अजून किती दिवस आमदार आयत्या पिठावर रेघा मारणार?

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव मतदारसंघात स्नेहलता कोल्हे यांनी कोट्यवधींंचा निधी आणून अनेक कामे, प्रश्न मार्गी लावल्यामुळे गावचा विकास कसा करायचा, हे झालेल्या विकास कामातून दाखवून दिले. विद्यमान आमदारांना अद्याप निधी मिळाला नाही. कोल्हे यांनी मंजूर करून आणलेल्या कामावरच आयत्या पिठावर रेघा मारण्याचे काम विद्यमान आमदार करीत आहेत. अजून किती दिवस ते आयत्या पिठावर … Read more

कोपरगावात आणखी १८ जण पाॅझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शनिवारी दुपारपर्यंत कोपरगाव येथे करण्यात आलेल्या ७३ रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्टमध्ये १८ जणांचे अहवाल बाधित, तर ५५ निरंक आले. शनिवारी बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या ३० असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. कोपरगाव तालुक्यातील बाधितांचा आकडा ३२८ वर पोहचला. त्यापैकी १३६ रुग्ण बरे … Read more

‘ह्या’ तालुक्यात एकाच दिवशी ६५ लोकांना कोरोना ; चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात 65 … Read more

कोरोनाच्या आकडेवारीबाबत ‘ह्या’ आमदारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने  योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत.  मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या … Read more

या तालुक्यात कोरोनाचा उद्रेक; दिवसभरात ६५ बाधित

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कोपरगावसह संजीवनी कारखाना परिसर व २२ गावांत ६५ रुग्ण बाधित निघाले असून त्यात २५८ अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये ६१ बाधित निघाले आहे, तर खासगी प्रयोग शाळेत २ रुग्ण बाधित निघाले. यात एक १० महिन्याचे बाळ व ब्राम्हणगाव येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.त्यामुळे आजपर्यंत निघलेल्या रुग्णांचा गुरुवारी उच्चांक मानला जात … Read more

लाच घेताना महिला तलाठ्याला पकडले !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव | कुंभारीपाठोपाठ येसगाव येथील तलाठी ज्योती वसंतराव कव्हळे (वय ३२) हिने प्रतिज्ञापत्रात निर्माण केलेल्या भाराचा तपशील सात-बारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड करून ८०० रुपये रोख घेताना तिला रंगेहात पकडण्यात आले. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. नाटेगाव येथील तक्रारदाराने आपल्या प्रतिज्ञापत्रावर निर्माण केलेल्या भाराचा … Read more

फटाके फोडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :-अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. या जल्लोषात कोपरगाव येथे मुख्य रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या सात जणांविरोधात यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यावर कोपरगाव शहर पोलिसात जमाव बंदी व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जय मल्हार कॉम्प्लेक्स समोर विघ्नेश्वर … Read more

कोरोना रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा;माजी आ.कोल्हे संतापल्या

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव येथील कोरोना सेंटर वाढत्या रूग्णांना सेवा देण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे या रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा असा इशारा देत शिर्डी येथे तातडीने कोरोना सेंटर उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत … Read more

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी कोरोना रुग्णांचा उच्चांक

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शहर व तालुक्यात सोमवारी ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी कोरोना रुग्णांचा उच्चांक झाला असून काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ९७ व्यक्तीची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी … Read more

‘ह्या’ तालुक्यात नव्याने 18 कोरोना रुग्ण;चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. काल आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १८ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत १३६ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यातील ९० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. शहरातील परवा सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 101 … Read more

शेतकऱ्यांना खरीप विम्याची रक्कम तातडीने द्या : कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- सन २०१९ -२० च्या खरीप हंगामातील कापुस व तूर या पिकाच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. सन २०१९ -२० मधील खरीप हंगामातील कापूस व तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली … Read more

कोपरगावात पुन्हा १९ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव शहरातील काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील १०१ व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये १८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अहमदनगर येथे काल पाठवलेल्या ३० अहवालांपैकी गोरोबानगर येथील ६० वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून २९ अहवाल निगेटिव्ह आले. तालुक्यात आता एकूण … Read more

‘ह्या’ तालुक्यात पुन्हा १२ लोकांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. काळ आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात … Read more

माजी आमदार म्हणतात , निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी लढत राहणार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. कोपरगाव मतदारसंघातील सुमारे ७८ दूध संकलन … Read more

कोपरगावमध्ये करोनाचा कहर : बधितांचा आलेख वाढताच !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-कोपरगावमध्ये करोनाचा कहर वाढतच चालला आहे. शहरात काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ५२ व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर खाजगी लॅबमध्ये एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज दुपारपर्यंत एकूण १२ बाधीत आढळले आहे. तसेच ३० … Read more

नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- काेपरगाव तालुक्यात बुधवारी दुपारी २० जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात ८ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आठ पॉझिटिव्ह रुग्णांत लक्ष्मीनगर दोन पुरुष, कोळपेवाडी एक तरुण, शिंदे शिंगीनगर एक पुरुष व एक महिला, स्वामी समर्थ नगर ३ रुग्ण यात एक पुरुष … Read more

पाच हजारांची लाच घेणारा ‘तो’ तलाठी गजाआड

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- कोपरगाव तालुक्यातील वाळू व्यावसायिकांवर कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सजा कुंभारी येथील तलाठी सुनील मच्छिंद्रनाथ साबणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. वाळूच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी सजा कुंभारी येथील तलाठी साबणे याने संबंधित व्यावसायिकाकडून दरमहा ५ हजारांची लाच मागितली होती. ती लाच स्वीकारताना नाशिकच्या … Read more

छताला दोरीने गळफास घेऊन त्याने जीवन संपवले …

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-कोपरगाव तालुक्यातील हनुमाननगरमधील तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. सागर राजू पाटील (वय २२) असे त्याचे नाव आहे. राहत्या घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. शेजारी राहणाऱ्या आकाश राजू मोरे यांनी शहर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सागर गवंडी … Read more