अहमदनगर ब्रेकिंग : श्रीरामपूरच्या तरुणाची युवकाची गोळीबारातून हत्या,आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूरच्या फरदीन आब्बू कुरेशी या युवकाला बळजबरीने नाशिक येथे नेऊन व नंतर लोणी येथे आणून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. यागुन्ह्यातील पसार असलेला आरोपी उमेश भानुदास नागरे (वय- 33 रा. लोणी ता. राहाता) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेेरबंद केले आहे.  या गोळीबार प्रकरणात यापूर्वी सिराज उर्फ सोल्जर आयूब … Read more

या पोरीचा कोणी नाद करायचा नाय, असे म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील एका अल्पवयीन मुलीस करण अर्जुन सांगळे (रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) याने भर रस्त्यात अपमानास्पद वागणूक दिल्याने त्याच्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअतंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मी शाळेतून घरी … Read more

प्रेमसंबंध ठेव म्हणत प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘प्रेमसंबंध ठेव’ म्हणत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील असिफ कबीर पठाण या तरुणाने राहुरी विद्यापीठाच्या उजव्या कालव्याजवळ विवाहित महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती महिला गंभीर जखमी झाली. एखाद्या फिल्मी ‘लवस्टोरी’लाही लाजविणारी ही घटना रविवारी सायंकाळी घडली.  प्रेयसीवर धारदार सुऱ्याने वार करून फरार … Read more

के के रेंज विस्तारीकरणाबद्दल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यातील के. के. रेंजमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनींसंदर्भात पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.  यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अँड स्कूलचे लेफ्टनंट कर्नल रोहित वाधवान, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे उपस्थित होते. लेफ्टनंट कर्नल वाधवान यांनी रेंज एक व दोनमध्ये समाविष्ट जमिनींविषयीची … Read more

अजित पवारांच्या ‘कारखान्याचे’चे दूषित पाणी ओढ्यात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथे असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंबालिका साखर कारखान्याचे रसायन व मळीमिश्रित सांडपाणी थेट कारखान्याजवळील ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. या पाण्यामुळे खालच्या भागातील गावे वस्त्यांवरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यातील मासे व इतर जलचरही मृतावस्थेत आढळून येत आहेत. हा ओढा पुढे भीमा … Read more

पाटाच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह आढळला

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं 3 मधील साईनगर बाजारतळ परिसरात पाटाच्या पाण्यात नाऊर येथील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. गणेश आप्पासाहेब शिंदे (वय 21) असे मयत तरुणाचे नाव आहे. काल रविवार दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरात पाटाच्या पाण्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टर शेतकर्‍यासह विहिरीत पडल्याने शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव-देवळा रस्त्यावर एसटी बस आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातही असाच प्रकार घडलाय. कर्जत शहरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जामदारवाडा येथे मोहनराव लाढाणे या शेतकर्‍याच्या विहिरीमध्ये टॅक्टरसह पडून कानिफनाथ रामदास बळे (वय 22) … Read more

साखर कारखान्यात ३६ लाखांचा अपहार : प्रा.तुकाराम दरेकर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्याने २०१७-१८ च्या गळीत हंगामात आपल्या नातेवाईकांच्या आणि जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावावर न आलेल्या १ हजार ३६८ टन उसाच्या स्लिपा फाडून प्रतिटन २१०० रुपये ऊस पेमेंट आणि प्रतिटन सुमारे ५५० रुपये तोडणी-वाहतूक काढून ३६ लाख २३ हजारांचा अपहार केल्याची चौकशी प्रादेशिक सहसंचालकांनी तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग – … Read more

कांद्याच्या भावात झाली इतकी घट

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर लाल कांद्याला १९०० ते २५०० रूपये क्विंटल भाव मिळाला. शनिवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर एक नंबर कांद्याला २००० ते २८०० रूपये क्विंटल भाव मिळाला होता. शनिवारच्या तुलनेत क्विंटलमागे ३०० रूपयांनी भाव उतरले. रविवारी ६ हजार २३० गोणी लाल कांद्याची आवक झाली. दोन … Read more

हॉटेलमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निफाड तालुक्यातील कोठुरे येथील व्यक्तीने हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजता येथील बसस्थानकासमोरील हॉटेल हिरामध्ये उघडकीस आली. धनंजय बाजीराव आभाळे (५५) असे मृताचे नाव आहे. आभाळे यांनी शुक्रवारी हॉटेल हिरामधील रूम घेतली होता. शनिवारी जेवण करून ते रूममध्ये गेले. रविवारी सकाळी वेटरला रूममधून प्रतिसाद … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- येसगाव ग्रामपंचायत हद्दीत गारदा नदीच्या पुलाजवळ एका अज्ञात इसमास अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन तो बेपत्ता झाला असल्याची खबर कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील रुग्णवाहिका चालक अमित साहेबराव खोकले यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. खोकले मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास … Read more

माजीमंत्री मधुकर पिचड म्हणाले त्या प्रकरणाशी माझा काहीही सबंध नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सन २००४ ते २००९ या कालावधीत विविध विकास योजना राबविताना अधिकाऱ्यांनी अपहार केल्याचे उघड झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल झाले. याच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी सांगितले. राजूर प्रकल्प कार्यालयातील अपहारप्रकरणी पिचड यांना विचारले असता … Read more

अहमदनगरमध्ये चारा छावणीत गैरव्यवहार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळात राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावणीत जनावरांची संख्या खोटी दाखवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तक्रारी आलेल्या चारा छावण्यांची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पातळीवरील समिती गठित करण्यात आली असून, समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री … Read more

कर्जमाफीपासून हिवरे बाजार वंचित ! कारण वाचाल तर तुम्हालाही धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ नगर तालुक्यातील १५ हजार १९ शेतकऱ्यांना झाला. त्यांचे ९१ कोटी ६५ लाख ८४ हजारांचे कर्ज माफ झाले. आदर्श गाव हिवरे बाजारच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची १०० टक्के वसुली असल्याने त्यांचा एकही कर्जदार थकीत नसल्याने ते गावच कर्जमाफीपासून वंचित राहिले. २०१४ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेलचालकाच्या हत्येप्रकरणी श्रीगोंद्यातील आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील घारगाव शिवारातील हॉटेल प्राईडचे मालक अशिष चंद्रकांत कानडे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांची हत्या श्रीगोंद्यातील सुरेगावातील दरोडेखोर सगड्या उंबर्‍या काळे यांच्यासह त्याच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सगड्याला जेरबंद करण्यात आले आहे.  अशिष कानडे यांच्या मालकीचे घारगावात हॉटेल आहे. तेथे ते 18 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे … Read more

आजीसमोरच तीन वर्षांच्या नातीवर बिबट्याची झडप,रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर आजीजवळ खेळत असलेल्या तीन वर्षांच्या नातीवर बिबट्याने झडप घातली. जवळपासच्या नागरिकांनी या चिमुरडीची सुटका केली, पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.  ही घटना रात्री ७.४५ च्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे घडली. गळनिंब येथील ज्ञानेश्वरी नामदेव मारकड ही चिमुरडी अंगणात खेळत होती. तिच्याजवळ आजीही होती.  आजी आपल्या नातीला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एसटी बसने महिलेला चिरडले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- रस्ता ओलांडत असताना पादचारी महिलेला एसटी बसने चिरडले. ही घटना स्टेट बँक चौकात दुपारी दोन वाजता घडली.  अंजना धीवर (वय- 60 रा. कापुरवाडी ता. नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. अंजना धीवर या स्टेट बँक चौकात रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एसटी बसची अंजना धीवर यांना जोराची धडक बसली.  या अपघातामुळे … Read more

थंडीचा कडाका पिकांना ठरणार फायदेशीर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या दोन दिवसांपासून राहुरीच्या पूर्व भागात थंडीचा कडाका वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. कारण ही थंडी गहू, हरभरा व कांदा पिकास अनुकूल असल्याने पिकांची वाढ होण्यास मदतच होईल.  राहुरीच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, पिंपरी, वळण, महाडूक सेंटर, मांजरी आदी गावातील लाभक्षेत्रात शेतकरी बांधवांनी यंदा आपल्या शेतात मोठ्या … Read more