शहरातील कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-कोपरगाव शहरात सुरु असलेल्या गोवंश जनावरांच्या कत्तल खान्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी 16 जिवंत गोवंश जातीचे जनावरांची सुटका केली. दरम्यान कोपरगाव शहराच्या मध्य वस्तीतील आयेशा कॉलनीत सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहर पोलिसांनी हि धडक कारवाई केली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, पोलीस निरीक्षक … Read more

वाळूसाठ्यांचे होणार ऑनलाइन लिलाव

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील १५ वाळू साठ्यांचे १९ जानेवारीला ऑनलाइन लिलाव होणार आहेत. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीतील वांगी खुर्द, श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीतील नायगाव, मातुलठाण, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण, कोपरगाव तालुक्यातील सोनारी, कोळगाव थडी याच तालुक्यातील जेऊर कुंभारी, जेऊर, पाटोदा, राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रातील राहुरी … Read more

पुन्हा 15 कोरोनाबाधितांची भर; तालुक्याचा आकडा 2 हजारांच्या जवळ

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. मात्र ब्रिटनमधील कोरोनाचा नवा अवतार नगर मध्ये आल्याने नगरकरांची चिंता वाढली होती, मात्र अद्याप कोणालाही याची लागण झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. नुकतेच कोपरगाव शहरासह तालुक्यात दि. 31 … Read more

हत्याराचा धाक दाखवत वाहनचालकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-कोपरगाव शहरात चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी वाहन चालकास लुटल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील भाजी मार्केट परिसरात हत्याराचा धाक दाखवत एका वाहनचालकास लुटले. यामध्ये त्याच्याजवळील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व २०० रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. ही … Read more

स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवुन लुटणारी टोळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे जितेंद्र भाऊ उर्फ दुधकल्या भोसले( वय 31 राहणार घोसपुर तालुका नगर मूळ राहणार पढेगाव तालुका कोपरगाव) राहुल टक्कर्या भोसले वय 27 राहणार पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 26 डिंसेबर … Read more

वेग घटला… शंभर सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण रिकव्हरीचा वेग वाढला आहे. त्यातच जिल्ह्यात आता हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या घटत असून कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. यातच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दिलासादायक वृत्त हाती येत आहे. यामुळे नागरिकांची काहीशी चिंता कमी झाली आहे. नुकतेच कोपरगाव शहरासह तालुक्यात 12 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 35 … Read more

मेडिकलचा दरवाजा तोडून चोरटयांनी रोकड लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील सावकर चौकातील रसराज मेडिकल स्टोअर्सवर चोरटयांनी डल्ला मारला आहे. चोरट्यानी मेडिकल मधील ४२ हजार रुपये रोख व एक मोबाईल असा ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी शैलेश केशवराव साबळे (वय-३९) यांच्या मालकीचे रसराज मेडिकल स्टोअर्स नावाचे औषधी विकण्याचे दुकान … Read more

अवैध धंद्यांवर पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संतापाची लाट

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे, कायद्याचे धाक न राहिल्याने अवैध धंदे देखील वाढू लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात अवैध धंदे तेजीत सुरू आहे. पोलिस याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील मटक्याच्या पेढ्या जोरात सुरू आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी मटक्याच्या चिठ्ठ्या … Read more

वेग घटला मात्र वाढ कायम; सावधानता बाळगा

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात 23 डिसेंबरपर्यंत दोन हजार 626 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 540 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण 18 हजार 590 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. दरम्यान गेल्या 24 तासात शहरासह तालुक्यात अवघे 3 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 88 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात … Read more

पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी चक्क मुंडन केले

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- यंदाच्या वर्षी जिल्ह्यात मुबलक पाऊस झाला आहे. सगळी धरणे, नद्या, तलाव तुडुंब भरली आहे. यामुळे नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला असे मानले जात होते. मात्र जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊनही शेवगाव तालुक्यातील नागरिक तहानलेले आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणी असूनही, शेवगाव शहराला 12 दिवसानंतर पिण्याचे पाणी येते. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन … Read more

जिल्ह्यातील ह्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा !

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पठारवाडी ग्रामपंचायतीवर आता महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे. केवळ राजकारणामुळे जिवलग मित्र एकमेकांपासून दूर गेले होते. वीस वर्षांच्या कालखंडानंतर या मित्रांना एकत्र आणण्याचा करिष्मा आमदार नीलेश लंके यांनी केला. लोणीहवेली, जातेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही बिनविरोध करण्याचा निर्णय आमदार लंके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात … Read more

कोल्हार येथील पुलावरील पोहोचमार्ग दुरुस्ती काम- वाहतुकीत बदल

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्‍ह्यामधील कोपरगांव-कोल्हार-अहमदनगर रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील प्रवरा नदीवरील पुलाच्या पोहोचमार्गाचे दुरुस्तीचे काम मे. डायमंड कंस्ट्रशन कंपनी, मु.पो. लोणी यांना देण्यात आलेले आहे. सदर काम चार टप्प्यामध्ये पुर्ण करण्यात येणार आहे. त्‍यापैकी पहिला टप्‍पा हा दि. 4 जानेवारी 2021 ते 5 जानेवारी 2021, दुसरा टप्‍पा 8 जानेवारी 2021 ते … Read more

खात्यात जमा करण्यासाठी दिलेली रक्कम ‘डाकपाल’ ने केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-पोस्टाच्या खात्यात जमा करण्यासाठी खातेदारांनी दिलेली रक्कम खात्यात जमा न करता सदर रक्कम लंपास केल्याची घटना कोपरगावात घडली आहे. दरम्यान रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी डाकपाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्या करून काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून सुमारे ४० हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी डाकपालाविरुध्द गुन्ळा दाखल झाला आहे. याबाबत … Read more

व्यापाऱ्यास लुटणाऱ्या चौघांस पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील निवारा येथील व्यापार्‍यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून 4 लाख 98 हजार 900 रुपयांना लुटणार्‍या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच जेरबंद केले आहेत. सोमनाथ रघुनाथ गोपाळ, गणेश जालिंदर चव्हाण, राहुल प्रभाकर गोडगे व रवींद्र अर्जुन तुपे अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून 86 हजार 500 … Read more

…तर कोपरगाव नगरपरिषदेस एक ते दीड कोटी रुपयांचा भुर्दंड !

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करून ती योग्य पद्धतीने पूर्णत्वास नेण्याचे काम करून घ्यायची जबाबदारी असलेल्या निसर्ग कन्सल्टन्सी या संस्थेला आधीच्या सत्ताधारी गटाने कामाबद्दल कुठल्याही सूचना-नोटीस न देता हाकलून लावले, तसा ठरावही करून घेतला. त्या कंपनीला हाकलण्यामागे काय गौडबंगाल आहे हे जुने सत्ताधाऱ्यांनीच सांगावे, असा प्रश्न … Read more

लंकेच्या स्कीमची जादू… 20 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोधच्या दिशेने

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी एक मोठी घोषणा केली होती. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी घ्या अशी घोषणा लंके यांनी केली होती. लंकेच्या या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळू … Read more

व्यापार्‍यास लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- दुकानातील रोख रक्कम बॅगेतून घेऊन चाललेल्या व्यापार्‍याचा धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याचे जवळील जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल लुटणार्‍या टोळीस पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी गेलेल्या रोख रकमेतील 86 हजार पाचशे रुपये हस्तगत केले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी कि, दिलीप शंकर गौड (वय … Read more

डंपर व दुचाकी धडकेत एक जण ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  नगर मनमाड महामार्गावरील अपना हॉटेलसमोर दुचाकीस डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरील चालकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, नगर मनमाड महामार्गावरील अपना हॉटेलसमोर कोपरगावहून नाटेगावाकडे जाणाऱ्या दुचाकीस डंपरने धडक दिल्याने बाबुराव किसन मोरे रा. नाटेगाव ता. कोपरगाव हे गंभीर जखमी झाले. त्याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना … Read more