पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांचा राजीनामा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :-  पारनेरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष वर्षा नगरे यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केला. इतर सदस्यांना संधी देण्यासाठी राजीनामा दिल्याचे सांगून यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपंचायतीच्या सभागृहात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी निवडण्यात आलेल्या विविध विषय … Read more

महाविकासआघाडी सरकारने शेतकर्‍यांना क्रुरपणे फसविले आहे !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- शेतकरी कर्जमाफीचा काढण्यात आलेल्या शासनादेश म्हणजे विश्वासघाताची परिसीमा आहे. शेतकर्‍यांना क्रुरपणे फसविले गेले आहे, असा आरोप मार्क्सवादी किसान सभेचे प्रदेश सचिव कॉ. डॉ. अजित नवले यांनी केला. शासनादेशाच्या पाचव्या कलमानुसार व्याज व मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आले आहे. मागील कर्जमाफीत अशा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगी जागीच ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा :- तालुक्यातील सलाबतपूर ते गोंडेगाव रस्त्यावर बाभूळखेडा शिवारात ऊस वाहतूक करणार्‍या डबल ट्रॉली ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला. याबाबत माहिती अशी की, काल शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सलाबतपूर-गोंडेगाव रस्त्यावर बाभूळखेडा शिवारात औताडे वस्तीनजीक इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कु. विद्या राजेंद्र … Read more

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- अनुराधा सचिन उमाप (वय १८, श्रीरामपूर) हिने सासरच्या छळाला कंटाळून शनिवारी पहाटे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद आईने दिली. याबाबत मृत अनुराधाची आई बायजाबाई अनिल शिंदे (औरंगाबाद) यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे, अनुराधाचा विवाह ११ जुलै २०१९ रोजी श्रीरामपूर … Read more

माजी मंत्री राम शिंदे व माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचे मौन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधानसभा निवडणुकीनंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर झालेले आरोप या संदर्भात माजी मंत्री राम शिंदे व माजी आ. शिवाजी कर्डिले यांना सातत्याने विचारणा करण्यात आली. मात्र या विषयावर त्यांनी आज बोलण्यास नकार दिला. आ. विखे पाटील यांनी मात्र या विषयावर पक्षश्रेष्ठींसमोर सविस्तर आणि मोकळ्या मनाने चर्चा झाल्याचे सांगितले. माझ्यामुळे नुकसान … Read more

भाजपाचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे ३१ डिसेंबरला कळेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, यासाठी पक्षाचे सर्व नेते एकत्र आहेत. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हे अर्ज दाखल करताना ३१ डिसेंबरला कळेल, असे पक्षाचे नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी आपल्या पराभवास विखे … Read more

बाळासाहेब थोरातच दोन वर्षापुर्वी भाजप मध्‍ये प्रवेश करणार होते !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॉग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्‍या भेटी बाबतचे वृत्‍त हे माझ्या बदनामीचे षडयंत्र असुन कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याच्‍या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात आपण गुन्‍हा दाखल केला असल्‍याची माहीती माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. कॉंग्रेस पक्ष सोडल्‍यानंतरही आमच्‍या सुखदुखाची चिंता करणारे आमदार बाळासाहेब थोरातच दोन वर्षापुर्वी भाजप मध्‍ये प्रवेश करणार … Read more

नगर -पुणे रस्त्यावरील दुभाजक तोडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर : नगर- पुणे महामार्गातील शिरूर ते नगर रस्त्यावर हॉटेल व्यवसायासह अन्य सुरु असलेल्या व्यवसायाचा धंदा जोरात व्हावा. यासाठी महामार्गावरील दूभाजक तोडून तेथे तो ओलांडता येतील अशी सोय करवून घेण्यात आल्याने गेल्या काही घटनांवरून हे ‘स्पॉट’ नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर पुणे महामार्गावर अवैध क्रॉसिंग निर्माण केल्याने भर … Read more

सुजित झावरे पाटील यांनी आपल्या कृतीतून दिले त्यांना उत्तर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्यात बिघडलेली राजकीय समीकरण या परिस्थितीमुळे तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व सुजित झावरे पाटील यांची निवडणुकीत झालेली फसवणूक त्यामुळे सहन करावा लागलेला राजकीय फटका त्यामुळे सुजित झावरे पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह यामुळे विधानसभा निकाला नंतर सुजित झावरे’चे तालुक्याच्या राजकारणात काय होणार हा विरोधकांना पडलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर – सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर – सोलापूर महामार्गावर अंबिलवाडी (ता. नगर ) शिवारामध्ये एसटी बस व चार चाकी मोटारीचा भीषण आपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. या आपघातामुळे नगर-सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. मृतांमध्ये तीनही नगरचे रहिवासी आहे. अरुण बाबुराव फुलसुंदर (वय ६०, रा. बुरुडगाव), अर्जुन योगेश भगत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सहलीसाठी वडिलांनी दोन हजार रुपये न दिल्याने युवकाची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :-  सहलीसाठी वडिलांनी दोन हजार रुपये न दिल्याने 19 वर्षीय युवकाने आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. वडिलांनी पैसे न दिल्याने रागाविलेला 19 वर्षीय युवक चार दिवसांपासून घरातून निघून गेला होता. आज दुपारी या मृत तरुणाचा मृतदेह विहिरीत बुडालेल्या अवस्थेत आढळला. पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे आज … Read more

अहमदनगर मार्केट बाजारभाव : २८- १२ – २०१९

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर: नगर बाजार समितीत सध्या मेथी, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो या भाज्यांची मोठी आवक होत आहे. त्यामुळे त्यांचे दर चांगलेच पडलेले आहेत. तर दुसरीकडे बाजार समितीत गवारीच्या शेंगेची आवक घटली आहे. शुक्रवार (दि. २७) रोजी गवारीच्या शेंगेला २००० ते ६००० इतका ठोकध्ये भाव मिळाला आहे. किरकोळमध्ये हाच भाव १०००० रुपयांपर्यंत गेला … Read more

कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चेबाबत राधाकृष्ण विखे म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील ‘यूटर्न’ घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त एका दैनिकानं दिलं आहे. त्यानंतर विखे पाटील माघारी … Read more

नाराज बाळासाहेब थोरातांना मिळाला शिंदेंचा बंगला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई :- महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन एक महिना उलटला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही. मात्र शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांमध्ये खाते वाटपानंतर आता बंगल्यांच्या अदलाबदली सुरू झाली आहे. सहा मंत्र्यांमध्ये बंगले वाटपातही मानापमानचे नाट्य सुरू झालेले आहे. दोन दिवसांनंतर 30 जणांचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता असल्याने … Read more

अब की बार, थ्री स्टार : स्वच्छता सर्वेक्षणात नगरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये सहभाग घेतलेला आहे. महापालिकेच्या वतीने स्वच्छता विषयक उपाययोजनांसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात ‘थ्री स्टार’ मानांकन मिळविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने नागरिकांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत. उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठीही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू … Read more

कर्जमाफीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अमरावती ;- कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली आहे; परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय लवकरच करू, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमरावती येथे दिले. अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन राऊत यांचा सत्कार … Read more

अत्यंत महत्वाचे : अहमदनगर – पुणे महामार्ग असेल १ जानेवारी रोजी बंद जाणून घ्या पर्यायी मार्ग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे होणाऱ्­या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवार दि.१ जानेवारी रोजी पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्या दिवशी पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक विविध मार्गाने वळविण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा येथे दि.१ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीमुळे यावर्षी … Read more

दशक्रियाविधीसाठी श्रीगोंद्यात आलेल्या प्राध्यापकाचा अपघातात मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  संगमनेर :- तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी प्रा. सुधीर तुकाराम तांबे (वय ३१) यांचा श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर असलेले अन्य दोन शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील प्रा. सुधीर तांबे, त्यांचे … Read more