पोलिस केस च्या वादातून तलवार व चाकूने हल्ला !

पाथर्डी : कोर्टात केलेली केस मागे घे असे म्हटल्याचा राग येवून, चौघांनी एकावर थेट तलवार व चाकूने हल्ला केला. या घटनेत रावसाहेब किसन भराट हे जबर जखमी झाले आहेत. ही घटना पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथे घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोंडोळी येथील रावसाहेब किसन भराट (वय-५० वर्षे) हे घराच्या ओट्यावर बुधवारी … Read more

चालकाला मारण्याची धमकी देऊन कार पळवली

श्रीगोंदा : गावाकडे नातेवाईकाचा मृत्यू झाला असून, श्रीगोंद्याला जायचे आहे असे सांगून हडपसर येथून स्वीफ्ट कार भाड्याने घेऊन आलेल्या तिघा इसमांनी कारचालकाला श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू ते गार रस्त्यावर गार फाटा येथे गळा आवळून जीवे मारण्याची धमकी देत. रोख रक्कम, मोबाईल व कार असा एकूण ५लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सदर रस्ता … Read more

श्रीगोंद्यात घोडनदीत पडून महिलेचा मृत्यू

श्रीगोंदा : मूळचे पैठण तालुक्यातील दिनापूर येथील रहिवासी असणारी व सध्या श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे राहणारी महिला काशीबाई सोमनाथ शिंदे वय ३०हिचा आंघोळीसाठी गेली असता घोडनदीपात्रात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि.२४ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत सोमनाथ शिंदे याने बेलवंडी पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील हा परिसर ‘नॉट रिचेबल’

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसर गेली तीन – चार दिवस झाले ‘नॉट रिचेबल’ आहे .जीओ, आयडिया यांची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह इतरांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरणगाव, कोंडेगव्हाण, निंबवी, पिप्री कोलंदर, म्हसे, रायगव्हाण, राजापूर, माठ, उक्कडगाव देठदैठण, येवती आदि गावासह मोबाईलसेवा पुरवणाऱ्या जवळपास सर्वच कंपनीच्या सेवेला खीळ बसली आहे. वारंवार फोन … Read more

पती – पत्नीस जबर मारहाण

अहमदनगर : आपल्या वडीलोपार्जित विहीरीवर जनावरे पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पती पत्नीस चौघांनी शिवीगाळ करून कुऱ्हाड व दगडाने जबर मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. यात पती पत्नी दोघेही जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, सुखदेव हरी गोरखे हे पत्नीसह जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्यांच्या वडीलोपार्जित विहीरीवर गेले होते.यावेळी तेथे मुकिंदा हरी गोरखे, आशाबाई … Read more

अहमदनगर जिल्हा पुन्हा बलात्काराने हादरला

अहमदनगर ;- नगर जिल्हा पुन्हा एकदा बलात्काराने हादरला आहे,अवघ्या ११ वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पिंपळगाव माळवी परिसरात १ एप्रिल रोजी दुपारी २ . २० च्या सुमारास एक ११ वर्षाची मुलगी घरी एकटी असताना या संधीचा फायदा उठवत आरोपी प्रकाश दुर्योधन गांगडे, रा. कन्नड, जि. औरंगाबाद याने मुलीवर दोन – … Read more

नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक !

जामखेड :- तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि. प. शाळेचा (दत्तवाडी) मुख्याध्यापक संभाजी कोंडीबा सरोदे (राहणार जामखेड) याने नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. न्यायालयाने त्यास २६ पर्यंत पोलिस कोठडी दिली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता सरोदे नान्नजहून जामखेडकडे कारने येत होता. राजेवाडीफाटा येथे त्याच्या शाळेतील विद्यार्थिनी रस्त्याच्या बाजूला घरासमोर … Read more

राहुरीत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार

राहुरी :- तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार झाले. शनिवारी मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास नगर-मनमाड मार्गावर या घटना घडल्या आहेत. पहिला अपघात राहुरी फॅक्टरी येथील संख्येश्वर पेट्रोल पंपाजवळ झाला. रमेशकुमार थापा (वय २१, नेपाळ) हा तरूण मोटरसायकलीवरून (एमएच १७ एए ७९९६) राहुरीकडून लोणीच्या दिशेने जात होता. राहुरी फॅक्टरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून रमेशकुमार जागीच ठार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नववीतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक !

पारनेर :- विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या अविनाश वामन मधे (२० वर्षे, म्हसोबा झाप) याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याची पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. मधे हा दुचाक्या चोरीतील आरोपी असल्याची माहितीही पुढे आली. २२ नोव्हेंबरला ही मुलगी मैत्रीणीबरोबर पवळदरा येथून शाळेत निघाली असता घाटात अविनाश दुचाकीवरून आला. … Read more

नगर-दौंड महामार्गावर अपघातात एक जागीच ठार

श्रीगोंदे :- तालुक्यातील नगर-दौंड महामार्गावर विसापूर फाट्याजवळ टाटा सफारी वाहनाचा वेग चालकाला आवरता न आल्याने वाहन उलटून चालक जागीच ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले. महानुभाव पंथाच्या लोकांना धार्मिक कार्यासाठी नगरहून फलटणकडे घेऊन जाणाऱ्या टाटा सफारी (एमएच १६. एजे ५०६७) वाहनाचा रविवारी सकाळी ७ च्या सुमारास विसापूरफाट्या जवळ अपघात होऊन वाहनचालक चंदन किसन शिंदे … Read more

जिल्ह्यातील ‘हे’ आमदार शरद पवार यांच्यासोबत

अहमदनगर – राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला. त्याचे धक्के राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात बसले. राजकीय विश्वच हादरून गेले. त्याला कारणही तसेच आहे.  भाजपाने राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. सत्तास्थापनेवेळी अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील 11 आमदार गेल्याचे … Read more

आमदार निलेश लंकेना भेटताच उद्धव ठाकरे म्हणाले …ओळखता आले नाही पण…

मुंबई – ज्या तालुका प्रमुखाची दोन वर्षापूर्वी पक्षातून हकालपट्टी केली. त्याच व्यक्तीची म्हणजेच पारनेर नगर चे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पाठीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. आणि त्यांच्या साधेपणा व संघटन कौशल्याचे तोंड भरून स्तुती केली. रविवारी रेनी सन्स या मुंबईतील हॉटेलमध्ये हा क्षण इतर आमदारांना अनुभवायला मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग … Read more

राज्याला आता स्थिर सरकार मिळणार -कोल्हे

कोपरगाव : भारतीय जनता पक्षाचे पहिल्यापासून राज्याला स्थिर सरकार देण्याचे वचन दिलेले होते. त्याप्रमाणे येथील मतदारांनी भाजपा-सेना महायुतीला कौलही दिला होता.  मात्र गेले महिनाभर मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या नाट्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारला पाठींबा देवुन शेतकरी हितासाठी जो निर्णय घेतला त्यामुळे आता स्थिर सरकार मिळणार आहे,असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष … Read more

सरकार दिलेल्या कालावधीतच बहुमत सिध्द करेल -आ. विखे पाटील

शिर्डी : राज्यातील जनतेने भाजप सरकारला बहुमत दिल्याने भारतीय जनता पार्टीचेच सरकार सत्तारुढ होईल हे निश्चितच होते. आता राज्यपालांनी दिलेल्या कालावधीत सरकार आपले बहुमत नक्कीच सिध्द करेल, असा विश्वास माजी गृहनिर्माण मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अशी टिका करणाऱ्या खा. … Read more

युवकाचा मुळा धरणात बुडून मृत्यू

राहुरी: मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटर मध्ये गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशांत उत्तम खांडेकर असे या मृत युवकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील जांभळी येथील १५ वर्षे वयाचा प्रशांत उत्तम खांडेकर हा मेंढ्या धुण्यासाठी मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेला होता. त्याच्याबरोबर अनिल खेळणार, अंकुश बाचकर हे देखील होते. मुळा धरणाच्या … Read more

घराच्या कपाटातून चोरटयाने सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवले

संगमनेर: संगमनेर शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरटयांनी धुमाकूळ घालत एच.डी.बी स्व्हिहसेस फायनान्शियल कंपनीचे कार्यालय फोडल्याची घटना ताजी असतानाच शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास पुन्हा चोरटयांनी धुमाकूळ घालत रायतेवाडी याठिकाणी घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार ४८५ रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा केला आहे. त्यामुळे आता … Read more

अहमदनगर महापालिका सत्ता पॅटर्न आता राज्यात ?

अहमदनगर : अहमदनगरच्या महानगरपालिकेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली आहे.नगरचा हा सत्ता पॅटर्न आता राज्यात राबविण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपने राज्यात हाच पॅटर्न राबवित सत्ता स्थापन केली आहे. सन २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात नगरच्य मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाली होती.या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक २४,राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

हॉटेल सोडून जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना शिवसेना नेत्यांनी पकडले ? आणि नंतर ……

अहमदनगर :- बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आपल्या आमदारांच्या सुरक्षीततेसाठी हे तिन्ही पक्ष सावध झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काल दिवसभर धावपळ करुन सायंकाळपर्यंत आमदार गोळा केले आहेत सध्या या आमदारांवर छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांचे विशेष लक्ष आहे. आता शिवसेनेचे आमदार मुंबईत हॉटेल ललितमध्ये आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे … Read more