वीज काेसळल्याने झाडाच्या फांदीचे झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारातील पेपर मिलच्या पूर्वेस कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीतील बांधावर असलेल्सा शिसमच्या झाडावर सोमवारी दुपारी वीज कोसळली. झाडाच्या फांद्या पन्नास फुटांवर उडून पडल्या. कोळपेवाडी परिसरातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट होऊन वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता. सोमवार दुपारी कोळपेवाडी परिसरात आभाळ दाटून आले होते. … Read more

ठाणे येथून आलेल्या ‘त्या’ मुलीस कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  कोपरगाव तालुक्‍यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीस कोरोनाची बाधा झाली असून. कोपरगावात हा कोरोनाचा दुसरा रुण आढळला आहे. मुलीवर कोपरगाव येथील कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये उपचार आहेत. कोपरगावातील १७ पैकी १ अहवाल निगेटिव्ह तर एक पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या १ जणांचे तसेच ठाणे येथून आलेल्या दोन मुलींना धोत्रे … Read more

त्या महिला डॉक्टरमुळे कोपरगावकरांचा जीव टांगणीला !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगाव येथील एका कोरोनाबाधित महिला डॉक्टरच्या संपर्कातील पाच व्यक्तींचे स्त्राव शुक्रवारी नगर येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्या पाचही जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शनिवारी आणखी ९७ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. राहाता तालुक्‍यातील लोणी येथील कोरोनाबाधित व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्या कोपरगावच्या महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटीव … Read more

तब्बल अकरा महिन्यानंतर व्यापारी महिलेवर गोळीबार करणारा जेरबंद !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : मागील वर्षी जुलै महिन्यात कोपरगाव शहरातील एका व्यापारी महिलेवर रात्रीच्या वेळी गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेरव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) यास पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचून तब्बल अकरा महिन्यानंतर जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्यातील गावठी पिस्तूलही ताब्यात घेतल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली. याबाबत सविस्तर … Read more

जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगावच्या जनतेने निवडून देताना विकासाचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबबादारी खांद्यावर घेत मतदारसंघातील रेंगाळलेले पाणी, रस्ते विजेचे प्रश्न मार्गी लावत आहे. यापुढेही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१९/२० नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह !

File Photo

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 :  कोपरगाव शहरातील एका विद्यालयातील कोरोनाबाधित लिपीकाच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींपैकी शहरातील एका महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नसूनही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर इतर १२ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौदर यांनी दिली. राहाता तालुक्यातील लोणी येथील … Read more

नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कला करोनाची बाधा !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेतील क्लर्कला करोनाची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कातील सात जणांना आरोग्य यंत्रणेने ताब्यात घेऊन त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले आहेत. लोणी-पिंपरी निर्मळ रस्त्यालगतच्या विद्यानगरभागात राहणार्‍या क्लर्कला त्रास होऊ लागल्याने त्याने गावातील खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. मात्र त्रास कमी होत … Read more

ब्रेकिंग : दुधाच्या टॅकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भरधाव वेगात असलेलल्या दुधाच्या टॅकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२) रोजी कोपरगाव तालुक्‍यातील येसगावमध्ये झाला. कोपरगावकडून येसगाव येथे लताबार्ड पवार व बाळू भोंगळे हे मोटारसायकलवरुन (एम. एच. १७, ए. एस.४६3५) घरी परतत होते, गावामध्ये वळत असताना अचानक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याने कोरोनाला हरविले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  राहाता संगमने, वैजापूर, सिन्नर, येवला व लासलगाव असा चोहोबाजूंनी रेड झोन मध्ये घेरलेलो असताना गेल्या 55 दिवसात कोपरगाव नगरपालिका आणि कोपरगाव ग्रामीण क्षेत्रात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. कोपरगावसाठी ही आनंदाची बाब आहे. तालुक्यातील ७९ जणांची आजअखेर कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७३ जणांना नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले … Read more

पुढील दोन वर्षात एकही मुलगा जन्माला घालणार नाही ‘या’ गावातील जोडप्यांचा निर्धार !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : कोरोनाने सर्व देशभर धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाने अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम केला. परंतु आता नवविवाहित जोडप्यांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. याचाच एक परिणाम म्हणजे कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. गोधेगावची … Read more

लग्नाची परवानगी मागताना खोटी माहिती दिल्याने त्या परिवारासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- मुलीच्या लग्नासाठी महसूल खात्याकडून परवानगी काढताना वर पक्ष कोपरगावातील असल्याचे खोटे सांगितले. मुर्शतपूर येथे मंगळवारी लग्नाच्या ठिकाणी छापा टाकला असता वऱ्हाड मुंबईहून आल्याचे समजताच वधू-वरांसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचे वडील उत्तम नबाजी भालेराव यांनी खोटी माहिती देऊन लग्नाची परवानगी मिळवली. लग्नस्थळी अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हते.परवानगी काढताना … Read more

विजेचा धक्का बसून दोन मुलींचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला दोन अल्पवयीन चिकटल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला. ही रविवारी ( दि . २४ मे ) रोजी सायंकाळी सात वाजता घडली. जेऊरकुंभारी येथील दोघी अल्पवयीन मुली गाडी शिकण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी आल्या … Read more

दिलासादायक : ‘त्या’ मृत महिलेचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर पंचक्रोशीत असलेल्या मनाई वस्ती परिसरात काल एक महिला मृत पावली होती. तिला कोरोना अथवा सारी झाल्याची शक्यता वर्तवली होती. तिच्या स्त्रावाचे नमुने नगर येथे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी ग्रामीण रुग्णालयात प्राप्त झाला. महिला ही निगेटिव्ह आल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी सांगितले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेचा सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- कोपरगाव शहरातील मनाई वस्ती संवत्सर येथील २२ वर्षांच्या विवाहितेचा शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान सारीसदृश आजाराने उपचारांदरम्यान मृत्यू झाला. संसर्गजन्य आजाराचा तालुक्यातील हा तिसरा बळी आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले, या महिलेला सर्दी, खोकला व कफ झाल्याने दम लागत होता. शुक्रवारी सकाळी दहाच्या दरम्यान ग्रामीण … Read more

सत्ता गेली म्हणून वैफल्यग्रस्त न होता आंदोलन करणे टाळले पाहिजे

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- संपूर्ण जगभर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जीवघेण्या वेगाने वाढत असून मोठ्या प्रमाणात राज्यासह देशातही कोरोनामुळे बळी जात आहेत. अशा संकटकाळी तरी राज्यात कोरोना विषयावरून आंदोलन-संघर्ष-वाद होणे योग्य नाही. सत्तारूढ व विरोधी पक्षांनी समजुतदारपणे एकमेकांना प्रतिसाद देऊन कोरोना विरुद्ध एकजुटीने कसे लढायचे हे ठरवले पाहिजे. राजकारण करायला आयुष्य पडलेले आहे. आजच्या … Read more

राज्यात आरोग्य सुविधांचा अभाव, महाराष्ट्र शासन पूर्णत: अपयशी ठरले

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात सर्व राज्यांना मोठया प्रमाणात आर्थिक सहकार्य केले. कर्नाटक, हरियाणा,गुजरात,दिल्ली,केरळ आदी राज्यांनी ज्या प्रमाणाने पॅकेज जाहीर केले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील कोविडसाठी पॅकेज जाहीर करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना … Read more

‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पतीसह, सासू सासऱ्याला अटक

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर वडाचीवाडी येथील विवाहित महिला जयश्री गोरक्षनाथ गावंड (वय २९) या विहिरीत मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांना वर काढल्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पती गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड, सासरा बाळासाहेब कारभारी गावंड, सासू लहानबाई बाळासाहेब गावंड या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत महिलेचे … Read more

सभासदांना सॅनिटायझरचे मोफत वाटप

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोपरगाव : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या ९ हजार ३८८ ऊसउत्पादक सभासदांना कारखान्याने स्वत: उत्पादन केलेल्या संजीवनी हॅँड सॅनिटायझरच्या प्रत्येकी चारप्रमाणे ३७ हजार ५५२ बाटल्यांचे मोफत घरोघर वितरण करण्यात आल्याची माहिती संजिवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली. याबाबत कोल्हे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा … Read more