आमदार म्हणून निवडून आलो मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे : आमदार लंके

नगर : मीरावलीबाबा दर्गाह या दरबारवर माझी लहानपणापासून आस्था आहे. मी लहानपणापासून माझे आई व वडिलांसोबत सतत येत आहे. आज आमदार म्हणून निवडून आलो आहे, ते मीरावलीबाबांच्या आशीर्वादामुळे. पुढील काळात मीरावलीबाबा दर्गाहच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. आमदार लंके यांनी मीरावलीबाबाचे दर्शन घेतले. या वेळी मीरावलीबाबा दर्गाहचे मजारवर … Read more

लाथाबुक्क्याने व काठीने बेदम मारहाण करत १० हजार हिसकावले

नगर – जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात यादववाडी फाट्याजवळ शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विजय मारुती शिंदे, वय ३६, रा. भोवळगाव, ता. श्रीगोंदा हे दुचाकीवरुन जात होते.  त्याचवेळी  मागील भांडणाच्या कारणातून आरोपी नाना आडोले, रा. यादववाडी, पारनेर व इतर दोन जण यांनी दुचाकीला दुचाकी आडवी घालून लाथाबुक्क्याने व हे काठीने बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली. जोडीदाराच्या खिशातून १० हजार … Read more

जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे ? शालिनी विखे की राजश्री घुले

 नगर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे जाणार की, पुन्हा विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे अध्यक्षपद आपल्याकडेच राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. महिन्याभरात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सध्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे आहेत. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे आहे.  शालिनी विखे  … Read more

आमदार संग्राम जगताप मंत्रिपदाचे दावेदार

नगर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने नगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून नगरचे आमदार संग्राम जगताप यांना नक्कीच मंत्रिपद मिळेल, असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केला.   जगताप यांच्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जिल्ह्याचे मंत्रिपद निश्चित आहे. मात्र, ते कोणाला … Read more

चारचाकी गाडी व ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ

संगमनेर- अकोले तालुक्यातील कोंभाळणे, लिंगदेव परिसरात सासरी नांदत असताना विवाहित तरुणी सुवर्णा संतोष बांबळे ( हल्ली रा. गिरीराज कॉलनी, नवलेवाडी, अकोले)  या तरुणीस माहेरुन चारचाकी गाडी आण, ५ लाख रुपये आण, असे म्हणत तिचा शारीरिक मानसिक छळ केला. उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ करुन पैसे व गाडीची मागणी करुन घराबाहेर हाकलून दिले. या त्रासास कंटाळून सुवर्णा बांबळे … Read more

बांधावरील झाडाच्या वादातून तिघांना बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी

नेवासा – शेवगाव तालुक्यातील गुंफा गावच्या शिवारात शेताच्या सामाईक बांधावरील झाडाच्या कारणावरुन तिघांना लोखंडीगज, लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण करून जबर जखमी केले. शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन, सत्यभामा गोरक्षनाथ नजन, व्यंकटेश गोरक्षनाथ नजन हे  जखमी झाले आहेत. याप्रकरणी,  शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अर्जुन … Read more

भरदुपारी एसटी स्टॅण्डवर ५ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडले !

नगर –  नगर शहरात लुटमार करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच शहरातील  माळीवाडा परिसरात एसटी स्टॅण्ड येथे दुपारी ४.३० च्या सुमारास महिलेचे गळ्यातील ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरांनी ओरबाडून धूम ठोकली.  सौ. उषा चंद्रकांत केदार असे या सेवानिवृत्त महिलचे नाव  असून (रा. पाईपलाईन रोड, वैष्णवी कॉलनी, नगर) येथे राहत आहेत.  सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत १. २५ … Read more

ट्रक चालकाकडून कार चालकास मारहाण

संगमनेर : तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर ट्रकचालक विठ्ठलभाई सोमाभाई बावलिया (रा. राजापुरा, ता. चोटीला, जि. सुरेंद्रनगर, रा. गुजरात) याने स्विफ्ट डिझायरचे नुकसान करून तो निघून गेला. त्याला विलास तुळशीराम काळे (रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) यांनी चंदनापुरी शिवारात थांबवले. याचा राग येवून ट्रकचालक बावलिया याने काळे यांना चप्पलने मारहाण करून शिविगाळ केली. त्यानंतर … Read more

रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागावरील महालवाडी येथे शेतजमीन व रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. २४) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महालवाडी या ठिकाणी देवनाथ विठोबा मिंडे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. त्यांच्यात व शेजारी असलेले लक्ष्मण धोंडीबा मिंडे, बाळासाहेब लक्ष्मण मिंडे या सर्वांमध्ये शेतजमीन … Read more

राहुरीतील दोन्ही कारखाने बंद राहणार

राहुरी : नगर जिल्ह्यात उसाचे आगार समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील दोन साखर कारखान्यांचे धुराडे यंदा प्रथमच उसाअभावी बंद राहणार आहेत. त्यामुळे उपलब्ध उसाला बाहेरील साखर कारखान्यांचाच ‘आधार’ राहणार असल्याचे चित्र आहे. दिवाळी संपताच ऊस हंगाम चालू होतो. तालुक्याची कामधेनू मानला जाणारा डॉ. तनपुरे कारखाना तीन वर्षे बंद झाल्यानंतर दोन वर्षे पुन्हा सुरू झाल्याने ऊस उत्पादक … Read more

शेतकऱ्याची आत्महत्या

नेवासा : कर्जबाजारीपणाला कंटाळून बाळासाहेब भाऊसाहेब गोंडे (वय ३७, रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा) या तरुण शेतकऱ्याने काल रविवारी (दि. २४) रात्री घराजवळच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील भेंडा-गोंडेगाव रस्त्यावरील गोंडे वस्तीवर राहणारे तरुण शेतकरी बाळासाहेब भाऊसाहेब गोंडे याने रविवारी रात्री … Read more

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

राजुरा : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या विहीरगाव उपक्षेत्रातील मूर्ती वनबिटात बैल चराईसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीहरी साळवे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. विहीरगाव उपवनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मूर्ती वनबिटालगतच्या शेतशिवारात श्रीहरी साळवे हे बैल चराईसाठी गेले होते. त्याचवेळी दडून बसलेल्या वाघाने श्रीहरी साळवे यांच्यावर हल्ला केला. यात … Read more

पोलीस-दरोडेखोरांमध्ये धुमश्चक्री

राहुरी : राहुरी पोलीस व दरोडेखोरांच्या टोळीमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर राहुरी पोलिसांनी चार अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळविले. तर दोघेजण पसार झाले.  यावेळी पोलीस व दरोडेखोरांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत या दरोडेखोरांनी राहुरी पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सागर गोरख मांजरे (वय २२, पाईपलाईन रस्ता यशोदानगरजवळ, नगर), अविनाश अजित नागपुरे (वय २०, रा. … Read more

नगर-दौंड रस्त्यावर अपघात; दोघे ठार

अहमदनगर : नगर दौंड रस्ता हा प्रवासाच्या दृष्टीने चांगला झाला असला तरी भरधाव जाणारी वाहने, नियमांचे होणारे उल्लंघन, दारूच्या नशेत वाहन चालवणे यामुळे हा रस्ता अल्पावधीतच मृत्यूचा सापळा बनला आहे.   दि.२४ रोजी नगर दौंड महामार्गावर विसापूर फाट्याजवळ नगरकडून फलटणकडे धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या टाटा सफारी (क्र.एम.एच.१६.ए.जे.५०६७) या वाहनाचा वेग आवरता न आल्याने वाहन पलटी होऊन … Read more

राहुरीत पोलीस व दरोडेखोरांत धुमश्चक्री, चार अट्टल दरोडेखोर जेरबंद

अहमदनगर : राहुरी पोलीस व दरोडेखोरांच्या टोळीमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर राहुरी पोलिसांनी चार अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळवले, तर दोघेजण पसार झाले.  या वेळी पोलीस व दरोडेखोरांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत या दरोडेखोरांनी राहुरी पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सागर गोरख मांजरे (२२), अविनाश अजित नागपुरे (२०), काशिनाथ मारुती पवार (३७), गणेश मारुती … Read more

१६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेत बलात्कार

अकोले :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर एकाने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  पावळदरा घाट ते कोतुळ या रस्त्याने पावळदरा येथून पोखरी येथे शाळेत जात असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आरोपी अविनाश वामन मधे , रा , म्हसोबा झाप , पारनेर याने दुचाकीवर बसवून घाटातून पळवून नेले … Read more

भाजपने बबनराव पाचपुते यांच्याकडे दिली ही जबाबदारी !

अहमदनगर :- भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आपल्या बाजूने आणण्याची जबाबदारी भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्याकडे सोपवली आहे. आम्ही विधीमंडळात बहुमत सादर करू. यात मला अजिबात साशंकता वाटत नाही. ‘ऑपरेशन लोटस’बाबत गुप्तता राहू द्या, असे सूचक वक्तव्य बबनराव पाचपुते यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी माझा चांगला संबंध आहे आणि त्यासोबत सर्व आमदारांसोबत माझा … Read more

सोसायटीच्या सचिवाविरूध्द अपहाराचा गुन्हा

अहमदनगर : सोसायटीच्या सभासदांनी कर्ज हप्ता म्हणून भरलेले २ लाख ८७ हजार ३९ रुपयांची रक्कम संचालक मंडळाची परवानगी न घेता जेऊर सोसायटीच्या सचिवाने संचालक मंडळाची परवानगी न घेता या रकमेचा गैरवापर केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिव अजय बाळाजी पाटोळे (रा. जेऊर ता.नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अतुल अरविंद शुक्ल (वय- … Read more