लोणी येथील गोळीबार प्रकरणातील ४ आरोपी जेरबंद

कोल्हार : रविवारी रात्री श्रीरामपूर येथील सात जणांची लोणी येथे आपसात झालेल्या वादातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यातील चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. आरोपींना लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. येवला व शिरूर येथून सिराज उर्फ सोल्जर अबू शेख (वय २४), संतोष सुरेश कांबळे (वय … Read more

तरुणीचा विनयभंग करून तिच्याकडेच केली प्रती महिना 5 हजारांची मागणी

संगमनेर : संगमनेर शहरात अकोले बायपास रोड परिसरात असलेल्या एका अभ्यासिकेत एक तरुण विद्यार्थिनी अभ्यासाला यायची या ठिकाणी आरोपी सूर्यकांत पोपट कडलग, रा. रायतेवाडी, ता. संगमनेर हा असायचा. अभ्यासिकेत तरुणीबरोबर ओळख झाली व ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. या मैत्रीचा गैरअर्थ काढून आरोपी सूर्यकांत पोपट कडलग याने सदर विद्यार्थिनीचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन … Read more

वाळू तस्करांच्या दोन गटात जोरदार राडा

राहुरी :  म्हैसगाव-कोळेवाडी भागात वाळूच्या व्यवहारावरून वाळू तस्करांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. एकमेकांवर गावठी पिस्तुले रोखल्याने एकाच दहशद निर्माण झाली. या घटनेतील तुळशीराम काशीनाथ केदार (रा. चिखलठाण, ता. राहुरी) यास राहुरी पोलिसांनी अटक केली. रवींद्र उर्फ पप्पू अप्पासाहेब शिंदे (रा. खांबे, ता. संगमनेर) हा पसार झाला आहे. राहुरी पोलिसांनी याबाबत शस्त्र बाळगल्याप्रकरणी अद्याप कोणावरही … Read more

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

अकोले : अकोले तालुक्यातील कळस गाव व परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.  तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळूउपसा व वाहतुकीस बंदी असताना विनापरवाना वाहतूक पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलिसांनी आपला मोर्चा वाळूतस्करांकडे वळवला आहे.  मंगळवारी पहाटे कळस शिवारातील प्रवरा नदीच्या पुलावर टाटा सुमोमधून भाऊसाहेब रामनाथ साळवे हा विनापरवाना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हप्ता न दिल्याच्या रागातून मजुराचा कु-हाडीने घाव घालून खून

पाथर्डी :- गावातील गावगुंडानी एका मजुराचा हप्ता न दिल्याच्या रागातून कु-हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात मंगळवारी दुपारी घडली. साहिल पठाण (रा.खोसपुरी, ता. नगर) असे या मजुराचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी, ता.नगर) यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करण्याचा … Read more

श्रीगोंद्यात माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू

श्रीगोंदा :- काष्टीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य असलेले शिवनेरी उद्योग समुहाचे अध्यक्ष पोपटराव विलासराव माने यांचे अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघाती निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. एक डिसेंबरला रात्री दहा वाजता माने आपल्या शिवनेरी हॉटेलचे कामकाज संपवून समोरच असलेल्या घरी जात असताना रस्ता ओलांडताना दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक बसली. माने … Read more

फरार आरोपीस सापळा रचुन शिताफीने पकडले! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर : न्यायालयाने फरारी घोषित केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल राजेंद्र पालवे (वय २९, रा.मेहेकरी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोठला परिसरात सापळा रचुन शिताफीने पकडले.  सुनिल पालवे याच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यास जामीनावर सोडले होते. जामीनावर सुटल्यानंतर कोर्ट कामाकरीता सुनील पालवे हा न्यायालयात हजर झाला नाही. … Read more

शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून जबर मारहाण

अहमदनगर : बांध का कोरला अशी विचारणा केल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास शिवीगाळ करून लोखंडी पाईपणे जबर मारहाण केली. या मारहाणीत अमोल महादेव दिवटे हे जखमी झाले असून, याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की,श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील अमोल महादेव दिवटे यांनी माझ्या शेताचा बांध का कोरला अशी विचारणा केल्यावरून त्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबारात एका युवकाचा मृत्यू !

राहता :- तालुक्यातील लोणी गावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. फरदीन अब्बु कुरेशी (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फरदीन हा श्रीरामपूर शहराचा रहिवासी होता. रविवारी … Read more

वीज दुरुस्तीचे काम करत असतानाच अधिकाऱ्याला मारहाण

श्रीरामपूर – महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांना वीज दुरुस्तीचे काम करीत असताना नगरसेवकाने शिवीगाळ व मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत महावितरणचे एमआयडीसी ऑफिस श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more

तरुणाचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

नगर : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणारा सोमनाथ उर्फ वैभव अशोक अभंग (वय १८) हा विद्यार्थी मित्रांबरोबर गावातीलच बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. पण बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे चंदनापुरी गावावर शोककळा पसरली आहे. सोमनाथ … Read more

सिक्युरिटी कंपनीत कामाला लावतो असे सांगून ७४ तरुणांना गंडा

नगर : सिक्युरिटी कंपनीत कामाला लावतो म्हणून तालुक्यातील कळस बुद्रुक येथील ७४ तरुणांना सुमारे सात लाख रूपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पुणे येथील दाम्पत्याविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नितीन महाजन याने बालाजी कंपनीत ७४ तरूणांची सिक्युरिटीसाठी निवड केली. प्रत्येकाला ड्रेससाठी ३२४० रूपये याप्रमाणे … Read more

चोरीचे वीज कनेक्शन तोडल्याने वायरमनला मारहाण 

नगर:  बेकायदेशीरपणे घेतलेले वीज कनेक्शन तोडल्याचा राग आल्याने दोघांनी वायरमनला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बोल्हेगाव येथील भारत बेकरीच्या मागे शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनील नारायण तांबे व नीरज सुनील तांबे अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनी घरात चोरून वीज कनेक्शन घेतले होते. महावितरणचे … Read more

दोन लाचखोर पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; मागितली ४० हजारांची लाच

कोपरगाव : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात आपल्याला अटक करू नये यासाठी ४० हजारांची लाच मागणारे शिर्डी पोलिस ठाण्याचे दोन पोलिस शिपायांविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी. मैद अशी आरोपींची नावे आहेत. कोपरगाव येथील सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठिकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी-विक्रीचे दुकान … Read more

अवैधरित्या मुरूम उपसा; जेसीबी पोकलेनसह जप्त

पारनेर : रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या मुरूम उपसा करणारी दोन यांत्रिक उपकरणे ताब्यात घेऊन तहसीलदार ज्योती देवरे यांनी ठेेकेदार महेश गुंदेचा यांची मुरूम चोरी उघडकीस आणली. सध्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून वनकुटे ते तास या रस्त्याचे काम सुरू असून या कामाच्या दर्जाबाबत अनंत तक्रारी करण्यात येत आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मुरुमाची रॉयल्टी भरण्यात आली नसल्याची तक्रार … Read more

प्रियंका यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

अहमदनगर: डॉ. प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुदायिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.  आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी या युवतीवर काही नराधमांनी सामुदायिक बलात्कार करुन, तिची हत्या केली. तर सदर युवतीच्या प्रेतास जाळण्यात आले. आरोपींनीच केली … Read more

शिर्डीत रेल्वे रुळावर आढळला महिलेचा मृतदेह !

शिर्डी :- शहरातील साईनगर रेल्वे स्टेशन परिसरात ५५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेबाबत काही माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेबसाईटवर खोटी माहिती देऊन फसवणूक

अहमदनगर : हॉटसअप, मेल आयडीवर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्याची खोटी माहिती देवुन, फसवणूक केल्याची ब्रजेश प्रेमशंकर तिवारी यांनी हरीषचंद्र गोपाळ बेलवले याच्याविरूध्द जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, बेलवले याने फिर्यादी तिवारी यांच्या मेलआयडी वर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्ड … Read more