आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर ! भरचौकात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर…

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होवून तीन दिवस झाले असून नगर-पुणे महामार्गावरील स्टेट बँक चौकात अद्यापही भाजपची पोस्टर झळकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आचारसंहिता भाजपच्या पथ्यावर आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी केली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. आचारसंहिता कालावधीत विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणुक चिन्हे … Read more

झेंडे बदलले, पण तेच नेते एकमेकांविरुद्ध !

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले तरी अद्यापही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आघाडी झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही तर दुसरीकडे जागा वाटपावरूनच युतीचे घोडे अडले आहे. त्यामुळे शिलेदार कोण हे काही चित्र स्पष्ट झाले नाही. भाजप व शिवसेनेतील इनकमिंगमुळे झेंडे बदलले असले तरी चेहरे तेच आहेत. परिणामी गेल्या … Read more

भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणतात रोहित पवारांच्या कामाने मी प्रभावित झालो!

जामखेड :- पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती राजश्री सूर्यकांत मोरे यांचे पती व भाजप जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी नुकतेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात बंड पुकारून भाजपला सोडचिठ्ठी दिली. तसेच ते येत्या २३ तारखेला कर्जत येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद … Read more

काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल !

संगमनेर :- काँग्रेसची अंतिम यादी निश्चित झाली असून आम्ही निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. काँग्रेसमधून आजपर्यंत अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, आता सकाळपासूनच आमच्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करू नका, असे ते म्हणत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये आऊटगोईंग नव्हे, तर इनकमिंग सुरू होईल, असा आशावाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

कर्जत-जामखेड विधानसभेची निवडणूक विखे यांच्या अस्तित्वाची लढाई !

जामखेड :- जिल्ह्याच्या व कर्जत-जामखेड तालुक्यातील सुपुत्राची आपल्या विकास करण्यासाठी गरज आहे, बाहेरच्या उसण्याची उधारीची गरज नाही, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी रोहित पवार यांच्याावर नाव न घेता केली.जामखेड येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, … Read more

‘भाजप चले जाव’चा नारा सर्वांनी द्यावा

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. तेच पर्यटनासाठी खुले करून तिथे आता बार सुरू करण्यास सरकार परवानगी देणार आहे. ज्या किल्ल्यांमध्ये तलवारी तळपायच्या त्या किल्ल्यांमध्ये आता ‘छमछम’ चमकणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीकेचे आसूड ओढले. दरम्यान, आमचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी केली … Read more

राष्टवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर, माजी महापौर अभिषेक कळमकर यांना धक्क्काबुक्की !

अहमदनगर :- राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर येथे शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर कार्यक्रमस्थळावरुन बाहेर पडताना राष्टवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असतांनाच माजी महापौर अभिषेक कळमकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर … Read more

निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या अडचणीत वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी एकूण दीडशेच्या वर साक्षीदार साक्ष देण्यास तयार झाले असून सध्या त्यांच्या जबान्या नोंदवून घेण्याचे काम पोलीस अधिकारी करीत आहेत. हे साक्षीदार या बँकेचे घटक असून त्यांनीच बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील अनेकांना कर्जाचे वाटप केले होते. कोणाकोणाला या कर्जाची रक्कम मिळाली, याचाही शोध पोलीस … Read more

समाजकारणालाच जास्त महत्त्व देतो : सुजित झावरे

पारनेर :- विकासनिधीच्या माध्यमातून विकासाभिमुख कामे करणे हेच आपले उद्दिष्ट असून राजकारणापेक्षा आपण समाजकारणाला महत्त्व देत असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील देवीभोयरे गावठाण ते तुकाईवाडी मगरदरा रस्ता डांबरीकरण १५ लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. या वेळी त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात … Read more

निवडून आणण्यापेक्षा पाडण्यात मजा असते – खा.डॉ सुजय विखे

कर्जत :- भाजप उमेदवार पाडण्याचे पाप मला करायचे नाही. आपली ताकद या वेळी दाखवून देऊ, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. तथापि, खासदार सुजय विखे यांनी मध्यस्थी करत आपला मान ठेवण्याची जबाबदारी घेतल्यामुळे आपण भाजपत काम करणार आहोत, असे महासंग्रामचे संस्थापक नामदेव राऊत यांनी सांगितले. महासंग्राम युवा मंचाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ. विखे … Read more

राज्यात कर्जत- जामखेड मतदारसंघ आदर्श करू : ना. शिंदे

कर्जत : आगामी पाच वर्षांत मतदारसंघाचा असा विकास करून दाखविल की, संपूर्ण महाराष्ट्र येथील विकास पाहायला आला पाहिजे, आपण अगोदर करतो व नंतर सांगतो आणि काम करण्यावर जास्त भर देतो. मतदारसंघात जे होत नव्हते ते काम तुमच्या विश्वासामुळे करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. वालवड (ता. कर्जत) येथे संत सद्गुरू श्री … Read more

कर्जत-जामखेडच्या विकासासाठी ‘रोहित पॅटर्न !

‘कर्जत-जामखेड परिसरातील मतदारांचा केवळ निवडणुकीत मतदानापुरताच वापर करण्यात आला. मात्र, आपण परिसरातील विकासासाठी दृष्टिकोन विकसित करीत आहोत. त्यादृष्टीनेच शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित केले जात आहेत. कमी पाण्यामध्ये शेती, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन यांसारखे प्रयोग शेतकऱ्यांना माहीत व्हावेत, तसेच लोकांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या नवीन संधी, हेच आपले विकासाचे व्हिजन आहे. परिसरातील तलावांमध्ये साठलेला गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल. तुकाई … Read more

आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात ?

राहुरी :- मागील पाच वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झाले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सेनाच सत्तेवर येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येत आहेत. असे आ. कर्डिले म्हणाले. त्यामुळे आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नगर तालुक्‍यातील पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती … Read more

मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही – प्रा.राम शिंदे

कर्जत :- विरोधक म्हणतात, सूत गिरणीची चर्चा कुठेच झाली नाही. मग भूमिपूजन कसे? आपण सध्या चर्चा कमी करतो आणि काम करण्यावर जास्त भर देत आहोत. मतदारसंघात जे होत नव्हते, ते करून दाखवले, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी सांगितले. वालवड येथे संत सद्गुरु गोदड महाराज सहकारी सूत गिरणीच्या भूमिपूजनप्रसंगी शिंदे बोलत होते. व्यासपीठावर एच. यू. … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज !

अहमदनगर : विधानसभेची निवडणूक प्रक्रिया अवघ्या एक ते दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या दिशानिर्देशात जिल्हा निवडणूकशाखेमार्फत निवडणूक आयोगाच्या आदेश बरहुकूम सतर्कतेने सज्जता करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल २८ … Read more

रोहित पवार मंत्री राम शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार !

कर्जत – रोहित पवार कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा चांगलाच धसका घेतला आहे. राम शिंदे गेल्या १० वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात सर्वात कमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.  … Read more

नगरला बदनाम करणाऱ्यांना जागा दाखवा : आ.जगताप

नगर शहरातील प्रत्येक नागरिकाने शहराबद्दल प्रेमाची भावना दाखविणे गरजेचे आहे. राजकीय स्वार्थासाठी नगर शहराला बदनाम करणाऱ्यांच्या पाठीमागे जावू नका, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी नगरकरांना केले.. प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक संपत बारस्कर, डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, मिनाताई चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झालेल्या सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या विविध … Read more

मधुकर पिछड यांच्या परिवाराने 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला !

बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत. छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली. मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 … Read more