Ahmednagar News : सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस, तापमानाचा पारा १० अंशावर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारनंतर पुन्हा एकदा काल बुधवारी (१० जानेवारी) अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह चाकरमान्यांची चांगलीच भंबेरी उडाली. २४ तासांत जिल्ह्यात १.१ मिलिमीटर पाऊस झाला. पावसासोबत थंड हवा असल्याने हुडहुडी भरली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद मंगळवारी (९ जानेवारी) झाली. शहराचे तापमान १० अंश सेल्सिअस … Read more

तालुक्यातील तीन वेगवेगळ्या अपघातात एका बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यात काही तासांच्या अंतराने तीन वेगवेगळ्या अपघातात वेदांश रविंद्र पवार, (वय ३), योगीराज दिलीप चाकणे (वय ४१) रा. चांडगाव व तुषार लोणकर रा. श्रीगोंदा, या अशा तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. काष्टी येथे नगर- दौंड रस्त्यावर दुचाकी आणि टेम्पोच्या झालेल्या अपघातात श्रीगोंद्यातील तुषार लोणकर … Read more

Ahmednagar News : राजेंद्र नागवडे सपत्नीक अजित पवारांच्या भेटीस ! अहमदनगरच्या राजकारणात ‘ट्विस्ट’, विखे-पाचपुते टेन्शनमध्ये

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरच्या राजकारणात विविध घडामोडींची वेग घेतला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुशंघाने विविध घडामोडी घडत आहेत. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यापासून राष्ट्रवादीची (अजित पवार गट) ताकद वाढीस लागली आहे. शरद पवार गट सक्रिय झाल्यानंतर अजित पवार हे आपली पाळेमुळे अहमदनगरमध्ये भक्कम करण्यास सरसावले आहेत. आता आणखी एक महत्वाची बातमी आली … Read more

Ahmednagar News : सोयाबीनचा कोट्यवधींचा पीकविमा मिळताच शेतकरी खुश ! मंत्री राधाकृष्ण विखेंचा नागरिकांकडून सन्मान

Ahmednagar News

Ahmednagar News : पालकमंत्री तथा महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य विश्वनाथ कोरडे व सहकाऱ्यांनी पारनेर शेतकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. पारनेर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ अंतर्गत १६ कोटी रूपये अग्रिम रक्कम वाटपास मंजुरी देऊन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांत … Read more

Ahmednagar News : चौदा चोऱ्या व दरोडे..पुन्हा दरोडा टाकायला निघाली टोळी..पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील चोरी, दरोडे आदी घटनांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर आले आहे. आता एक मोठी कारवाई पोलिसांनी केली असून सशस्त्र दरोडा टाकायला निघालेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. या टोळीवर विविध पोलिस ठाण्यात १४ चोरी व दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक म्हणजे यात एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. … Read more

Ahmednagar News : दूषित पाण्याने आरोग्य बिघडले ! जिल्ह्यात दोन हजार अतिसाराचे रुग्ण

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दूषित पाणी ही देखील एक मोठी समस्या बनली आहे. अनेक गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु या दूषित पाण्याने सर्वसामान्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. सध्या या दूषित पाण्यामुळे अतिसार हा आजार चांगला वाढू लागला आहे. जिल्ह्यात अतिसार आजाराची लक्षणे असलेले जवळपास २ हजार ४४ … Read more

रविवारी रंगणार अनोखा मैत्री कट्टा! सखदेव, रेगे, डॉ. कोयाडे साधणार नगरकरांशी संवाद

Ahmednagar News

Ahmednagar News : निखळ मैत्रीचा ध्यास घेऊन नगरमध्ये सुरू झालेल्या मैत्री कट्टा या उपक्रमाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम नगरकरांना संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. 14) अनुभवायला मिळणार आहे. मैत्रीच्या परिभाषेचे विविध पैलू उलगडण्यासाठी तीन खास पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लेखक प्रणव सखदेव, समाज माध्यमतज्ज्ञ प्राची रेगे व लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला … Read more

अवकाळीने आणली शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’! ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव : थंडीने नागरिकांना भरली हुडहुडी

Ahmednagar News

Ahmednagar News : सलग दोन वर्षांपासून शेती व्यवसाय वातावरणाच्या लहरीपणामुळे तोट्यातच जात आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असतानाच अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या रब्बीच्या पिकांना मंगळवारी पुन्हा पावसाने झोडपले, नगर शहरासह, तालुक्यात व जिल्ह्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत … Read more

प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका : आ. तनपुरे

Ahmednagar News

Ahmednagar News : जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नगर-मनमाड रस्ता, मुळा डॅम फाटा ते मुळा नगर रस्त्याच्या कामास विलंब करणाऱ्या राज्यातील विद्यमान सरकारच्या काळात प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका असल्याची टिका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. येथील नगर-मनमाड रस्त्यावरील मुळा डॅम फाट्यावर काल मंगळवारी (दि.९) रस्ता रोको आंदोलन प्रसंगी आमदार प्राजक्त … Read more

ढगाळ हवामानामुळे पिकांवर होतोयं रोगाचा प्रादुर्भाव ! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषध फवारणी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे नगदी पीक म्हणजे कांद्याचे पीक. या पिकाची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा लागवड जरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली असली पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, ढवळेवाडी, पाडळी परिसरात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणारे धुके, यामुळे कांदा पिकांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत … Read more

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचे संकट

Ahmednagar News

Ahmednagar News : अगोदरच पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बीची परवड होवून वाताहत झालेली असताना चालू वर्षी प्रारंभीच ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर रोगराईचे संकट पसरले आहे. दूषित वातावरणामुळे मात्र गहू, हरभरा, कांदा तसेच पालेभाज्या पिकांवर मावा, थ्रिप्स, अळीचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यासोबत अवकाळीची संक्रात मानगुटीवर बसते की काय, याचा धसका शेतकरी वर्गाने घेतला आहे. … Read more

Ahmednagar News : पारनेर तालुक्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

Ahmednagar News

Ahmednagar News : मंगळवारी पारनेर तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस झाल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर पारनेर तालुक्यात संततधार पाऊस पडल्याने जनजीव ठप्प झाले होते तर या पावसाने पिकांना धोका निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात गहू व ज्वारी ही पिके दाणा भरणीत आसतात तर काही कांदा पिके काढणीत आसतात, आशात दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर … Read more

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा, शेतकरी संघटनेची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सरकारने दुष्काळ्सास्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली असताना नगर जिल्हा सहकारी बँकेने त्याविरूद्ध जाऊन वसुलीचे आदेश दिले. त्यामुळे सहकार अधिनियमातील कलम ७९ अ मधील तरतुदीच्या उल्लंघनामुळे संचालक मंडळाला बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने नाशिकच्या विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा निर्णय वादात सापडला आहे. या … Read more

साईचरणी २९ लाखांचा सुवर्णमुकुट अर्पण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या येथील श्री साईबाबांच्या झोळीत सोने, चांदी, रत्नजडित हिरे, रोख रक्कमेसह मौल्यवान वस्तूंच्या दानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल मंगळवारी (दि. ९) बंगळुरू येथील दानशूर साईभक्त डॉ. राजाराम कोटा यांनी सुमारे २९ लाख ४ हजार ९८२ रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला. देश-विदेशातील भाविकांनी साईबाबांच्या शिरपेचात आतापर्यंत … Read more

Ahmednagar News : मोटारसायकलने धडक दिल्याने युवक ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या तीन युवकांना मोटारसायकलने धडक दिल्याने अनिकेत महादेव अकोलकर हा जागीच ठार झाला तर फुलारी व चितळे हे दोघे गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना शेवगाव रोडवर हॉटेल निवांत समोर घडली आहे. … Read more

Ahmednagar News : नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठ आरोपींना मोक्का न्यायालयाकडून पोलिस कोठडी, पोलीस कस्टडी देण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यात गाजले होते. यातील आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे कोठडीत होता. दरम्यान त्याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला. आता आरोपी स्वप्निल शिंदे याच्यासह आठही आरोपींना मंगळवारी मोक्का न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. या आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी राहील. नगरसेवक शिंदे, सुरज ऊर्फ मिक्या राजन कांबळे, स्वप्नील रोहिदास … Read more

सशस्त्र दरोडेखोर अन् पोलिसांत थरार सहाजण जेरबंद : तलवारी, मिरची पूडसह घातक शस्त्रे जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : तलवारी, लोखंडी टामी, मिरची पुड,नायलॉन दोरी अशी हत्यारे घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीत अन् नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात रात्रीच्यावेळी नगर – सोलापूर महामार्गावर वाळुंज गावच्या शिवारात असलेल्या पारगाव फाट्याजवळ चांगलाच थरार रंगला होता. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता या दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. घातक शस्त्रे … Read more

हिट ॲण्ड रन कायद्याविरोधात दोन दिवस रिक्षा बंद

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने लागु केलेल्या हिट ॲण्ड रन या कायद्याविरोधात देशभर वाहतूकदारांनी आपला विरोध व्यक्त केला आहे. त्यातच आता जामखेड येथील रिक्षा चालक-मालक सेवाभावी संस्थेच्यावतीने या काद्याला विरोध करण्यासाठी दोन दिवस रिक्षा बंद ठेऊन सरकारचा निषेध केला आहे. या बाबत तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या बाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले … Read more