त्या नराधम मुख्याध्यापकास अटक !

जामखेड :- तालुक्यातील दत्तवाडी (धोंडपारगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी सरोदे (रा.जामखेड) याने शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी मुख्याध्यापकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संभाजी कोंडीबा सरोदे तालुक्यातील दत्तवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. दि 23 नोव्हेंबर रोजी … Read more

आनंदाची बातमी : नगरच्या उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागणार !

अहमदनगर :- शहरातील प्रलंबित उड्डाणपुलाच्या बांधकामसाठी आवश्यक असलेली भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील २३ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. यापैकी बहुतांश जणांनी आम्ही आमची जागा देण्यास तयार असल्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे त्यामुळे उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. उड्डाणपुलासाठी लष्कराच्या हद्दीतील जागा संपादनाचा विषय संरक्षण मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला … Read more

सहा हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यास झाली इतक्या वर्षाची शिक्षा

संगमनेर :- जमिनीच्या हद्द मोजणीची कागदपत्रे तहसील कार्यालयात पाठविण्यासाठी सहा हजारांची लाच घेणाऱ्या दौलत नामदेव डामरे यांना चार वर्षांची साधी कैद व २४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली या खटल्याची सुनावणी संगमनेर न्यायालयामध्ये सुरू होती.दौलत डामरे हे ऑक्टोबर २०१० मध्ये अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कार्यरत होते. या वेळी एका व्यक्तीकडून जमिनीची हद्द कायम मोजणीची … Read more

नगर शहरात भाजपचे ८५ हजार ऑनलाइन सदस्य – सुवेन्द्र गांधी

अहमदनगर :- नगर शहर व उपनगरांमध्ये भाजपचे ८५ हजार ऑनलाईन सदस्य नोंदणी झाली आहे.पक्षाचे प्राथमिक सदस्य संख्या ३ हजार झाली आहे, तर सक्रीय सदस्यांची संख्या ९०० झाली आहे, अशी माहिती भाजपचे माजी गटनेते सुवेंद्र गांधी यांनी गुरुवारी दिली. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. नगर शहरातील केडगाव, भिंगार, मध्यनगर, सावेडी या उपनगरांमध्ये गेल्या पंधरा … Read more

कर्जबाजारी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर :- कर्ज तसेच आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील वनकुटे येथील सुनील तुळशीराम भगत (वय ३४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. सुनील भगत हा वनकुटे येथे दुचाकी दुरुस्तीचे काम करीत होता. मंगळवारी सकाळी न्यायालयात काम असल्याने तो सकाळीच वनकुटे येथून निघाला. वडिलांकडे तीन हजार रुपयांची मागणी केल्यानंतर वडिलांनी त्यास … Read more

…आणि निष्ठा पावली,बाळासाहेब थोरातांना मिळाले कॅबिनेट मंत्रिपद !

संगमनेर :- काँग्रेसचे निष्ठावान नेते व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल  महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा अविस्मरणीय भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच संगमनेर तालुक्यामध्ये फटाक्यांची अतिषबाजी झाली.  … Read more

जामखेड मध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड :- रस्त्याच्या कारणावरून तालुक्यातील भवरवाडी येथे दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत बाराजण जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या वेळी दोन्ही गटांकडून दगड व काठयांचा सर्रास वापर करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या ते दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गटांतील दहा जणांना पोलिसांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळूतस्करांकडून तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न

पारनेर :- पारनेरच्या तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी अवैध वाळूच्या वाहनाचा पाठलाग केल्याने वाळूतस्करांनी त्यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार- पारनेरच्या तहसीलदार ज्योती रामदास देवरे या दि.२५ नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ढवळपुरी शिवारात गस्तीसाठी गेल्या होत्या. या वेळी तहसीलदार ज्योती … Read more

सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो

कोपरगाव ;- आमदार म्हणून शपथ घेताना जबाबदारीची जाणीव मला झाली, असे आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या विधानभवनात यशवंतराव चव्हाण, शंकरराव काळे, शरद पवार अशा मातब्बर नेत्यांनी शपथ घेतली, तेथे शपथ घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. विधानभवनात जाण्याची माझी पहिली वेळ नाही, पण कोपरगाव मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी विधान भवनाच्या परिसरात … Read more

डाॅ. किरण लहामटेंचा समावेश मंत्रिमंडळात करण्याची मागणी

अकोले :- मधुकर पिचड व वैभव पिचड यांची ४० वर्षांची सत्ता उलथवणारे आमदार डाॅ. किरण लहामटेंचा समावेश मंत्रिमंडळात करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे, अमित भांगरे यांनी केली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

नगर – सोलापूर महामार्ग झाला मृत्यूमार्ग, धुळीच्या साम्राज्याने आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

मिरजगाव : नगर – सोलापूर राज्य महामार्गाची दूरवस्था झाल्याने पावसाने झालेल्या खड्डयांतून काढले आणि धुळीत टाकले, अशी गत मिरजगावकरांची झाली आहे. या राज्य महामार्गाची दूरवस्था झाल्याने अपघातांची संख्या वाढली असून, रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून ज़ावे लागत आहे तर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गावरील खड्डयांमुळे व धुळीच्या साम्राज्यामुळे महामार्ग परिसरातील नागरिकांचे … Read more

किरकोळ बाजारात कांदा शंभरीपार !

सुपा : अवकाळी पावसाचा फटका नव्या कांद्याला बसला आहे. बाजारात दाखल होत असलेला कांदा ओला असला तरी त्याला स्थानिक परिसरासून मागणी आहे. जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढली आहे. मात्र, त्याचा साठा संपत आल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली असल्याचे कांदा व्यापारी सांगतात. पावसामुळे नव्या कांद्याचे झालेले नुकसान तसेच साठवणुकीतील जुना कांदा संपत आल्याने घाऊक बाजारात जुन्या … Read more

महसूल पथकाच्या ताब्यात असलेला जेसीबी व ट्रॅक्टर पळवला

कर्जत : महसूलच्या पथकाने ताब्यात घेतलेली अवैध वाळू उपसा करणारी वाहने कारवाईसाठी घेवून येत असताना अमोल काळे, राहूल काळे, स्वप्नील भगत व इतर अनोळखी इसमांनी या पथकास दमदाटी करून सदरची वाहने पळवून नेले. ही घटना दि.२५रोजी कर्जत तालुक्यातील नागलवाडी गावातील सीना नदीपात्रात घडली. याबाबत कर्जतचे निवासी तहसीलदार सुरेश प्रभाकर वाघचौरे यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली … Read more

कर्जत शहरात चोरांचा धुमाकूळ, मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले!

अहमदनगर : कर्जत शहरात सध्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वीच एकाच दिवशी दोन सोन्याची दुकाने फोडून मोठा ऐवज लंपास केला होता. त्यांनतर बीएसएस मायक्रो फायनान्स या कंपनीचे कार्यालय फोडून साडे तेरा हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.याबाबत कर्जत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की,कर्जत शहरातील शिक्षक कॉलनीत असेलेले … Read more

शेतीच्या वादातून महिलेस लाथाबुक्यांनी जबर मारहाण, पतीस ठार मारण्याची धमकी!

अहमदनगर : कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला असून तुमच्या कोर्टाच्या निकालानंतर व ताबा मिळाल्यानंतर तुम्ही शेती करा.असे सांगितल्याचा राग आल्याने पाच जणांनी एका महिलेस मारहाण करून जबर जखमी केले आहे. याबाबत जानकाबाई कचरू पिंपळे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर असे की, या शेतीचा वाद कोर्टात सुरू आहे.व निशान पाच या … Read more

मोटारसायकवरील दोघांना जबर मारहाण करत,जीवे ठार मारण्याची धमकी !

अहमदनगर : चौंडी दिघी या रस्त्याने मोटारसायकलवरून जाणाऱ्या अविनाश नाना ढवळे व अशोक ढवळे या दोघांना चार ते पाच जणांनी रस्त्यात अडवून काठीने जबर मारहाण केली. ही घटना दि.२३रोजी चापडगाव येथे घडली. याबाबत कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, अविनाश नाना ढवळे व अशोक ढवळे हे दोघेजण चौंउी दिघी या रस्त्याने … Read more

डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप नव्हे तर, मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी

संगमनेर – वाळू चोरणारे डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप जीप याचा वापर करतात, मात्र आता मारुती व्हॅनमधून वाळू तस्करी होत असल्याचे पोलिसांनी उघड केले. काल संगमनेर तालुक्यात नाशिक – पुणे रस्त्यावर हिवरगाव पावसा शिवारात ४. १५ च्या सुमारास पोलिसांनी पांढऱ्या रंगाची ओमनी मारुती व्हॅन एमएच ०६ एफ ९५१९ पकडली. तिच्यात पांढऱ्या रंगाच्या ३० गोण्यांमध्ये चोरीची वाळू … Read more

अहमदनगर ब्रेंकिंग: डेंग्यूने विद्यार्थ्याचा मृत्यू

कुकाणे:  मागील आठवड्यात सोनईतील मुळा कारखान्याच्या कामगार वसाहतीमधील अक्षय बापूसाहेब घनवट (१६) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. कारखान्याच्या इंजिनियरिंग विभागातील बापूसाहेब यांचा मुलगा अक्षय दहावीत होता. त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. औषधांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मुळा कारखाना, कामगार वसाहत, पानसवाडी, दुकान चाळ, सोनई गाव व पेठ भागात थंडी, ताप, सर्दी, … Read more