नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल – आ.संग्राम जगताप

नगर: महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना रस्त्याने फिरणेही अवघड झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल. अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा येत्या मंगळवारी (२६ नोव्हेंबर) नागरिकांसह आंदोलन करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. शहरातील नागरी प्रश्नांबाबत आमदार जगताप यांनी … Read more

या कारणासाठी झाले उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण !

अहमदनगर : येथील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.१९) जालना जिल्ह्यातील परतूर येथून दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून, नगर येथील सराईत गुन्हेगार अजहर मंजूर शेख हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील शेखसह आणखी एका आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती … Read more

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांची अशी झाली सुटका, जालन्यातून थेट बस द्वारे असे पोहोचले अहमदनगर मध्ये !

अहमदनगर :- आज पहाटे अपहरण झालेले प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी पोलिसांना जालन्यात सापडले, अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना नगरमधून पळवून जालन्यात सोडून दिलं.  उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी सकाळी पिस्तुलाचा धाक दाखवून कोठला परिसरातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरकर्ते त्यांना जालना येथे सोडून फरार झाले. त्यानंतर दुपारी हुंडेकरी हे नगरला सुखरुप पोहचले. त्यांना नगरच्या पोलिसांनी … Read more

…असे घडले हुंडेकरी यांचे अपहरण थरारनाट्य ….

अहमदनगर :- शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हुंडेकरी लॉन्सचे प्रमुख करीम हुंडेकरी यांचे आज भल्या पहाटे अज्ञात चार ते पाच जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण केले. त्यामुळे नगरसह जिल्ह्यात खळबळ उडाली.या अपहरणाचे थरारनाट्य एखाद्या चित्रपटासारखेच होते. नगर येथील ६४ वर्षाचे हाजी करीमभाई हुंडेकरी हे मोठे उद्योजक, व्यावसायिक असून हुंडेकरी लॉन्स, टाटा शोरुम तसेच सिमेंट, हॉटेल असे … Read more

माजी पालकमंत्री राम शिंदे यांचे स्वीय सहायक येमुल यांचे निधन

नगर : राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात सहायक पोलिस निरीक्षक असलेले नगरचे गणेश सुदर्शन येमुल (वय ४०) यांचे पुणे येथे ह्यदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.  गणेश येमुल हे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे प्रतिनियुक्तीवर स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते. गणेश येमुल हे २००२ मध्ये नगर जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. खात्यांतर्गत परिक्षा देऊन ते … Read more

‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ववत सुरू करण्याची मागणी 

अहमदनगर : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष बंद झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे, तरी कक्षाचे कामकाज पूर्ववत सुरू करून गरीब रुग्णांना तातडीने मदत देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी फुले ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी … Read more

प्रेमविवाह करणाऱ्या भावास मारहाण

नगर  – सोमनार धनराज लिमकर, वय २७, रा. श्रीऱाम गल्ली मिरजगाव याचा भाऊ संतोष धनराज लिमकर याने जयकुमार याच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला. त्याच्या रागातून सोमनाथ लिमक तरुणास जयकुमार बोरा, रा. मिरजगाव, ता. कर्जत व इतर १० जणांनी इनोव्हा गाडी मॅक्स पांढऱ्या रंगाची गाडी व एक इर्टिका गाडी नंबर सांगता येत नाही. या गाडीतून येवून बळजबरीने … Read more

महिलेस मारहाण करुन गाड्यांची तोडफोड

नगर :- शहरात जाधव मळा चौक बालिकाश्रम रोड येथे सनी याचे रुबाब कपड्याच्या दुकानाजवळून भाजीपाला घेवून पायी चाललेल्या सौ. जाधव हि महिला घरी जात असताना काही आरोपी गाड्यांची तोडफोड करत होते. यावेळी सौ. जाधव म्हणाल्या की, तुम्ही असे का करता? असे करू नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने सदर महिलेस लाकडी दांड्याने व कोयत्याने बेदम मारहाण … Read more

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश येमुल यांचे निधन

अहमदनगर : राज्य गुन्हे अन्वेषण विभागांतर्गत कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक गणेश येमुल यांचे गुरुवारी रात्री ह्रदयविकाराने निधन झाले. नगरचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सुरक्षा टीममध्येे ते प्रतिनियुतीवर होते. त्यांच्या आयटी सेलचे कामही येमुल पहात होते. सायबर तज्ञ म्हणून येमुल यांचा लौकिक होता. गुरुवारी रात्री पुण्यात त्यांचे निधन झाले. शुक्रवारी नगरमध्ये 10 वाजता अमरधाम … Read more

बालिकाश्रम रोडवर दोन गटांमध्ये दगडफेक

अहमदनगर : शहरातील बालिकाश्रम रोडवरील पोलिस कॉलनीजवळ जुन्या भांडणाच्या कारणातून दोन गटांमध्ये हाणामाऱ्या होऊन दगडफेक झाली.    त्यात दोन्ही गटांतील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध जीवे मारण्य़ाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, दंगा करणे या कलमांनुसार तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   विठ्ठल नंदू … Read more

कागदावरच झाडे लावणाऱ्या अधिकाऱ्याचे नगरसेवकाने धरले पाय!

नगर – शहरात तब्बल १७ हजार झाडे लावल्याचा दावा प्रशासनाने केल्यानंतर नगरसेवक गणेश भोसले यांनी यादी मागवली. ही झाडे कागदावरच लावल्याचे स्पष्ट झाले. उद्यान विभागाच्या या कारभारामुळे संतापलेले नगरसेवक गणेश भोसले यांनी या विभागाचे यु. जी. म्हसे यांचे पाय धरून दर्शन घेतले. या प्रकारामुळे मनपाचे प्रशासन किती निर्ढावले आहे, हे स्पष्ट झाले. मनपा स्थायी समितीची … Read more

अहमदनगर मध्ये बसवर अंदाधूंद दगडफेक

अहमदनगर :- नगर शहरातील तारकपूर बसस्टॅण्ड येथे बसमधील प्रवाशांना तसेच बसचालकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत एका ट्रकचालकासह ८ ते १० जणांनी अंदाधूंद दगडफेक करुन बसकंडक्टरसह पोलिसांना लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केल्याची घटना सोमवारी  रात्री १० वाजता घडली.  याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दहा जणांविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालकाने ट्रकला कट मारल्याच्या … Read more

अहमदनगर महापालिकेत भाजपचा महापौर होणार नाही ! कारण …

अहमदनगर : महापालिकेचे पुढील अडीच वर्षासाठीचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असून विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ ३० जून २०२१ रोजी संपणार आहे.  त्यापुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असणार आहे. राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि.१३) दुपारी मुंबईत काढण्यात आली. त्यानूसार नगर महापालिकेचेही आरक्षण जाहीर … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले सहनशीलतेचा अंत पाहू नका !

अहमदनगर : सार्वजनिक हितासाठी मी जनतेशी कटिबद्ध असून माझी बांधिलकी फक्त जनतेशी आहे. त्यामुळे नगर शहरातील व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था आता सहनशीलतेच्या पलिकडे गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी व दळणवळणासाठी सुयोग्य करावेत. संबंधित सर्व विभागांनी तातडीने कामे पूर्ण करावे व लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशी कानउघडणी खा.डॉ.सुजय विखे पाटील … Read more

अहमदनगर गारठले, राज्यातील सर्वात कमी तापमान नगरमध्ये !

नगर जिल्ह्यातून पावसाने अखेर निरोप घेतला असून थंडीचे आगमन झाले आहे. सलग पाचव्या दिवशी महाबळेश्वरपेक्षा सर्वात थंड तापमान अहमदनगर मध्ये नोंदवले गेले.  रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नगरमध्ये 14.6 अंश सेल्सिअस होते. त्यात आणखी घट होत सोमवारी 14 अंश सेल्सिअसपर्यंत आले. सर्वात थंड समजल्या जाणार्‍या महाबळेश्वरमध्ये किमान तापमानाची नोंद 15.6 अंश सेल्सिअस झाली. जिल्ह्यात … Read more

वृद्धाला बेदम मारहाण 

नगर: तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सुरेश दत्तात्रय तवले, किरण सुरेश तवले, श्रीकांत सुरेश तवले, मंगल दिलीप तवले, गौरव दिलीप तवले, बाबासाहेब पंढरीनाथ ससे, संजय बाबासाहेब ससे, वैशाली संजय ससे, शांताबाई ससे (जेऊर) यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.   बाबासाहेब मगर शेतात गेले होतेे. पाण्याचे पाइप काढल्याचे … Read more

शेतीच्या वादातून बेदम मारहाण 

अहमदनगर : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथे शेतातील पाईप कोणी काढले असे विचारल्याचा राग येवून ८ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळासाहेब भगवंत मगर (वय ६७, रा. जेऊर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शेतातील पाण्याचे पाईप काढलेले दिसल्याने त्यांनी पाण्याचे पाईप कोणी … Read more

बनावट सातबारा तयार करुन फसवणूक

अहमदनगर :- बनावट कागपत्र तयार करुन भूविकास बँक व महसुल कर्मचार्‍यांनी संगनमतीने वडिलोपार्जित साडे नऊ एकर शेतजमीन बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नंदू विधाते यांनी केला आहे. चार वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नंदू विधाते यांचे वडिल नाना उर्फ वसंत विधाते यांच्या मालकीची … Read more