नगर विकासाचे नवे धोरण राबविणार – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- प्रामाणिक पणे कार्य केले तर जनतेची साथ भेटतेच, नगरचा सर्वागीण विकास हेच स्वप्न बाळगून या पुढे कार्य करणार असून जितोच्या ट्रेड फेअरने नगरच्या उद्योजकांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून राज्यात नावलोकिक प्राप्त केले. प्रथमच अतिशय भव्य असा ट्रेडफेअर उत्तम नियोजनामुळे यशस्वी झाला असून जितो संघटनेच्या सहकार्याने नगर विकासाचे नवे धोरण राबविणार असल्याचे मत नवनिर्वाचित … Read more

विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला -प्रा.माणिक विधाते

अहमदनगर :- मागील पाच वर्षाचे विकासात्मक कार्य पाहून जनतेने संग्राम जगताप यांच्याबाजूने कौल दिला आहे. विकास विरुध्द निष्क्रीय माजी आमदारामध्ये ही लढत होती. यामध्ये विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला असल्याची भावना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकितील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसर्‍यांदा विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल व … Read more

दोन भैयांच्या लढतीत कोणाचं पारडं जड?

नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार तसेच अहमदनगर चे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि सलग पाचवेळा निवडून आलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यातील ही अतिटतीची लढत शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली आहे.   शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना युती न होण्याचा फटका बसल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला.  मात्र मागील पाच … Read more

नगरकर कोणता भैया विधानसभेत पाठवणार?

अहमदनगर –  शहरात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आ. अनिल राठोड यांची लढत चांगलीच रंगतदार अवस्थेत आली आहे. खरतरं, या दोन्ही नेत्यांना नगरकर मोठ्या आदराने ‘भैय्या’ अशी हाक मारत असले तरी मतदानावेळी नेमकं कोणत्या ‘भैय्या’ ला पसंदी देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  नगर शहराचं राजकारण तसं जगताप, कोतकर, कळमकर यांच्याबरोबर राठोड, गांधी, … Read more

भिंगारचे सर्व प्रश्न सोडवले जातील – डॉ. नीलम गोऱ्हे

नगर – राज्यभरातील अनेक छावण्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात मी विधानसभेत आवाज उठवला. तत्कालीन संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचेही ठरले होते. भिंगार येथील नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी दिले. शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भिंगारमध्ये झालेल्या प्रचारसभेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, अंबादास पंधाडे, जिल्हा महिला … Read more

‘त्यांनी’ दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली – आ. जगताप

अहमदनगर : त्यांनी २५ वर्ष नगर शहरात जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण करीत दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या … Read more

शिवसेना प्रत्येकाच्या मनात भिनलेली

नगर :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन सर्वांना सोबत घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. चांगला विचार करायचा, हसत – खेळत जीवन जगायचे, अनिल राठोड यांनी जसा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, तसाच शिवसेनेने सुद्धा कधी तडा जाऊ दिला नाही.  म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेना रुजली पाहिजे. शिवसेना आज … Read more

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या प्रचार रथावरील चालकास मारहाण

नगर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगर शहरात शिवसेना लोकशाही च्या मार्गाने प्रचार करत आहे.परंतु विरोधकांकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. शिवसेनेच्या प्रचारार्थ मुंबईवरून आलेल्या एलईडी रथाचे चालक व त्याच्या साथीदाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस नगर शहरामध्ये असे कृत्य करत असून, नगर शहर मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून … Read more

नगर मध्ये आरपीआय सेनेच्या अनिल राठोड यांच्या सोबत

नगर :  महायुतीतील भाजप व शिवसेना पक्षाच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार करून आयपीआय युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणार असून नगर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार आम्ही करणार आहेत. पक्षातील काही नाराज असतील तर त्यांची नाराजी … Read more

भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार

भिंगार : लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे भिंगार शहर मागे पडले आहे. येत्या काळात येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांनी सांगितले.  पुढे बोलताना राठोड म्हणाले की शिवसेना-भाजपा युतीच्या काळात भिंगारमध्ये अनेक कामे झाली. आपण आमदार असताना भिंगारच्या विकासासाठी स्मशानभूमीची संरक्षक भिंत, विविध भागात हँडपंप, हायमॅक्स, बाजारतळावर … Read more

संग्राम जगताप नगरच्या विकासाचा चेहरा :खा. डॉ अमोल कोल्हे

नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले. नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप … Read more

डुप्लिकेट नको; ओरिजिनल भैया पाहिजे !!!

नगर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियाचा वापर सर्वचर राजकीय पक्ष आणि नेते करताना दिसत आहेत . शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा प्रचार नगर शहर मतदारसंघात शिगेला पोचला आहे . त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले. शिवसेनेची जाहिरात करणारे हे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये हे व्हिडीओ धुमाकूळ … Read more

२५ वर्षे व्यापार, उद्योग बुडवला ते आता पोकळ गप्पा मारताहेत!

नगर : पक्षीय राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण मी गेल्या पाच वर्षापासून केले आहे. शहरात आयटीपार्क सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मात्र ज्यांनी २५ वर्ष व्यापार, उद्योग बुडवण्याचे उद्योग केले ते आता निवडणुकीच्या निमित्त पोकळ गप्पा मारत आहेत, अशी टिका आमदार संग्राम जगताप … Read more

केडगावचा विकास करून या भागातील दहशत कायमची संपवणार – किरण काळे

नगर : केडगावचा अजूनही विकास झालेला नाही. अनेक वर्षांपूर्वी केडगावचा नगरच्या हद्दीमध्ये समावेश झाला. परंतु योग्य नेतृत्वा अभावी आजही केडगाव मधील पाणी, रस्ते, गटारी यासारख्या मूलभूत सुविधा केडगावकरांना उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे निवडून आल्यानंतर आपण स्मार्ट केडगावची निर्मिती करणारा असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी केले आहे. केडगाव मधील प्रचाराचा शुभारंभ करत … Read more

Vidhansabha2019 : स्पेशल रिपोर्ट अहमदनगर शहर मतदारसंघ

युतीत बेकी, राष्ट्रवादीत दुही अहमदनगर  विधानसभा मतदारसंघात साठच्या दशकानंतर तीन दशकं कोणतीही व्यक्ती दुस-यांदा आमदार होत नव्हती; परंतु शिवसेनेच्या अनिल राठोड यांनी ही परंपरा मोडीत काढली. अहमदनगरची सामाजिक रचना, धार्मिक विभागणी लक्षात घेऊन बहुसंख्याकांच्या मनात अल्पसंख्याकांविषयी सातत्यानं दुहीची बीजं पेरून त्यावर आपली मतांची पोळी भाजून घेण्यात राठोड सातत्यानं यशस्वी होत गेले. त्याला कारण ही अन्य … Read more

समोरासमोर येऊन चर्चा करा – आ.संग्राम जगताप

नगर : ‘निवडणुका सुरु झाल्या आहेत. विरोधक भावनिक आरोप व आवाहन, जाती-पातीचे राजकारण करण्याबरोबरच खोटे आरोप करून तेढ निर्माण करतील. मात्र, खोटे आरोप व जाती-पातीचे राजकारण करणाऱ्यांना माझे आव्हान आहे, समोरासमोर येऊन चर्चा करा, मग पाहू कोण किती खरे आहे ते. यासाठी कधीही व कोठेही बोलवा मी तयार आहे,’ असे आव्हान आ. संग्राम जगताप यांनी … Read more

नगर शहराला राठोड यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री मिळणार

नगर : ‘मातोश्रीपर्यंत जाणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठावंत लोक लागतात, जे गेल्या ३५ वर्षांपासून काम करतात. मला जे शिवसेनेचे तिकीट मिळाले, हे निष्ठेचे फळ आहे,’ अशी भावना राठोड यांनी व्यक्त केली. ‘गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरात काहीजणांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल खोट्या अफवा होत्या, पण त्यात काही तथ्य नव्हते. माझी उमेदवारी जाहीर झाल्याने … Read more

आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर ! भरचौकात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर…

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होवून तीन दिवस झाले असून नगर-पुणे महामार्गावरील स्टेट बँक चौकात अद्यापही भाजपची पोस्टर झळकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी केली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. आचारसंहिता कालावधीत विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणुक चिन्हे … Read more