पूल कोसळला आणि रोलर उलटला; चालक ठार

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यामध्ये रस्त्याचे काम सुरु असताना अचानक पूल खचून रोलर पलटी झाला. या अपघातात रोड रोलर चालक सुनिलकुमार गौड यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत येथील राशीन रोडवर पाण्याच्या टाकीसमोरून जात असणाऱ्या कर्जत थेरवडी या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरु आहे. या रस्त्यावर मंगळवारी कोळवाडी शिवारात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ, चोवीस तासांत वाढले तब्बल एवढे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९६ हजार ४९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११६३७ … Read more

बससेवा बंद असल्याने कोपरगाव आगाराला 22 कोटींचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-  गेल्या वर्षभरापासून देशावर कोरोनाचे संकट कायम आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात अचानक लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यात एसटीची वाहतूक देखील बंद करण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात प्रवासीच नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. कोपरगाव आगाराला २०१९- २० या आर्थिक वर्षात ३२ कोटींचे उत्पन्न झाले होते. … Read more

अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या तिघांवर कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात संचारबंदी , जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वेगळात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यातच चोरी छुप्या पद्धतीने दारूची विक्री सुरु आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९३ हजार ४९५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७६६ इतकी … Read more

अरे देवा ! संगमनेरात कोरोना रुग्ण ९ हजार पार !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-संगमनेरात रविवारी ९८ रुग्णांची भर पडल्याने बाधित संख्या ९ हजार पार करत ९०८१ झाली. शनिवारी १२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ८३३० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर ५८६ बाधितांवर उपचार सुरु असून ६७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शहरातील बाधित संख्या २७२६ तर ग्रामीणची ६२५७ आहे. सर्वाधिक १९१९ बाधितांची मार्चमध्ये … Read more

खासदार व आमदारांनी रुग्णसेवेसाठी निधी द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-आजपर्यंतचा कोरोना आजाराचा आकडा पाहता तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली. आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न करूनही दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून खासदार आणि आमदारांनी रुग्णसेवेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली. कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा आत्मपरीक्षण … Read more

अहो ऐकलंत का ? खासदार सुजय विखे करणार आहेत उपोषण !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- जिल्ह्यातील विविध नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पोकलॅनसह इतर यंत्रांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. हा वाळू उपसाचा तमाशा महसूल विभागाने तातडीने बंद करावा अन्यथा दहा दिवसात त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात … Read more

आ.रोहित पवार ठरले ‘पॉवरफुल’३९९.३३ कोटी निधी मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्याच्या दृष्टीने अतीशय महत्वाचा असणारा आणि नुकताच नव्याने घोषित झालेला राष्ट्रीय महामार्ग ५४८ (ड) मधील आढळगाव ते जामखेड या ६२.७७ किमी. दोन लेनच्या चौपदरीकरणाच्या कामाकरिता ३९९.३३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. विकासकामांचा धडाका सुरु ठेवणारे राष्ट्रवादीचे युवा नेते आ.रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रोहित पवार … Read more

एका दिवसात रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- कोरोनाची लाट आल्यानंतर राज्यात प्रथमच एका दिवसात रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला. रविवारी ५७,०७४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २७,५०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३० लाख १० हजार ५९७ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २२२ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची एकूण … Read more

त्या नुकसानीसाठी राज्य सरकार मदतीची भूमिका का घेत नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- राज्य सरकार विकेंड लॉकडाऊनसह काही निर्बंध लागू करत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे जे आर्थिक नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार ? त्यांना राज्य सरकार आर्थिक मदत का जाहीर करत नाही, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष. चंद्रकांत पाटील यांनी केला. राज्य सरकारच्या लॉकडाऊन संदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलत … Read more

नगर तालुका दूध संघात कोट्यवधींचा गैरव्यवहार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुका दुध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाने 8 कोटी 52 लाख 68 हजार 28 रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक नारायण धुरपदराव गाधेकर (वय 54 रा. भुतकरवाडी, सावेडी, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more

ग्राहकांना फाटलेल्या नोटा दिल्यास बँकांना होणार आर्थिक दंड

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-ग्राहकांना खराब किंवा फाटलेल्या नोटा देणाऱ्या बँकांना (Bank) आता मोठा दंड भरावा लागणार आहे. 100 रुपयांपर्यंतच्या खराब किंवा फाटलेल्या नोटेला 50 ते 100 रुपयांचा दंड (Fine) बँकांना भरावा लागणार आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserv Bank of India) ही नवी मार्गदर्शक सूचना जारी केली असून 1 एप्रिलपासून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्य परिवहन मंडळाची बस पलटली,वाहतुक ठप्प !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-राहूरी येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या चालकाचा स्टेरिंगवरिल ताबा सुटून बाजुला असलेल्या खड्ड्यात एस टि बस गेल्याने बसमधील १२ प्रवासी सुखरुप तर चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आहे. श्रीरामपूर -अहमदनगर एस टी बसचा राहुरीतील नगर मनमाड रोड लगत सूर्या पेट्रोल पंप महामार्गावर अपघात झाला आहे. बस मध्ये असलेले १२प्रवासी … Read more

केडगावातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या अटकेसाठी खासदार राऊतांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-केडगावातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुवर्णा कोतकर यांना अटक करावी तसेच विशेष सरकारी वकिल म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी अशी मागणी नगर शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे. दरम्यान 2018 साली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत केडगावात दोघा शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. … Read more

जिल्ह्यात पहिल्या दिवशी एवढ्या लोकांना देण्यात आली लस

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-करोना लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 227 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, वयोवृध्द (60 वर्षावरील) आणि आता 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. यातच देशात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक एकाच दिवसात तब्बल 1800 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८८ हजार ४७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८३३५ इतकी … Read more

श्रीगोंद्याच्या तहसीलदारांच्या कामाची पद्धत चुकीची , शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले – घनश्याम शेलार

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- श्रीगोंद्याचे तहसीलदार बेजबाबदारपणे वागत आहेत. सामान्यांची कामे करण्यात त्यांना रस नाही. तहसीलदारांच्या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेले २ कोटी १८ लाख ८१हजार रुपयांचे अनुदान परत गेले.त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले. तहसीलदारांच्या या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी … Read more