.अशोककुमार भिल्लारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर काळे याला जन्मठेप व १०,००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील … Read more

का झाला माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव ? हे दोन नगरसेवक हिटलिस्टवर !

अहमदनगर :- राज्यात आणि देशात युतीचे सरकार असूनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अनिल राठोड यांना पराभवास सामोरे जावे लागले. तब्बल ११ हजार ११५ मतांनी आ.अनिल राठोड यांचा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पराभव केला,हा पराभव राठोड यांच्यासह शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. केवळ भाजपच नव्हे, तर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्याची चर्चा आहे.आणि … Read more

सावधान ! महागडी चारचाकी स्वस्तात देवून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय 

अहमदनगर :- अत्यंत कमी वापरलेली महागडी चारचाकी स्वस्तात देतो. म्हणून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय झाले आहे.या रॅकेटने अनेकांना गंडा घातला असून, नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही स्वस्तातल्या गाडीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन गुन्हेगार स्वत: लष्करात सेवेत असल्याचे भासवत आहेत. संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील एका युवकाला चारचाकी घ्यायची … Read more

संतापजनक : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या बालिकेचा मृत्यू

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या बालिकेचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे यांना या घटनेबाबत विचारले असता, त्यांनी सुटीवर असल्याचे सांगितले. रूग्णालयात संपर्क केला असता या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. राहुरी तालुक्यातील जांभळी भागातील वावरथ येथे ऊसतोडणी कामगार अनिल शंकर राठोड यांच्या अक्षरा (४) या मुलीला … Read more

महानगर पालिका कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

नगर : महापालिकेच्या आरोग्य विभागात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव दत्तात्रय गाढवे (वय ५६, रा. सबजेल चौक, नगर) याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. गाढवे यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली, हे समजू शकले नाही. ड्युटी संपल्यानंतर गाढवे यांनी सबजेल चौकातील घरी दोरीने गळफास घेतला. काही वेळातच … Read more

सार्वजनिक जागेत कचरा टाकणे पडले महागात झाला तब्बल इतक्या हजारांचा दंड

अहमदनगर :- नगरकरांनो, सावधान! सार्वजनिक जागेत कचरा टाकणे भलतेच महाग पडू शकते. अशा इशारा देणारी कारवाई अनुशासनप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदींनी केली आहे. सार्वजनिक जागेत कचरा टाकल्याच्या कारणावरून द्विवेदी यांनी सीएसआरडी या संस्थेला तब्बल पाच हजार रुपयांच्या दंडाचे फर्मान जारी केले. जिल्हाधिकारी यांनी स्वत:च कचरा टाकताना रंगेहाथ पकडल्याने कारवाई … Read more

अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी यांना जाहीर

अहमदनगर : थिंक ग्लोबल फौंडेशनचा तिसरा राज्यस्तरीय “स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार (२०१९)” सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे, राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना जाहीर झाला आहे. तशी घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत आज केली. फौंडेशनच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात मूळ नगरचे असणाऱ्या अमरापूरकर … Read more

नगरसेवक कैलास गिरवले मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी सदर करण्याचे खंडपीठाचे आदेश

अहमदनगर – पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांना त्यांच्या माळीवाड्यातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली होती. कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी करावे तसेच सीआयडीने तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत. पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला … Read more

तीन तोळ्यांचे गंठण लांबवले

अहमदनगर : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरील चोरट्याने हिसकावून नेले. नगर-कल्याण रस्त्यावरील माधवनगर बोर्डाजवळ ही घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कविता सुनील बाचकर (वय ३२, रा. माधवनगर, नगर-कल्याण रोड) या नगर-कल्याण रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून एकजण आला. त्याने बाचकर यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून … Read more

घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाचे दागिने लंपास

अहमदनगर : नवनागापूरातील गजानन कॉलनीत असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख २८ हजार ७०० रूपये किंमतीचे सोन्याची दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल चंद्रकांत वसंत मोरे (वय-२८ रा. … Read more

चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असताना ही वापर सर्रासपणे सुरू

नगर – शहरात चायना बनावटीच्या मांजा वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर सर्रासपणे सुरू आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या मकर संक्रातीच्या उत्सवामुळे शहरातील पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. मात्र त्यासाठी चायना बनावटीच्या मांजाचा वापर केला जात असल्याने नागरिक व पक्षी यांच्या जीविताला अपाय होऊ लागला आहे. अशाच दोन घटनांत शहरातील दोन नागरिक जखमी झाले. नालबंदखुंट येथील सय्यद … Read more

शहर झोपडपट्टीमुक्त करू : आमदार संग्राम जगताप

नगर : नगर शहरातील प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर असावे यासाठी मी राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून संजयनगर झोपडपट्टी येथे २९८ घराचा प्रकल्प साकार होत आहे. नगर शहर हे झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी संजयनगर येथील २९८ घराच्या प्रकल्पामधील अडचणी सोडवणार आहे, … Read more

भाचीने गळफास घेत संपविले जीवन, धक्का सहन न झाल्याने मामाचा झाला असा शेवट

अहमदनगर :- भाचीने गळफास घेतल्याचे घटना मामाला कळताच त्या धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. मामाचे ह्यदयविकाराने निधन झाले. महिलेच्या गळफासप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कॅलिस्टा ग्रॅहम रॉक (वय-३२, रा. सौरभनगर, भिंगार) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे. भिंगारमधील सौरभनगर येथे रॉक या युवतीने मंगळवारी पहाटच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. … Read more