अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी 03 नवे कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : जिल्हा रुग्णालयातील सकाळी प्राप्त अहवालानुसार 09 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाच आज दुपारी पुन्हा 03 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे नगर मधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दुपारी तीन वाजेपर्यंत 12 झाली आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 207 झाली आहे. कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा तसेच संगमनेर येथील 02 व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. याची … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये कोरोनाचे दोनशे रुग्ण !

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी ९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे नगर जिल्ह्यातील एकुन कोरोना बाधित रुग्नांची संख्या 204 झाली आहे. नगर शहर -३ : स्टेशन रोड येथील ७१ वर्षीय पुरुष, कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित. पाथर्डी – २: चेंबूर मुंबई येथून पाथर्डी … Read more

कोरोना रुग्ण वाढल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :माळीवाड्यात ब्राह्मणगल्लीत तिघांना कोरोनाची बाधा झाली. यापूर्वी तेथे आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील ६५ व ४१ वर्षे वयाच्या दोघी महिला बाधित आढळल्या. याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित आढळला. संगमनेर व श्रीरामपूर येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी २० जणांची भर पडली. बुधवारी त्यात आणखी पाच जणांची भर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी ८-४५ वाजता मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. या महिलेचे काल सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने काल एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला,कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  आज जिल्ह्यात ०९ नवीन रुग्ण वाढले आहेत,६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह तर ०९ पॉझिटिव्ह आले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 112 झाली आहे. व उपचारार्थींची संख्या 45 झाली आहे. ही रुग्ण अकोले, संगमनेर, पारनेर, शेवगाव आणि राहाता आदी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अवघ्या 10 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज नव्याने चार रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात सापडले आहेत. यात श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला कोरोना व्हायरस ची लागण झाली आहे.श्रीगोंदा फॅक्टरी येथे दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. पहिल्या रुग्णाच्या घरातीलच 10 महिन्यांचे बाळाला कोरोना झाला आहे. याबाबत तालुका आरोग्य … Read more

ब्रेकिंग – अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक पार, आणखी 4 जण पाॅझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने  शतक पार केले आहे, आज जिल्ह्यात ०४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 103 झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या रुग्णांत घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी कोरोना बाधित असून इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील रुग्ण आहेत.  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका तरुणास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- बाहेरून येणार्या लोकांमुळे अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे, समशेरपूर येथे मुलूंड येथून आलेल्या एका 39 वर्षीय तरुण पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात हा तिसरा रूग्ण झाला आहे. तो 19 मे रोजी गावात आला होता. त्यानंतर त्याला काल जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- लॉकडाऊन शिथील झाल्यापासून पुणे-मुंबईहुन आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्याने नगरकर चिंतेत होते. या पाहुण्यांच्या संपर्कात आलेल्यामध्ये भीतीचे वातावरण होते. आज संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये तपासणी केली असता जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अहवाल निगेटिव्ह आल्याने नगरकरांना दिलासा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती कोरोना रुग्ण ? वाचा तुमच्या भागातील रुग्णांची माहिती

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 02 आणि पुण्याहून आलेल्या 01 अशा 03 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून आलेल्या 16 … Read more

ब्रेकिंग : मुंबईहून आलेल्या लोकांमुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या ०५ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. याशिवाय, दोन रुग्णांचे रिपीट अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पारनेर तालुक्यातील म्हसने फाटा येथील 31 वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्यातील … Read more

मोठी बातमी : श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव , कोरोनाबाधित महिला रुग्ण सापडली !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे तालक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित पहिली महिला रुग्ण सापडली आहे. या महिलेसह तिचा मुलगा व सुनेस आज नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. ठाणे येथून श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वानवळा आल्यामुळे एकच खळबळ उडाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 2 रुग्ण कोरोनामुक्त, जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 54 !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-आणखी ०२ रुग्ण कोरोनामुक्त जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४ अहमदनगर, दि. २४ – नगर शहरातील सारस नगर येथील एक आणि सुभेदार गल्ली येथील एक असे दोन रुग्ण आज कोरोना मुक्त झाले. त्यांना आज अलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र सारसनगर आणि सुभेदार गल्ली परिसर कंटेनमेंट झोन असल्याने त्यांना याच रुग्णालयात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: धक्कादायक….अजून चार जण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या १७ पैकी १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील कोरोना बाधीत आढळलेल्या रिक्षाचालकाच्या पत्नी, मुलगा आणि मुलीचा अहवाल पॉझिटिव आला आहे. याशिवाय कर्जत तालुक्यातील तालुक्यातील राशीन येथे मुलीकडे आलेल्या मूळच्या मुंबईकर असलेल्या 75 वर्षीय महिलेचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आढळले आणखी दोन कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ४८ पैकी ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल संगमनेर शहरातील रहमत नगर येथील बाधीत व्यक्तीची पत्नी आणि नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील एक रिक्षाचालक यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील कोरोना बाधीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढली, वाचा सविस्तर बातमी…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील एक जण काल नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे तर दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे. निमोण येथील त्या व्यक्तीचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ 7 जण कोरोनामुक्त, जिल्हयात आतापर्यंत 49 रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जिल्ह्यातील एकूण ०७ जण कोरोनामुक्त झाले. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील या ०७ कोरोना बाधित रुग्णांना आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- घाटकोपर येथे राहत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही ३० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला आणि तिचा पती … Read more