पालकमंत्री हसन मुश्रीफ आज अहमदनगरमध्ये

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज सोमवारी प्रथमच नगरमध्ये येत आहेत.नव्या महाविकास आघाडीतील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ९ जानेवारीला नियुक्ती झाली आहे. त्यानंतर सोमवारी ते प्रथमच नगरला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या बैठका घेणार आहेत. त्याच्या या दौऱ्याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले … Read more

रोहित पवारांनी आता, तरी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून दाखवावीत !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदारही नव्हता. मी सर्वसामान्यांतून आलो असतानाही सर्व पदे उपभोगली. त्यामुळे मला विखे कुटुंबीयांनी चॅलेंज करू नये. आमच्या पराभवासंदर्भात पक्षाने वरिष्ठ पातळीवर कमिटी नेमली आहे. ती अहवाल देणार आहे. त्यावेळी सर्व बाबी समोर येतीलच. आमच्यात कोणताही समेट झालेला नाही, असे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी … Read more

यशवंतराव गडाख यांच्या ‘त्या’ वक्तव्याची जोरदार चर्चा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शनिशिंगणापूर शंकरराव गडाख हे नेवासे मतदारसंघातून शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या बॅट चिन्हावर विजयी झाले आहेत. नंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेने त्यांना कॅबिनेट मंत्री केले असले, तरी मी मात्र शिवसेनेत गेलेलो नाही. माझा पक्ष ठरलेला आहे, असे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी स्पष्ट केले. या विधानाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. … Read more

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शेतमजुरीचे काम करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील रामगड येथील ३६ वर्षांच्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी बेलापूर (कुऱ्हे वस्ती) येथील शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रामगड येथील पीडित महिलेस आरोपी राजेंद्र रघुनाथ भांड (रा. कुऱ्हे वस्ती) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. संबंधित महिलेने याबाबत पोलिसात … Read more

अहमदनगर शहराचा पारा घसरला ! जाणून घ्या तापमान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहराचा पारा घसरला असून, शुक्रवारी नगर शहरात किमान ९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान शुक्रवारी होते. गारठ्यामुळे नगर शहरातील व्यवहार संध्याकाळी थंडावले होते. कापडबाजारात शुकशुकाट होता. जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नगरमध्ये ७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले … Read more

महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोल्हार महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने संगमनेरजवळील दुधेश्वर मंदिर परिसरात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (१९, कोल्हार खुर्द) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी दत्तात्रय महाविद्यालयात हजर होता. नंतर तो मोटारसायकल घेऊन दुधेश्वर महादेव मंदिराजवळ गेला. शर्ट व स्वेटर झाडाला बांधून त्याने गळफास घेतला. त्याने … Read more

अहमदनगर शहरात बिबट्या दिसल्याने खळबळ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- काही महिन्यांपूर्वी बुरुडगाव परिसरात बिबट्या आढळला होता. आता केडगाव, शास्त्रीनगर, पांजरापोळ भागात बिबट्या दिसल्याची चर्चा आहे. वन विभागाने या परिसराची पाहणी केली, परंतु बिबट्याचे ठसे आढळले नाहीत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास व शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास केडगावातील नाला, अजय गॅस गोडाऊन, पांजरापोळ, रेल्वे उड्डाणपूल-देवी रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक … Read more

कोणाकडून अधिक अपेक्षा आहेत? सुजय विखे की सत्यजीत तांबे ? रोहित पवारांनी दिले हे उत्तर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  ‘कर्जत-जामखेडमध्ये गेली ३० वर्षे विकास झाला नव्हता म्हणून त्या मतदारसंघातून लढलो. आता इथं विकासाचं असं मॉडेल निर्माण करेन की भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही,’ असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी आज बोलून दाखवला.अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याबाबत म्हणाले….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ज्या विश्वासाने ग्रामविकास मंत्रिपदाची व नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. तो विश्वास सार्थ करीत गटबाजीला थारा न देता जिल्ह्याचा विकास गतिमान केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. प्रलंबीत असलेले रस्ते, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जातील, अशी ठाम ग्वाही देत शेतकरी, … Read more

साईबाबांच्या अपहरणाचा प्रयत्न होतोय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणी शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बैठक होवून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍या पाथरी आणी अन्य ठीकाणच्या तथाकथीत लोकांचा तिव्र निषेध करून यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा … Read more

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून विटंबना केल्याप्रकरणी भाजपच्या १३ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केले. प्रतिबंधात्मक आदेश भंगप्रकरणी पोलिसांनी सुधाकर गुंजाळ, डॉ. अशोक इथापे, राजेंद्र सांगळे, राम जाजू, योगराजसिंग परदेशी, कल्पेश … Read more

तीन युद्धांत सहभागी झालेल्या पतीला पत्नीने दिला मुखाग्नी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- जैन धर्माच्या परंपरेला छेद देत पाथर्डीत पत्नीने पतीचे अंत्यसंस्कार केले आहेत. जैन समाजातील महिला घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही अंत्यसंस्काराला उपस्थित राहात नाहीत अशी परंपरा आहे. मात्र या परंपरेला छेद देत देशासाठी तीन युद्धांत सहभाग घेतलेल्या पतीचे अंत्यसंस्कार जैन समाजातील 72 वर्षीय छायाबाई गांधी यांनी करत वेगळे धाडस … Read more

अहमदनगर शहरात अनिल राठोड विरोधात सगळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेच्या सावेडीतील 6 नंबर वार्डाच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेतील बंडखोर गट अलिप्त धोरणाच्या मार्गावर असल्याने भाजप उमेदवाराला लाभदायी ठरणार आहे. दरम्यान भाजप पुन्हा आरती बुगे यांना उमेदवारी देण्याची तयारी करत असल्याचे समजते. राष्ट्रवादी उमेदवार देणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे समजते. महापालिकेच्या सहा नंबर … Read more

तरुणी व तिच्या वडिलांना झाली दगडाने मारहाण कारण समजल्यास तुम्हाला धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संक्रांतीच्या वाणाचे मडके घरासमोर का फोडले असे विचारले असता राग येऊन तरुणीस व तिच्या वडिलांना दगडाने मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू याबाबत सविस्तर … Read more

नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस झाली ही शिक्षा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस १५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा 16 Jan 2020 कोपरगाव : नांदत नसलेल्या पत्नीवर चाकूचे वार करून तिचा खून करणाऱ्या पतीस न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी १५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे पण वाचा :- वडिलांच्या श्राध्दावरून परतणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू ही घटना … Read more

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराचे साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साईबाबांची जन्मभूमी पाथरीसाठी 100 कोटी रुपये मंजूर करून साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण झाला. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  त्यानंतर शिर्डी बसस्थानकावर साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीसाठी बस सोडण्याबाबतचा फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पाथरीचे आमदार … Read more

सरपंचाच्या पतीचा सपासप वार करून खून

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महिलांची छेड का काढतो, असा जाब विचारल्याच्या रागातून पारधी समाजातील तरूणाने महिला सरपंचाच्या पतीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बारामती तालुक्यातील सोनगांवात बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास गावातील सोनेश्वर मंदिरालगत घडली. तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा किरकोळ कारणावरून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी , घालावे लागले तब्बल ३२ टाके !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- चायना मांजामुळे युवक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अरबाज शेख (वय १८) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाच्या हनुवटीखालील भाग मांजामुळे कापला गेला आहे. हे पण वाचा :- जिल्हा परिषेदतील राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन  जखमी शेख यांना ३२ टाके घालावे लागले. डॉ. सागर बोरुडे यांनी तब्बल … Read more