लोणी येथील गोळीबार प्रकरणातील ४ आरोपी जेरबंद

कोल्हार : रविवारी रात्री श्रीरामपूर येथील सात जणांची लोणी येथे आपसात झालेल्या वादातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यातील चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. आरोपींना लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. येवला व शिरूर येथून सिराज उर्फ सोल्जर अबू शेख (वय २४), संतोष सुरेश कांबळे (वय … Read more

तरुणीचा विनयभंग करून तिच्याकडेच केली प्रती महिना 5 हजारांची मागणी

संगमनेर : संगमनेर शहरात अकोले बायपास रोड परिसरात असलेल्या एका अभ्यासिकेत एक तरुण विद्यार्थिनी अभ्यासाला यायची या ठिकाणी आरोपी सूर्यकांत पोपट कडलग, रा. रायतेवाडी, ता. संगमनेर हा असायचा. अभ्यासिकेत तरुणीबरोबर ओळख झाली व ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. या मैत्रीचा गैरअर्थ काढून आरोपी सूर्यकांत पोपट कडलग याने सदर विद्यार्थिनीचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन … Read more

वाळू तस्करांच्या दोन गटात जोरदार राडा

राहुरी :  म्हैसगाव-कोळेवाडी भागात वाळूच्या व्यवहारावरून वाळू तस्करांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. एकमेकांवर गावठी पिस्तुले रोखल्याने एकाच दहशद निर्माण झाली. या घटनेतील तुळशीराम काशीनाथ केदार (रा. चिखलठाण, ता. राहुरी) यास राहुरी पोलिसांनी अटक केली. रवींद्र उर्फ पप्पू अप्पासाहेब शिंदे (रा. खांबे, ता. संगमनेर) हा पसार झाला आहे. राहुरी पोलिसांनी याबाबत शस्त्र बाळगल्याप्रकरणी अद्याप कोणावरही … Read more

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

अकोले : अकोले तालुक्यातील कळस गाव व परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.  तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळूउपसा व वाहतुकीस बंदी असताना विनापरवाना वाहतूक पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलिसांनी आपला मोर्चा वाळूतस्करांकडे वळवला आहे.  मंगळवारी पहाटे कळस शिवारातील प्रवरा नदीच्या पुलावर टाटा सुमोमधून भाऊसाहेब रामनाथ साळवे हा विनापरवाना … Read more

कॉन्स्टेबलला उपअधीक्षकाकडून मारहाण

नगर: मित्रांशी बोलत उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलला नगर ग्रामीण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी बेदम मारहाण व शिवीगाळ केली.  हा प्रकार मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सर्जेपुरा ते कापड बाजार रस्त्यावर पोलिस मुख्यालयाच्या परिसरात घडला. मारहाण झालेल्या पोलिसाने दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात उपअधीक्षक पाटील व त्यांच्या वाहनचालकाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानी … Read more

बसमध्ये तरुणीचा विनयभंग

नगर : नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पवारवाडी घाट हॉटेल आशीर्वाद समोर हमसफर ट्रॅव्हल्स बस क्र. एमएच २० डीडी ६०६ ही प्रवासी पाण्याकरिता थांबली असता सदर बसमधील काही प्रवासी चहापाणी पिण्यास गेले व काहीप्रवासी झोपलेले होते.  त्यात एका सिटवर २३ वर्षाची औरंगाबादची तरुणी झोपलेली होती. या संधीचा फायदा उठवत बसमध्ये असलेला आरोपी बालाजी दत्तू दहिभाते, रा.समुद्रवाणी, … Read more

महानगरपालिकेच्या तीन जागांसाठी 11 अर्ज

अहमदनगर:  जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून महापालिकेच्या तीन जागांसाठी बुधवारी  11 जणांनी अर्ज नेले आहेत. नगरपालिकेसाठी एक जागा असून, त्यासाठी याआधी दोघांनी आणि  बुधवारी  तिघांनी अर्ज नेले आहेत.  जिल्हा परिषदेसाठी अर्थात ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून एक जागा असून, त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजी गाडे यांनी एकमेव अर्ज दाखल केला आहे. ही जागा बिनविरोध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हप्ता न दिल्याच्या रागातून मजुराचा कु-हाडीने घाव घालून खून

पाथर्डी :- गावातील गावगुंडानी एका मजुराचा हप्ता न दिल्याच्या रागातून कु-हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात मंगळवारी दुपारी घडली. साहिल पठाण (रा.खोसपुरी, ता. नगर) असे या मजुराचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी, ता.नगर) यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करण्याचा … Read more

अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढला !

अहमदनगर/ नालेगाव- अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत बर्‍याच अंतरावर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी (दि.२) उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.  परिसरातील काही तरुणांनी पुन्हा या अर्धवट जळालेला मृतदेहाचा दहनविधी केला. अमरधाम स्मशानभूमीत रविवारी (दि.१) दिवसभरात सुमारे १३ ते १४ अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी … Read more

वाडिया पार्कचे नाव छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल होणार?

नगर – वाडिया पार्क व व्यापारी संकुलाचे छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल असे नामकरण करावे, असा प्रस्ताव महापालिकेने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिवांना पाठवला आहे.  १६ जुलैला झालेल्या महासभेत तसा ठराव घेण्यात आला होता. वाडिया पार्क क्रीडा व व्यापारी संकुलाचे छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल नामकरण करण्याचा ठराव २६ मे २०१२ रोजी महासभेने … Read more

श्रीगोंद्यात माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू

श्रीगोंदा :- काष्टीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य असलेले शिवनेरी उद्योग समुहाचे अध्यक्ष पोपटराव विलासराव माने यांचे अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघाती निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. एक डिसेंबरला रात्री दहा वाजता माने आपल्या शिवनेरी हॉटेलचे कामकाज संपवून समोरच असलेल्या घरी जात असताना रस्ता ओलांडताना दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक बसली. माने … Read more

कांद्याच्या दराने ओलांडली शंभरी,सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी !

अहमदनगर :- नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा गावरान कांदा, तसेच लाल कांद्याला विक्रमी १०० ते १३० रुपये किलो भाव मिळाला. गतवर्षीचा दुष्काळ आणि यावर्षीची अतिवृष्टी यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. गेल्या महिन्यापासून कांद्याची आवक … Read more

राहुरी भाजपचा तालुकाध्यक्ष कोण होणार?

राहुरी : राहुरी तालुका भाजपाची यावेळच्या अध्यक्ष निवडीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहिले जात आहे. कारण सन २००४ पासून राहुरी विधानसभा मतदार संघात पक्षाचे आमदार होते. यावेळी माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव झाल्याने आता तालुकाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार,याबाबत उत्सुकता आहे.  राहुरी तालुका भाजपाचे विद्यमान अध्यक्ष विक्रम तांबे पदावर असताना २००९ मध्ये शिवाजीराव कर्डिले विजयी ठरले होते. सध्या तेच … Read more

आमदार तनपुरेंना मंत्रिपद मिळाल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल !

तिसगाव : राहुरी -नगर -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांची नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस, या तीन पक्षांनी एकत्र येत नव्याने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये यांची वर्णी लावावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह तनपुरे समर्थकांकडून करण्यात आली आहे.  मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन असणारे तरुण व कार्यक्षम नेतृत्व म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने … Read more

फरार आरोपीस सापळा रचुन शिताफीने पकडले! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर : न्यायालयाने फरारी घोषित केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल राजेंद्र पालवे (वय २९, रा.मेहेकरी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोठला परिसरात सापळा रचुन शिताफीने पकडले.  सुनिल पालवे याच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यास जामीनावर सोडले होते. जामीनावर सुटल्यानंतर कोर्ट कामाकरीता सुनील पालवे हा न्यायालयात हजर झाला नाही. … Read more

शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून जबर मारहाण

अहमदनगर : बांध का कोरला अशी विचारणा केल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास शिवीगाळ करून लोखंडी पाईपणे जबर मारहाण केली. या मारहाणीत अमोल महादेव दिवटे हे जखमी झाले असून, याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की,श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील अमोल महादेव दिवटे यांनी माझ्या शेताचा बांध का कोरला अशी विचारणा केल्यावरून त्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबारात एका युवकाचा मृत्यू !

राहता :- तालुक्यातील लोणी गावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. फरदीन अब्बु कुरेशी (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फरदीन हा श्रीरामपूर शहराचा रहिवासी होता. रविवारी … Read more

वीज दुरुस्तीचे काम करत असतानाच अधिकाऱ्याला मारहाण

श्रीरामपूर – महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांना वीज दुरुस्तीचे काम करीत असताना नगरसेवकाने शिवीगाळ व मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत महावितरणचे एमआयडीसी ऑफिस श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more