‘एक देश – एक निवडणूक’ नंतर आता ‘एक देश एक मतदारयादी’ !

India News

India News : ‘एक देश – एक निवडणूक’ ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याकरता केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीने ‘एक देश एक मतदारयादी’ या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेबाबतही विचार करावा, असे सरकारच्या वतीने सुचवण्यात आल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२च्या जानेवारीत याबाबतचे सूतोवाच केले होते. गुजरातमधील पक्ष … Read more

भारताच्या चांद्रयान- ३ चा विक्रम लँडर सध्या कसा आहे ?

India News

India News : भारताच्या चांद्रयान- ३ चा विक्रम लँडर सध्या चंद्राच्या भूमीवर निद्रिस्तावस्थेत (स्लिम मोड) आहे. त्याचे एक नवीन छायाचित्र नुकतेच समोर आले आहे. विक्रम लँडरचे हे छायाचित्र दक्षिण कोरियाच्या लुनर ऑर्बिटरने टिपले आहे. विक्रम लँडर या छायाचित्रामध्ये एका छोट्याशा बिंदूसारखा दिसत आहे. दक्षिण कोरियाच्या पाथ फाइंडर लुनर ऑर्बिटरला अधिकृतरीत्या दनूरी या नावाने ओळखले जाते. … Read more

…तर संपूर्ण पृथ्वीवर पसरेल भयानक अंधार

India News

India News : जगभरातील काही देशांच्या सत्ताधीशांना सध्या युद्धाची खुमखुमी चढली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करून युद्धाला तोंड फोडले आहे. हे युद्ध गेले दीड वर्षे सुरू आहे. दुसरीकड़े उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंग जोंग ऊन एकापाठोपाठ एक अण्वस्त्रांच्या चाचण्या करून जगाला धमकावत आहे. त्यामुळे संपूर्ण जग सध्या युद्धाच्या छायेत आहे. ही तिसऱ्या … Read more

सहा महिन्यांनंतर ४ अंतराळवीर पृथ्वीवर परतले

India News

India News : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (आयएसएस) अभियान पूर्ण करत ६ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ४ अंतराळवीर सोमवारी पहाटे पृथ्वीवर परतले. त्यांना पृथ्वीवर घेऊन आलेले ‘स्पेस एक्स’ कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर अटलांटिक महासागरात पॅरेशूटच्या मदतीने उतरल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर स्टीफन बोवेन, वॉरेन ‘वुडी’ होबर्ग, रशियाचे आंद्रेई फेदयेव व संयुक्त अरब अमीरातचे … Read more

चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर आता भारताने सूर्य मोहीम हाती घेतली

India News

India News : चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर आता भारताने सूर्य मोहीम हाती घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य- एल१ यान येत्या २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्राचे आंतरविद्यापीठ केंद्राचा या मोहिमेत सहभाग आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी भारताची ही पहिली समर्पित अंतराळ मोहीम आहे. सौर कोरोना … Read more

भारताच्या ४० टक्के निर्यात शुल्काचा नेपाळला फटका

India News

India News : भारताने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा नेपाळला फटका बसला आहे. या देशाला आता कांदा तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. नेपाळमध्ये कांद्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात भारताने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचे जाहीर केले. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर किमती वाढण्याच्या भीतीने हे पाऊल उचलण्यात आले. भारताच्या … Read more

चांद्रयान- ३ मोहिमेतील सर्व शास्त्रज्ञांचा देशवासीयांना अभिमान : आ. थोरात

India News

India News : इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीच्या बळावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान- 3 चे यशस्वी लँडिंग झाले आहे. इस्रो या संस्थेचे हे यश व या अभियानातील सर्व शास्त्रज्ञांचा तमाम देशवासीयांसाठी अत्यंत अभिमान असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. चंद्रयान -3 च्या यशस्वीतेबद्दल दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आमदार थोरात म्हणाले … Read more

बांगलादेशी सोनिया प्रेमासाठी भारतात ! लग्न करून पळून आल्याची पोलिसांत तक्रार

India News

India News : प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण गाजत असताना, आता एक बांगलादेशी महिला आपल्या कथित नवऱ्यासाठी भारतात आल्याचे समोर आले आहे. सोनिया अख्तर नामक या महिलेने नोएडातील सौरवकांत तिवारीनामक व्यक्तीसोबत आपला निकाह झाल्याचा आणि त्याच्यापासून एक मूल झाल्याचा दावा केला आहे. लग्नानंतर तिवारी भारतात पळून आल्याचा तिचा आरोप आहे. तिच्या या तक्रारीची … Read more

भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरणार !

India News

India News : वेलकम बडी अर्थात सुस्वागत मित्रा असा संवाद साधत चांद्रयान- २ मोहिमेतील ऑर्बिटरने चांद्रयान- ३ मोहिमेतील लँडिंग मॉड्यूलचे स्वागत केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने दोन्ही चांद्रयानांमधील संवादाबाबत सोमवारी माहिती दिली. चांद्रयान-२ मोहिमेतील ऑर्बिटरचा नव्या मोहिमेतील लँडिंग मॉड्यूलशी संपर्क झाल्यामुळे आता आम्हाला लँडरपर्यंत पोहोचण्यासाठी अजून एक मार्ग उपलब्ध झाल्याचे इस्रोने सांगितले. इस्रोने २०१९ … Read more

पेट्रोलियम उत्पादनांचा बेसुमार वापर कायम राहिला तर आगामी ५० वर्षांत होणार असे काही…

India News

India News : जगभरात पेट्रोलियम उत्पादनांचा सध्याच्या परिस्थितीप्रमाणेच बेसुमार वापर कायम राहिला तर आगामी ५० वर्षांत जगातील कच्च्या तेलाचे साठे संपुष्टात येतील, अशी भविष्यवाणी केंद्र सरकारने सोमवारी केली. भारतासह अनेक देशांनी स्वच्छ ऊर्जास्रोतांचा विकास, त्यांचा वापर आणि इलेक्ट्रॉनिक वाहने स्वीकारण्यावर भर दिल्याचेही सरकारने स्पष्ट केले. राज्यसभेत एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस … Read more

जगातील एकूण वाघांपैकी तब्बल ७५ टक्के वाघ एकट्या भारतात !

India News

India News : भारतातील वाघांची संख्या ३,६८२ वर पोहोचल्याची माहिती केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त शनिवारी जारी केलेल्या या अहवालानुसार, जगातील एकूण वाघांपैकी तब्बल ७५ टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. दर चार वर्षांनी होत असलेल्या व्याघ्रगणनेनुसार, ७८५ वाघांसह मध्य प्रदेश पुन्हा एकदा सर्वाधिक वाघ असलेले राज्य ठरले आहे. … Read more

India News : भारतात विजेच्या मागणीत प्रचंड वाढ

India News

India News : चालू वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत दरवर्षीच्या तुलनेत १.८ टक्क्यांच्या किंचित वाढीसह देशातील विजेचा वापर ४०७. ७६ अब्ज युनिट्सवर पोहोचला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल-मे या कालावधीत वीज उत्पादनात ०.१ टक्क्याने घट झाली आहे, तर २०२२ मधील या कालावधीत ती १७.४ टक्क्यांनी वाढली. आयआयपी माहितीवरून असे दिसून आले आहे की, मे … Read more

मोदीजी, माझ्या बायकोला परत पाठवा!

India News

India News : भारतीय प्रियकरासाठी पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह पळून आलेल्या महिलेचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता तिचा पती देखील समोर आला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपल्या पत्नीला मायदेशी पाठवण्याची विनंती केली आहे. ही महिला मात्र पाकला परत जाण्यास तयार नाही. परत गेले तर आपली हत्या होईल, अशी तिला भीती आहे. सीमा गुलाम हैदर … Read more

आता क्रूझ, हाऊसबोटीचा आनंद घेऊ शकतील अयोध्यावासी

India News

India News :  योगी सरकार लवकरच अयोध्यावासीयांना आणखी एक भेट देणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान होण्याच्या आधी वाराणसीप्रमाणे शरयूमध्येही क्रुझ आणि हाऊस बोटची सुविधा सुरू होणार आहे. पहिली क्रुझ ऑक्टोबरपर्यंत शरयूमध्ये उतरेल तर जानेवारीपर्यंत दोन क्रुझ आणि हाऊसबोट शरयूमध्ये उतरतील. पवित्र शरयू नदीतील क्रुझचा (कनक आणि पुष्पक) आनंद घेण्यासाठी आता प्रतीक्षा … Read more

काश्मीरमध्ये दरवळतोय लॅव्हेंडरचा सुगंध

India News

India News : जम्मू-काश्मीरच्या शेतीत सध्या जिथे-तिथे लॅव्हेंडरचा सुगंध दरवळताना दिसून येत आहे. उत्कृष्ट सुगंधासाठी ओळखले जाणारे लॅव्हेंडर हे जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आवडते पीक ठरले आहे. श्रीनगरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या भागात लॅव्हेंडरची लागवड केली असल्याचे दिसून येते. श्रीनगर हा काश्मीरमधील सर्वात सुपीक प्रदेश मानला जातो. लॅव्हेंडरच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि चांगल्या … Read more

दोन वर्षांत देशभरात मिळणार असे पेट्रोल

India News

 India News : देशभरात २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाच्या किरकोळ विक्रीसाठी सुसज्ज असे पेट्रोल पंप उपलब्ध असतील, अस विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंडियन मर्चंट चेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना सांगितले. या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी पहिले इथेनॉलमिश्रित पेट्रोल पंप कार्यान्वित झाले, त्यानंतर त्याची संख्या आता ६०० च्या पुढे गेली आहे. … Read more

महाराष्ट्रापाठोपाठ आता आणखी एक पक्ष फुटणार ? अक्षरशः खळबळ माजणार…

India News

महाराष्ट्रापाठोपाठ आता बिहारमधील सत्तारूढ जदयूमध्ये उभी फूट पडणार असल्याचा दावा भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी सोमवारी केला. जदयूचे अनेक आमदार व खासदार आमच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री त्यांना एक मिनीटही वेळ देत नाहीत. त्यामुळे ते नाराज असून, कोणत्याही क्षणी जदयूची साथ सोडू शकतात, असे भकितही त्यांनी केले. दुसरीकडे सुशील मोदी यांचे दावे म्हणजे ‘मुंगेरीलाल के … Read more

द बर्निंग ट्रेन ! इंजिनला लागली आग, चालक स्वतः भाजला, पण त्याने…

India News

India News : मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाजवळ रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार पाहायला मिळाला. कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या के. के. एक्स्प्रेसने दिल्लीकडे निघण्यापूर्वी मोहोळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर काही वेळातच इंजिनला घाटणे गावाजवळ शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.के. के. एक्स्प्रेसच्या इंजिनला रविवारी सकाळी नऊच्या … Read more