कर्जतच्या नगराध्यक्षपदी घुले की शेलार? अचानक तिसऱ्या नावाचीही होऊ शकते निवड; आज होणार फैसला

Ahilyanagar Politics : कर्जत- नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी २८ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा रोहिणी घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) छाया शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. जर या दोन नावांवर एकमत झाले नाही, तर तिसऱ्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासोबतच उपनगराध्यक्षपदासाठीही नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा … Read more

अजितदादा माझे काका! स्वागताचे फलक लावले तर बिघडले कुठे? रोहित पवारांचा पत्रकार परिषदेत खुलासा

जामखेड- मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचे फलक आमदार रोहित पवार यांच्या नावाने लागल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या फलकांवरून निर्माण झालेल्या गैरसमजांना पूर्णविराम देत रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. “अजित पवार माझे काका आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या स्वागताचे फलक कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने लावले यात काही गैर नाही,” असे सांगत … Read more

अहिल्यानगरमधील या नगरपंचायतीत राजकीय भूकंप ! ११ नगरसेवकांनी बदलला पक्ष, शरद पवार गटाला मोठा धक्का

कर्जत नगरपंचायतीत मोठ्या राजकीय उलथापालथीची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ नगरसेवक आणि काँग्रेसचे ३ नगरसेवक यांनी भाजप नेते व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्याने सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. रविवारी रात्री झालेल्या या बैठकीने स्थानिक राजकारणात खळबळ उडवली असून आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठी धक्का मानला जात आहे. … Read more

कर्जत नगरपंचायतीमध्ये महिलाराज! नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपनगराध्यक्षपद काँग्रेसकडे

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उषा राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान याबाबतची माहिती पीठासीन तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली आहे. कर्जत नगरपंचायतीमध्ये दोन्ही पदाधिकारीपदी महिलांची निवड झाली आहे. यामुळे कर्जत नागरपंचायतवर “महिलाराज” निर्माण झाले आहे. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी … Read more

‘या’ नगरपंचायतीवर येणार पुन्हा महिलाराज ..!

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  नुकतीच मुंबई येथे राज्यातील नगर पंचायतीच्या आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण जाहीर झाले असल्यामुळे आमदार रोहित पवार कोणाच्या हाती नगरपंचायतच्या सत्तेची चावी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपात जोरदार लढत झाली मात्र … Read more