पारनेर मध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
निघोज :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यात अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी आढळला. ३५ वय असलेल्या या महिलेच्या अंगावर लाल काळा रंगाचा सलवार व कुर्ता असून पांढऱ्या रंगावर काळे ठिपके आहेत. मृतदेह कुजला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी मृतदेह कुंड परिसरात पुरण्यात आला.