अहमदनगर ब्रेकिंग : पूर्व वैमनस्यातून मजुरावर ॲसिड हल्ला !

अकोले | पूर्व वैमनस्त्यातून टाकाहारी गावात ॲसिड टाकून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. अमृता भिमा पथवे (मूळ, रा. चास, ता. सिन्नर) असे जखमीचे नाव आहे. आरोपीने २६ जानेवारी रोजी अमृता पथवे यांच्या घरात न विचारता प्रवेश करत प्लास्टिक बादलीमध्ये आणलेेले ॲसिड पथवे यांच्या अंगावर टाकले. यामुळे पथवे यांना नाशिक सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसाचा नरबळी, पत्नीचा संशय

अहमदनगर शहरातील एका मठात राज्य राखीव पोलिस दलातील प्रमोद बबन राऊत (वय ३१, रा. शिवनगर, पाईपलाईन रोड, नगर) यांचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. परंतु राऊत यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा घातपात झाला आहे. तसेच हा प्रकार नरबळी असल्याचा संशयही व्यक्त करत मठातील भोंदूबाबांसह सेवेकऱ्­यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राऊत यांच्या पत्नी … Read more

गायीच्या पोटात आढळले ६५ किलो प्लास्टिक !

अहमदनगर :- महापालिकेमार्फत मोकाट जनावरे पकडण्यात येत आहे, पकडलेल्या जनावरापैकी तीन जनावरे दगावली आहेत. दोन जनावरांच्या पोटात सुमारे ६५ किलो प्लास्टिक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. दरम्यान, मनपामार्फत पकडण्यात आलेल्या ३४ जनावरांची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मनपामार्फत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहिम हाती घेतली आहे. महिनाभरापूर्वी राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मनपाच्या कोंडवाड्याची … Read more

पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या तरुणास जन्मठेप

नेवासा :- पत्नीचा गळा आवळून खून केल्याच्या खटल्यातील नेवासा तालुक्यातील वाटापूर येथील दोषी पतीस जन्मठेप व दंड तसेच पतीसह छळाच्या गुन्ह्यात सासू ससासर्‍यांना दोन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी सुनावली. याबाबत माहिती अशी की, आरोपी पती किशोर मुरलीधर बाचकर, सासरा मुरलीधर सबाजी बाचकर व सासू तान्हाबाई मुरलीधर … Read more

नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात घरातूनच नाराजीचे बॉम्ब

नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर घरातूनच नाराजीचे बॉम्ब बरसू लागले आहे.अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील अंतर्गत कलह समोर आला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पक्षाला चांगली कामगीरी करता आली नाही. यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब … Read more

वादात सापडलेली नगर अर्बन बँक पुन्हा एकदा चर्चेत

अहमदनगर :- वेळोवेळी वादात सापडलेली नगर अर्बन बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बँकेच्या शेवगाव येथील शाखेत सुमारे सात लाख रुपयांचे बनावट सोने तारण म्हणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तारण ठेवलेल्या सोन्याची लिलाव प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार समोर आला. याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक एस. सी. मिश्रा … Read more

अपघातातील मृत व्यक्तीवरच गुन्हा दाखल

शेवगाव | अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीवरच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची वेळ शेवगाव पोलिसांवर आली. मुळचे एरंडगाव येथे राहणाऱ्या मनोज विष्णू नजन (सध्या श्रीकृष्णनगर शेवगाव, वय ३१) याचा १२ रोजी रात्री शहरातील साई आनंद एजन्सीसमोर बुलेट या वाहनावरून पडून अपघाती मृत्यू झाला. पोलिस त्या ठिकाणी गेले. त्यांनी मनोज यास ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या युवक युवतींना पोलीसी पाहुणचार

श्रीगोंदा पोलिसांनी मागील काही दिवसांपासून बेशिस्त वर्तणूक करणाऱ्या, कायदा मोडणाऱ्या लोकांकडे आपला मोर्चा वळवला असून त्याचाच एक भाग म्हणून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दुपारी अचानक शहरातील काही कॅफे सेंटरवर जाऊन त्यांची तपासणी केली.  शहरात कॅफे सेंटरमध्ये महाविद्यालयाचे तरुण तरुणी अश्लील चाळे करतात, काही गैरप्रकार या कॉफी सेंटरमध्ये होत असल्याच्या अनेक तक्रारी पो नि … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी इंटरनेट आणि वायफाय बंदी !

अहमदनगर ;- इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नगरमधील परीक्षा केंद्रांवर इंटरनेट आणि वायफाय बंदी करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावरील कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे निर्देश दिले आहेत.  आज जिल्हाधिकारी राहल द्विवेदी यांनी दक्षता समितीसोबत बैठक घेतली . यावेळी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांचा आणि परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला . यावेळी परीक्षा सुरू असताना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ पीएसआय’ च्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

श्रीरामपूर तालुक्यात रात्रीच्या वेळेस गस्तीवर असणाऱ्या पीएसआय पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार काल रात्री घडला . पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडल्याने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की , कर्जत येथील जेलमधून ४ आरोपी काल फरार झाल्यानंतर जिल्हाभर पोलीसांनी नाकेबंदी केली. श्रीरामपुरातही नेवासा रोडवर बाजार समितीच्या पेट्रोल पंपासमोर … Read more

‘त्या’ नराधमाचा क्रूर चेहरा समोर…मुलाला सुरीचा धाक दाखवून मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार

अहमदनगर :- शहरातील रेल्वे स्टेशन येथे समोसा विकणाऱ्या मुलावर एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय.   मुलाने विरोध केल्यानंतर त्याच्या अंगाचे चावे घेऊन त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.  रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पत्तीस ते चाळीस वर्षांची एक व्यक्ती मुलाला … Read more

दहा वर्षांच्या मुलीचा झोका खेळताना मृत्यू

श्रीरामपूर | राहाता तालुक्यातील नांदूर येथील आकांक्षा सोनल आवारे (वय १०) या बालिकेचा झोका खेळताना मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झोका खेळताना बेशुद्ध पडल्याने आकांक्षाला साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2020/02/08/ahmednagar-breaking-corona-virus-suspected-patient-admits-to-hospital/

अहमदनगर ब्रेकिंग : चार खतरनाक आरोपी जेल तोडून पसार

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून चार खुणाच्या गुन्ह्यातील जेल तोडून पसार झाले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. दरम्यान फरार आरोपींचा पोलीस तपास करत आहेत. कर्जत पोलीस स्टेशनच्या जेलमधील कस्टडी क्रमांक तीन येथे असलेले चार खुणी आरोपी अक्षय रामदास राऊत, … Read more

राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

मुंबई : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. शनिवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद साताऱ्यात ११.६ अंश सेल्सिअस करण्यात आली. मागील तीन ते चार दिवस पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा … Read more

अवकाळी पावसाने शेतकरी व नागरीकांची उडाली धांदल

संगमनेर :- तालुक्यातील आश्वीसह परिसराला शनिवारी सायंकाळी सुमारे तासभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी व नागरीकांची चागलीच धांदल उडाली.  गव्हाच्या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. शनिवारी सकाळी थंडी वाजत होती, तर दुपारी आभाळ आल्याने हवेत उष्णता वाढली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आश्वीसह परिसराला … Read more

धक्कादायक : अहमदनगर शहरात 14 वर्षांच्या परप्रांतीय मुलावर चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार !

नगर शहरातील कल्याण रोडवरील लोंढे मळा परिसरात समोसे विक्री करणार्‍या 14 वर्षांच्या परप्रांतीय मुलावर नराधमाने चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या छाती व पोटाला चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.जखमी अल्पवयीन मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील केडगाव देवी मंदिर रोडवर शुक्रवारी (दि. 7) रात्री 8 … Read more

सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीगोंदे फॅक्टरी येथील सावकारांच्या जाचाला कंटाळून मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या तरुणाने बुधवारी विषप्राशन केले. त्याचा शनिवारी मृत्यू झाला.  दत्ता गणपत सुतार (वय ३५) हा तरुण शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करत होता. काही सावकारांकडून त्याने आठवड्याला १० टक्के दराने कर्ज घेतले होते. अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतल्यामुळे त्याला ते फेडता येत नव्हते. सावकार दारात येऊन त्याला मारहाणीची धमकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून महिलेवर बलात्कार

श्रीरामपूर :- शहरातील तीस वर्षांच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात अजित बाबुराव दुधाळ (कांदा मार्केट, शेळके हॉस्पिटलजवळ, श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेने शुक्रवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, आपण घरी एकटी असताना आरोपी आला. लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला … Read more