महिलेला जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी,२४ जणांवर ॲट्रोसिटी !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी आजमपूर येथे धान्याचे पोते ढकलून दिल्यामुळे जाब विचारायला गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ व अपमान करून थेट फाशी देऊन मारण्याची धमकी दिल्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात २४ जणांविरुद्ध ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादींनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोठ्याभाऊ … Read more

श्रीरामपूरात पोलिसांनी जप्त केला 10 हजारांचा गुटखा

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  श्रीरामपूर शहरात एका इसमाकडून पोलिसांनी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील काजी बाबा रोडवर एका इसमाकडे गुटखा असल्याची माहिती पालिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आपल्या … Read more

लाचखोरी सुरूच; मंडल अधिकार्‍यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- वडिलांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीची सातबारा उताऱ्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी राहता येथील मंडल अधिकाऱ्याने 3 लाखांची मागणी केली होती. त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत पथकाने राहाता येथील मंडलअधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यास 2 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

पाच हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- पाच हजार रूपयांची लाच घेतांना अकोले येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस नाईक संदीप भाऊसाहेब पांडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस ठाणे आवारातच रंगेहाथ पकडले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले येथील घटनेत तक्रारदाराचे साडू व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध दाखल असलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ हनीट्रॅपमध्ये पोलिस कर्मचा-याचा भाऊ आरोपी !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेसह पाच आरोपींविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यात संबंधित महिलेकडून ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याच्या पहिल्या दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केले असता, युवतीने क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा हनीट्रॅप ! क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून मागितले ३ कोटी…

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हनीट्रॅप प्रकरणामुळे आता चर्चेत येवू लागला आहे. मागील आठवड्यात नगर तालुक्यातील एका गावात किराणा दुकान चालविणाऱ्या महिलेने नगर शहरात राहणाऱ्या तिच्या साथिदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड झाले होते.त्यानंतर हनीट्रॅप ची वेगवेगळी प्रकारणे समोर येत आहेत. क्लासवन अधिकारी ब्लॅकमेल :- नगर तालुका पोलिसांनी उघडकीस … Read more

युवकाचा खून केल्याप्रकरणी 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जमिनीच्या वादातून कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील रहिवासी अण्णासाहेब मारुती चंदने (वय 40 वर्षे) यांना नऊ आरोपींनी मारहाण करून त्यांचा खून केला. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत आप्पासाहेब मारुती चंदने हे आपल्या घरासमोर असतांना गैरकायद्याची … Read more

धान्याचा काळाबाजार प्रकरणातील सहा जणांची जामिनावर मुक्तता

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अकोले तालुक्यात धान्याचा काळाबाजार करणाऱ्या चार ट्रक राजुर पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. यातील आरोपीनवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. याच सहा आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील आठवड्यात राजूर पोलिसांनी एकामागे एक येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांचा माल वाहतूक करणाऱ्रे चार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता असलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील सोपान नामेदव शिंदे ( वय ३८ वर्षे) याचा मृतदेह आढळून आला. सोपान शिंदेचा घातपात झाल्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. सोपान शिंदे सहा दिवसांपासून बेपत्ता होते. तशी फिर्याद नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रविवारी अकरा वाजेच्या सुमारास गावातील एक व्यक्तीला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या सरपंचावर अखेर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- वर्धापनदिन अंकात रुई ग्रामपंचायतीची शुभेच्छा जाहिरात दिली असता त्याचे पेमेंट मागितले असता देण्यास टाळाटाळ केली. त्याचदरम्यान रुई गावातील खराब रस्त्याची बातमी छापली असता त्याचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी रुई ग्रामपंचायतीचे सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी येथील वृत्तपत्राच्या वर्धापनदिनाच्या अंकात रुई ग्रामपंचायतीचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ते हत्याकांड ! ‘तो’ घरी गेला नसता तर वाचला असता…

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- आपण करत असलेल्या चोरीचे बिंग फुटू नये म्हणूनच एका अल्पवयीन मुलाने ११ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेवगाव तालुकातील खुंटेफळ येथे सोमवार १० मे रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. दरम्यान सार्थक अंबादास शेळके (वय-11) असे मयत मुलाचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा हनी ट्रॅप ! मोठे रॅकेट’ उघडकीस येण्याची शक्यता..

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- शरीरसंबंधाचे अश्लील व्हीडीओ तयार करून ब्लॅकमेल करणारी महिला तिच्या जोडीदारासह पोलिसांनी गजाआड केली आहे. नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणात मोठे रॅकेट’ उघडकीस येण्याची शक्यता अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. पञकारांशी बोलताना सांगितले. अपर पोलिस अधीक्षक अग्रवाल, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक … Read more

तलवारी घेऊन फिरणारा युवक अखेर अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील साईनगर वार्ड नं.२ येथे दोन्ही हातात तलवारी घेऊन दहशत करणाऱ्या शाहरुख अन्वर शेख (२१ वर्ष रा.शनि चौक वार्ड नं.२ श्रीरामपूर ) या युवकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. साईनगर वार्ड नं.२ श्रीरामपूर येथे एक युवक दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरत होता. दरम्यान, पोलिस त्या दिशेने जात … Read more

धक्कादायक ! पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घालत जीवघेणा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-  संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे पोलीस वाहनांची तपासणी पोलीस करत होते. त्यावेळी नाशिकहून पुण्याकडे कार घेऊन चाललेल्या चालकाने पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घातली. यात सुदैवाने ते बचावले. मात्र, पायावरून कारचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या दुर्घटनेत सुनील पाटील (पोलीस … Read more

अल्पवयीन मुलाच्या हत्येचा उलगडा झाला; हत्येचे कारण आले समोर

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे एका अकरा वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या हत्येचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने आपले चोरीचे बिंग फुटू नये … Read more

महसूलमंत्र्यांवर टिप्पणी करणारी पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश हौशिराम भोर (रा. चैतन्यनगर, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अविनाश भोर याने त्याच्या फेसबुक खात्यावर महसूलमंत्री थाेरात यांच्याविषयी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या बहुचर्चित हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळेनात

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-शेवगाव तालुक्यातील येथील अकरा वर्षीय सार्थक अंबादास शेळके या मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गावातच ठाण मांडून या प्रकरणाचा उलगडा करण्यात गुंतले आहे. मात्र त्यांच्या हाताला धागादोरा मिळाला नाही. खुंटेफळ येथे ११ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची … Read more

चाळीस हजारांची शिसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- नगर शहरातील नागापूर एमआयडीसीमधील एका कंपनीमधून शिसेची चोरी करणार्‍या दोघा चोरट्यांना पोलिसांनी पडकले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात संतोष पद्माकर डबीर (वय 49 रा. पाईपलाईन रोड, नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अजित चंद्रभान शिंदे आणि आकाश जयसिंग आगळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. … Read more