माजीमंत्री बबनराव पाचपुतेच ठरविणार देवेंद्र फडणवीस – अजित पवारांचे भवितव्य !

अहमदनगर :- कालची सकाळ राजकीय भूकंपानेच उजाडली. अजित पवार यांनी बंडखोरी करत थेट भाजपशी हातमिळवणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.या बंडखोरीची बक्षिसी म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे. मात्र याच बंडखोरीमुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विधानसभेत … Read more

पक्षात फूट पडली कि नाही हे मला माहीत नाही – आमदार नीलेश लंके

पारनेर :- मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून विजयी झालो असून पक्षाबरोबरच राहणार आहे. पक्षात फूट पडली किंवा नाही हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी पक्ष मजबूत असून पक्षाच्या बैठकीस आपण उपस्थित राहणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या बातम्या दूरचित्रवाहिनीवर सुरू झाल्यानंतर … Read more

धरणात पोहायला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

राहुरी :- मित्रांसमवेत मुळा धरणात पोहायला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली. प्रशांत उत्तम खांडेकर (वय १५, जांभळी, ता. राहुरी) असे या मुलाचे नाव आहे. मृतदेह दुपारी साडेबाराच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. मुळा धरणाच्या बॅकवाटरमध्ये प्रशांत हा मित्र अप्पा बाचकर, अनिल खेमनर, अंकुश बाचकर यांच्यासह पोहायला गेला होता. त्या ठिकाणी … Read more

नव्या सरकारामुळे आमदार मोनिका राजळेही झाल्या चकीत….

पाथर्डी |धक्कादायक व अनपेक्षित बातमीने पाथर्डी तालुका झोपेतून जागा झाला. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांच्या शपथविधीने सर्वांनाच चकीत केले. आमदार मोनिका राजळे यांनाही शपथविधीबाबत काहीच कल्पना नव्हती. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मात्र नेत्यांचा कल पाहून प्रतिक्रिया व्यक्त करणे पसंत केले. ‘मी पुन्हा येणार’ अशी ग्वाही … Read more

कांदा @ ८३०० रुपये !

पारनेर : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याला क्विंटलमागे आजवरचा उच्चांकी ८३०० रुपये इतका दर मिळाला. परतीच्या पावसानंतर कांद्याचे दर कडाडले असून राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये रोजच कांद्याच्या दराचे उच्चांक मोडले जात आहेत. कांदा दर वाढल्यामुळे घरगुती ग्राहक व हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) झालेल्या कांदा लिलावात जुन्या … Read more

पारनेर मध्ये भांडणात एकाचा मृत्यू,एक गंभीर जखमी

पारनेर : तालुक्यातील घाणेगाव परिसरातील पारधी समाजातील लोकांमध्ये जोरदार हाणामारी होऊन एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. सुपा पोलीस स्टेशनला शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीत घटनेतील जखमी अक्षय अर्पण भोसले वय 17 वर्षे याने म्हटले आहे, मंत्री सिराज चव्हाण (रा. वाघुंडे) उंबर्‍या लहिन्या काळे, अक्षय उंबर्‍या काळे, संगड्या उंबर्‍या काळे, मिथुन उंबर्‍या काळे आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पबजी खेळण्याच्या व्यसनातून व्यावसायिकाच्या मुलाचा मृत्यू !

कर्जत :- पबजी गेम खेळण्याचा व्यसनातून कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील युवक सुयोग अरुण क्षीरसागर (वय 23) या तरुणाने जीव गमविला आहे. मिरजगाव येथील व्यावसायिक अरुण क्षीरसागर यांचा मुलगा सुयोग याला गेल्या वर्षापासून पबजी गेमच व्यसन लागले होते. सुयोग हा सुशिक्षित तरुण होता. बारावीच्या शिक्षणा नंतर वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागला होता. एक चांगला कुशल कारागीर … Read more

नगर शहरातील त्या वेश्या व्यवसायाबाबत धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर :- शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात एक महिलेला ताब्यात घेतले आहे. तर एका पिडीत बांग्लादेशीय तरूणीची सुट्का कारण्यात आली आहे.  तारकपूर बसस्थानकासमोरील प्रेरणा आर्केड बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. एक एजंट महिला, बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या नंतर याबाबत धक्कादायक … Read more

खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना केले हे भावनिक आवाहन

मुंबई :- आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित पवार भाजपला मिळाल्याचं यातून स्पष्ट झालं. या सगळ्या घडामोडींमुळं एकीकडं राज्यात खळबळ उडाली असताना पवार कुटुंबीयांमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे. फक्त सत्तेसाठी पवार कुटुंबात फाटाफूट नको, अजित दादा काहीही कर, पण लवकर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे, अस भावनिक … Read more

अजित पवार उपमुख्यमंत्री होताच नगर जिल्ह्यातील या गावात जल्लोष !

अहमदनगर :- महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांनंतर राष्ट्रपती राजवट संपली आणि नवं सरकार स्थापन झालं. सत्तासंघर्षात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारत आपलं सरकार स्थापन केलंय . आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे जन्मगाव असलेल्या देवळाली प्रवरा येथे  आनंद व्यक्त करण्यात आला. येथील भाजप कार्यकर्ते प्रकाश पारख यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदी … Read more

माजी खासदार दादा पाटील शेळके अनंतात विलीन

नगर  – ज्येष्ठ नेते व माजी खासदार मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके ( वय ७९ ) यांचे शुक्रवारी आजाराने निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी खारेकर्जुने ( ता . नगर ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी राजकीय, सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दादा पाटील शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा सहकारी बँकेचे … Read more

नव्या सरकारबाबत आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ही प्रतिक्रीया

शिर्डी :- विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेन भाजपालाच पसंती दिली होती.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येणार हा आत्मविश्वास आम्हाला होता, मी पुन्हा येईन असे जनतेला त्यांनी  दिलेले अभिवचन त्‍यांनी कृतीतुन खरे करुन दाखविले असल्‍याची प्रतिक्रीया माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या ७० व्‍या गळीत हंगामाच्‍या कार्यक्रमानंतर आ.विखे … Read more

खासदार सुजय विखे पाटील नव्या सरकार बाबत म्हणतात ….

अहमदनगर :- आज सकाळी झालेल्या राज्याच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचा झटका मलाही बसला अशी प्रतिक्रिया खा.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि भाजपाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा … Read more

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सहाही आमदार शरद पवार यांच्या मागे !

अहमदनगर :- आज सकाळी अचानक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. या निर्णयाची मतदारांना जशी कल्पना नव्हती तशी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना देखील कल्पना नसल्याचे समजते. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. यापैकी सर्व आमदार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी … Read more

नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

नगर: महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर पंपिंग स्टेशन येथील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर, तसेच विळद पंपिंग स्टेशन येथे बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पंपिंग स्टेशनहून होणारा पाणीपुरवठा बंद झाला. वीजपुरवठा सुरू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधन

अहमदनगर : माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके (वय 79) यांचे आज रात्री निधन झाले नोबेल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांचा अंत्यविधी  खारे खर्जुने येथे उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे. १९९६ मध्ये वयाच्या ५५ व्या वर्षी दादापाटील शेळके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार झाले होते.  शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा … Read more

तरुणीला लग्नासाठी बोलावून बेडरुममध्ये बलात्कार

लोणी  – लग्न करतो असे म्हणून लोणी ता . राहाता येथे घरी बोलावून बेडरुममध्ये नेवून ३४ वर्षाच्या तरुण महिलेवर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार २२ जुलै २०१९ रोजी ११ च्या सुमारास घडला . पिडीत महिला सोलापूर परिसरातील आहे. या प्रकरणी काल पिडीत महिलेने लोणी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी कैलास ज्ञानेश्वर विखे , रा . लोणी , … Read more

अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आजपासून जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर – जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक दिनांक २३ व २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.   नाशिक विभागात श्री. दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांचे दोन सदस्यीय पथक येत असून ते काही ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत.   या … Read more