बाळासाहेब थोरातांचा संगमनेरमधून उमेदवारी अर्ज दाखल

संगमनेर :- प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड आदी मान्यवर उपस्थित होते. युतीमध्ये ताळमेळ नसून संशयास्पद वातावरण … Read more

साहेबांच्या आदेशाला झुगारणाऱ्या आ. जगताप यांच्या विरोधात पवार कधी का बोलले नाही ?

अहमदनगर :- मी आज सकाळी दिलेल्या राजीनामा काहींच्या जिव्हारी लागला आहे. त्या अस्वस्थतेतूनच त्यांनी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष यांच्यावर दबाव आणून आता मी राष्ट्रवादी युवकचा पदाधिकारीच नव्हतो, असा खोटा कांगावा सुरु केला आहे, असा आरोप किरण काळे यांनी केला आहे. मेहबूब शेख यांची मध्यंतरी पक्षाने युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. त्यावेळी आधीची कार्यकारिणी ही विसर्जित अथवा … Read more

श्रीपाद छिंदम आता विधानसभा निवडणूक लढविणार ?

अहमदनगर: छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. श्रीपाद छिंदमने महाराष्ट्र विधानसभेची तयारी केली आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याने उमेदवारी अर्ज नेला आहे. श्रीपाद छिंदमला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र छिंदमने नगर महापालिका निवडणूक ज्याप्रमाणे अपक्ष लढून जिंकून दाखवली होती, तसंच … Read more

राम शिंदे यांच्यासाठी खासदार उदयनराजे भोसले कर्जतला !

कर्जत ;- राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत -जामखेड विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे प्रा. राम शिंदे असा संघर्ष होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून एकमेकांना शह-प्रतिशह देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यावर पवार यांना शह देण्यासाठी नुकतेच भाजपमध्ये आलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना कर्जतला बोलविण्यात आले … Read more

तर मी खासदारकीचा राजीनामा देईन…

राहुरी ;- राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिलेला असून गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिला, तर संचालक पदाबरोबरच खासदारकीचा देखील राजीनामा देईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी आयोजित ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू, मात्र…

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. जगताप धक्कातंत्र वापरून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. त्यातच जगताप यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता शिल्पा गार्डन येथे पदाधिकारी व मोजक्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, हा … Read more

तेच शिकारीसारख्या गोष्टी करू शकतात :रोहित पवार

जामखेड :- “काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीला शिकारीची हौस आलेली. आपल्या घरचं जनावर मरायला लागलं तर त्याला पाहूण्याच्या दारात नेऊन दावणीला बांधायचा सल्ला देणारेच शिकारीसारख्या गोष्टी करू शकतात. असो, त्यांना कुणीतरी सांगा माणूस असो वा जनावर आम्ही जगवायच्या गोष्टी करतो.” अशी खोचक टीका रोहित पवार यांनी पालकमंत्री राम शिंदेंवर केली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी केंद्रीय दुष्काळ पाहणी … Read more

पवार कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील !

अहमदनगर :- आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. काही तासांपूर्वी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. गेल्या दोन दिवसातील राष्ट्रवादीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच राजकारण … Read more

रोहित पवारांचे डिपाॅझिट जप्त करून बदला घेणार !

जामखेड :- बारामतीची शिकार हातातून जाते काय असे वाटते, परंतु ही शिकार आपल्या हातूनच व्हावी, अशी इच्छा आहे, असे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी पवार यांचे डिपाॅझिट जप्त करून घेणार आहे, असेही ते म्हणाले. सरपंच परिषद महामेळाव्यात शिंदे बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सारोळ्याचे … Read more

Happy Birthday रोहित पवार… राजकीय क्षितिजावरचा नवा तारा !

राज्याच्या राजकीय पटलावर सध्या एका युवकाचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे, ते म्हणजे रोहित पवार…राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीत बसून त्यांच्यांशी आतापर्यंत पवार घराण्याबाहेरील अनेक व्यक्तींनी चर्चा केली असेल; परंतु शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, नातू पार्थ पवार यांच्यासह अन्य कुणालाही वारंवार ही संधी मिळालेली नाही. शरद पवार यांची नात … Read more

कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप यांच्या पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने नगर राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. परंतु आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्न नाही तसेच याबाबत यापूर्वी वेळोवेळी पत्रकार परिषेदत स्पष्ट केले असताना आपल्या उमेदवारीची भीती वाटणारी मंडळीच नाहक आपल्या पक्षप्रवेशाच्या वावड्या उठवित आहेत. आपण आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. … Read more

नेतृत्व पाच वर्षे चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यामुळे तालुक्याच्या पाणीप्रश्नाचे वाटोळे !

श्रीगोंदे :- तालुक्याचे नेतृत्व पाच वर्षे चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यामुळे पाणीप्रश्नावर तालुक्याचे वाटोळे झाले. सामान्य शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. ही चूक सुधारण्यासाठी पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना तालुक्याचे लोकप्रतिनिधी करण्यासाठी संपूर्ण गावाने विजयासाठी एकोपा करून एल्गार पुकारला आहे. यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भगवानराव पाचपुते यांनी केले. तालुक्यातील काष्टी येथील राजयोग मंगल कार्यालयात गुरुवारी … Read more

राजीनाम्यानंतर अजित पवार कर्जतच्या अंबालीका साखर कारखान्यावर !

अहमदनगर :- माजी उपमुख्यमंत्री व शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकारणात खळबऴ माजली आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर अजित पवार यांचा मोबाईलही बंद आहे. दरम्यान अजित पवार नगरमधील कर्जत तालुक्यातील त्यांच्या अंबालीका साखर कारखान्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ते नेमके … Read more

विक्रमसिंह पाचपुते वडिलांना निवडून आणण्यासाठी उतरले मैदानात !

श्रीगोंदे :- माजी मात्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते हे वडील बबनरावांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले आहेत. श्रीगोंदे-नगर मतदारसंघात बबनराव पाचपुते, आमदार जगताप व अनुराधा नागवडे हे इच्छुक आहेत. पाचपुते हे भाजपचे उमेदवार मानले जातात. नागवडे व जगताप हे एकत्र येऊन एकच उमेदवार देणार जाहीर सभेत सांगत असले, तरी भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी दोघे दीड … Read more

श्रीरामपूरच्या सर्वच पक्षांच्या उमेदवारीचा पेच कायम

श्रीरामपूर :- अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नसल्याने नेमकी कोणाला उमेदवारी जाहीर होईल याबाबत कार्यकर्त्यांसह मतदारांनाही उत्सुकता लागली आहे. तालुक्यात प्रभाव असलेल्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह ससाणे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने सर्वच उमेदवार गॅसवर आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे भाजपत, तर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत गेल्याने गेल्या निवडणुकीपेक्षा या … Read more

विधानसभा 2019 : आजपासून अर्ज भरण्यास प्रारंभ

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांसाठीची अधिसूचना शुक्रवारी जारी होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येतील. उमेदवाराला किंवा त्याच्या सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सार्वजनिक सुटी व्यतिरिक्त सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत … Read more

उद्रेक घडवून गुन्हे दाखल करण्याचा सत्ताधाऱ्यांचा इरादा !

अहमदनगर :- सक्तवसुली संचालनालयाने राज्य सहकारी बँकेतील अनियमितेबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह तत्कालीन संचालक मंडळ सदस्य व शरद पवारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केला. ‘संबंधित बँकेवर पवार संचालक नाहीत, त्यांनी कोणतेही कर्ज वितरण केले नाही. केवळ त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या संचालकांनी संबंधित कृत्य केल्याचा उल्लेख आहे. यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

चंद्रशेखर घुले यांना पक्षाने डावलले की त्यांनी माघार घेतली ?

शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत आ.राजळेंसाठी जनादेशा मागितला. त्यामुळे आ. राजळेंना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पक्षांतर्गत इच्छुकांची फिल्डिंग मात्र चांगलीच जोर धरत आहे. त्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केदारेश्‍वरचे अध्यक्ष ऍड. प्रतापराव ढाकणे यांची उमेदवारी … Read more