Ahmednagar News : दूषित पाण्याने आरोग्य बिघडले ! जिल्ह्यात दोन हजार अतिसाराचे रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दूषित पाणी ही देखील एक मोठी समस्या बनली आहे. अनेक गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु या दूषित पाण्याने सर्वसामान्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.

सध्या या दूषित पाण्यामुळे अतिसार हा आजार चांगला वाढू लागला आहे. जिल्ह्यात अतिसार आजाराची लक्षणे असलेले जवळपास २ हजार ४४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 अनेक ठिकाणी क्लोरीनचा वापर

जिल्ह्यात अनेक भागात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवले जाते. काही ग्रामीण भागात स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायत स्तरावर या पाण्यामध्ये क्लोरीनचा वापर करून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते.

पावसाळ्यात, तसेच जलस्रोत आटत असताना पाणी दूषित झाल्याचे दिसून येते. पाण्याचे व्यवस्थित शुद्धीकरण न करता, ते पाणी पिल्यानंतर जलजन्य आजार उद्भवण्याचा धोका वाढतो. दरम्यान जलजन्य आजारात वाढ झाल्याचे दिसून येत असून

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात महिनाभरात २०४४ डायरियाचे रुग्ण सापडले आहेत.

 जिल्हाभरातील तालुकानिहाय रुग्ण :

नगर २४०, अकोले ३२३, जामखेड १०५, कर्जत ५१, कोपरगाव १३, नेवासे ८०, पारनेर ८७, पाथर्डी १३१, शेवगाव १९८, राहता १६१, राहुरी १२७, संगमनेर १२४, श्रीगोंदा ३२४, श्रीरामपूर ८०, एकूण २०४४