संतापजनक : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या बालिकेचा मृत्यू

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या बालिकेचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे यांना या घटनेबाबत विचारले असता, त्यांनी सुटीवर असल्याचे सांगितले. रूग्णालयात संपर्क केला असता या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. राहुरी तालुक्यातील जांभळी भागातील वावरथ येथे ऊसतोडणी कामगार अनिल शंकर राठोड यांच्या अक्षरा (४) या मुलीला … Read more

ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील खातेवाटप जाहीर पहा कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे… 1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग. 2. श्री. एकनाथ संभाजी शिंदे गृह, नगर विकास, वने, … Read more

श्रीगोंद्याला नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी मिळावेत : आमदार बबनराव पाचपुते

श्रीगोंदा :- नगर विधानसभा मतदार संघात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी रुपयांची मदत तातडीने मिळावी व कुकडी च्या पूर्ण हंगामाचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलून आवर्तन सोडण्यावर निर्णय घेण्यात यावा या दोन मागण्यांसाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गर्भवती तरुणीचा शुल्लक कारणातून खून

श्रीगोंदा :- तालुक्यात गर्भवती विवाहित तरुणीचा शुल्लक कारणातून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेगाव शिवारात राहणारी विवाहित तरुणी मनिषा दत्तात्रय भोसले ही विसापूर येथून आठवडे बाजार करुन घरी येत असताना विसापूर शिवारात रेल्वे रुळालगतच्या रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी झालेल्या मागील भांडणाच्या कारणातून ८ आरोपींनी संगनमत करून रिव्हॉल्व्हर दाखवून लाथाबुक्क्याने मारहाण करुन तोंड कपड्याने … Read more

अल्पवयीन तरुणीची श्रीगोंदा बसस्थानकात छेडछाड!

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीची छेडछाड काढण्याचा प्रकार दि. ९ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा बसस्थानकात घडला. याप्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून किशोर बाळू गोडसे याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणी श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेते. ती … Read more

सार्वजनिक जागेत कचरा टाकणे पडले महागात झाला तब्बल इतक्या हजारांचा दंड

अहमदनगर :- नगरकरांनो, सावधान! सार्वजनिक जागेत कचरा टाकणे भलतेच महाग पडू शकते. अशा इशारा देणारी कारवाई अनुशासनप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदींनी केली आहे. सार्वजनिक जागेत कचरा टाकल्याच्या कारणावरून द्विवेदी यांनी सीएसआरडी या संस्थेला तब्बल पाच हजार रुपयांच्या दंडाचे फर्मान जारी केले. जिल्हाधिकारी यांनी स्वत:च कचरा टाकताना रंगेहाथ पकडल्याने कारवाई … Read more

ऑनलाईन मटक्याचा सुळसुळाट

भंडारदरा :- पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या परिसरात ऑनलाईन मटक्याचा सुळसुळाट झाला आहे. या मटक्याच्या मोहामध्ये तरुणाई अडकली आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये सध्या मोबाइल मटक्याचा जोरदार बाजार सुरु आहे. मोबाइलवरच तीन सट्टेबाजारांचे गेम मेसेजद्वारे अज्ञात व्यक्ती पोलिसांची नजर चुकवून घेत आहेत. विशेष म्हणजे मोबाइलवर समोरील सट्टेबाजाला ज्या बाजाराचे गेम आहेत, त्याचे मेसेज टाकून सट्टा … Read more

पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत जाहीर, पहा कोण होणार तुमच्या तालुक्याचा सभापती ?

अहमदनगर: जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत आज  सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली आहे. कोणत्या पंचायत समितीला कुणाचे आरक्षण येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एकूण 14 पंचायत सभापती  आरक्षण पुढील प्रमाणे 1 पारनेर : खुला प्रवर्ग 2:कोपरगाव : … Read more

नगरसेवक कैलास गिरवले मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी सदर करण्याचे खंडपीठाचे आदेश

अहमदनगर – पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांना त्यांच्या माळीवाड्यातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली होती. कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित पोलिसांना प्रतिवादी करावे तसेच सीआयडीने तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिले आहेत. पोलिसांच्या मारहाणीतच कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला … Read more

 तरुणास मारहाण करत पत्नीला ही धक्काबुक्की

संगमनेर: मागील वादाचा राग मनात धरुन आदिवासी तरुणास जातीवाचक शिवीगाळ करत त्याच्या पत्नीला धक्काबुक्की केल्याप्रकरणी आंबीखालसा येथील शेतकरी सर्जेराव गुलाबराव ढमढेरे याच्यावर घारगाव पोलिसांनी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. ही घटना मंगळवारी आंबी खालसा येथे घडली. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला. भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीलगत विकास गोरक्ष बर्डे हे पत्नी व मुलांसमवेत राहतात. मंगळवारी सकाळी बर्डे … Read more

सहायक फौजदार याच्यासह पाच जणांना जुगार खेळताना पकडले 

श्रीरामपूर : वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्यासमोरील जुगार अड्ड्यावर औरंगाबाद येथील पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून सहायक फौजदार हनुमान पालेपवाड याच्यासह पाच जुगाऱ्यांना पकडले. ८ डिसेंबरला रात्री १२ च्या सुमारास औरंगाबाद येथील विशेष पथकातील हवालदार त्र्यंबक बनसोड, पोलिस नाईक योगेश खमाद, कॉन्स्टेबल अभिजित डहाळे, भरत कमोदकर, अपसर बागवान यांना वीरगाव पोलिस ठाण्यासमोर असलेल्या हॉटेलमध्ये काहीजण … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा पेटणार

अहमदनगर :- जिल्ह्यातील १४ पंचायत समितींच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी नियोजन भवनात ही सोडत काढण्यात आली. यामध्ये श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी, तर जामखेडचे सभापतीपद अनूसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचेही राजकारण जिल्ह्यात तापणार आहे. सध्या … Read more

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

संगमनेर : संगमनेर-कोपरगाव रस्त्यावरील रांजणगाव देशमुख (ता. कोपरगाव) शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन युवक ठार झाला, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. योगेश माधव जोंधळे (२९, कौठेकमळेश्वर) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सकाळी रांजणगाव देशमुख-भागवतवाडी शिवारात ही घटना घडली. जोंधळे व शुभम संजय पवार (रांजणगाव देशमुख) हे दोघे दुचाकीवरून (एमएच १५ बीझेड १६९७) तळेगाव … Read more

अल्पवयीन तरुणीला भरदिवसा पळविले

पारनेर :- तालुक्यातील हंगा भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील, १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन तरुणीला भरदिवसा आरोपी अजित राजेंद्र आल्हाट, रा. हंगा याने काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी अजित आल्हाट याच्याविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हेकॉ साळवे हे आरोपीचा व … Read more

एकाच दिवशी दोन जणांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

राहुरी :- तालुक्यातील वांबोरी व वरवंडी या दोन ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. वांबोरी येथील घटना नाजुक प्रकरणातुन घडली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून राहुरी पोलिस पुढील तपास करीत आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे प्रमोद गोरक्षनाथ … Read more

घरात घुसून महिलेचा विनयभंग

अकोले :- तालुक्यातील गंथला घाट परिसरात डोंगरगाव भागात एक २५ वर्षाची तरुणी घरात एकटी असताना आरोपी गोविंद गंगाधर मधे, रा. मुधवळे, ता. अकोले, कचरू संतु गारले, रा. घोडसरवाडी, ता. अकोले हे दोघे तरुणीच्या घरात घुसले व तिला धरुन पाणी मागत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. तू जर आम्हाला विरोध केला तर तुला … Read more

श्रीगोंद्यात कोंबड्यांवरून बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी

श्रीगोंदा :- तालुक्यातील मांडवगण येथील शेतकरी महिला लवंगाबाई विश्वनाथ घोगरे यांच्या शेताजवळ राहणाऱ्या आरोपीच्या कोंबड्यांनी घाण केली तसेच मेथीच्या पिकाचे नुकसान केले. याबाबत लवंगाबाई घोगरे यांनी कोंबड्यावाल्या आरोपींना तुमच्या कोंबड्या आवरा त्यांनी नुकसान केले. याचा जाब विचारल्याने त्यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करुन हात फॅक्चर करण्यात आला. लाथाबुक्क्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा डेंग्यूने मृत्यू

अहमदनगर : कोठी येथील सुजाता मकासरे (वय ४५) या महिलेचा डेंग्यूच्या आजाराने बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. डेंग्यूसदृश्य आजाराने त्या काही दिवसापासून आजारी होत्या. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होता. बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. वारंवार मागणी करुन देखील कोठी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या … Read more