नेवासे तालुका मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांना राज्यात अग्रेसर बनवायचा आहे !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ४४ लाख रुपये किंमतीच्या विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण उदयन गडाख यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. उदयन गडाख म्हणाले, बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये रस्ता कामाचा अनुशेष होता. तो अनुशेष मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांच्या नेतृत्वाखाली भरून काढला जाणार आहे. गटातील मोठी … Read more

दहा बाधितांची भर पडताच गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून गुरुवारी (दि.1) झालेल्या रॅपिड टेस्ट कॅम्प मध्ये गावातील 9 व वाळुंज येथील 1 असे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शुक्रवार दि. 2 … Read more

थकीत वेतन मागितल्याचा राग आल्याने मजुराला बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- थकलेला पगार मागीतला म्हणून तिघांजणांनी महादेव वगारहंडे या मजूरास लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी जबरदस्त मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे. याबाबत राहुरी पोलिसांत तिघांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महादेव विठ्ठल वगारहांडे (वय २७ वर्षे रा. … Read more

अभिनेते रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान पुरस्कार जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अभिनेता रजनीकांत यांचे अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे. ‘ या आशयाचे ट्वीट करत प्रकाश जावडेकर यांनी ज्यूरी … Read more

हलगर्जीपणा भोवला; श्रीरामपूर तालुक्याने शंभरी ओलांडली

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरश कहर झाला आहे. यातच आता राहाता तालुक्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होताना दिसून येत आहे. यातच तालुक्याने गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांची शंभरी ओलांडली आहे. तालुक्यात बुधवारी उच्चांकी ११६ रुग्ण सापडले आहेत तर काल दिवसभरात ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान तालुक्यात … Read more

भक्तांविना जिल्ह्यातील महत्वाची तीर्थक्षेत्रे पडली ओस

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच राज्यात नाईट कर्फ्यूही लावण्यात आला. यामुळे राज्यातील मंदिरात पूर्वीप्रमाणे गर्दी दिसून येत नसून भाविकांविना जिल्ह्यातील महत्वाची तीर्थक्षेत्रे असलेली शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थान ओस पडली आहे. करोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्यानंतर मधल्या काळात शिर्डी व शनिशिंगणापूर येथे होऊ … Read more

राहूरीतील ‘ हा’ शेतकरी करणार आत्महदन !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राहुरी येथील पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील यश ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतात पाटाचे पाणि शिरत असल्याने त्याचे शेत पडीक राहत आहे. पाटबंधारे विभागाच्या या अनागोंधी कारभाराला वैतागून यश ढोकणे हा शेतकरी आपल्या कुटूंबासह आत्मदहन करण्याच्या तयारीत आहे. यश अशोक ढोकणे या शेतकऱ्याची … Read more

आरोपी बाळ बोठेची रवानगी पारनेरच्या जेलमध्ये

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. खंडणीच्या गुन्ह्यात कोर्टाने आज मंगळवारी बाळ बोठेला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता तो पोलिसांच्या ताब्यातून कोर्टाच्या निगराणीखाली पारनेरच्या जेलमध्ये गेला आहे. रेखा जरे हत्याकांडात पत्रकार असलेला … Read more

2 डोके,चार डोळे असलेल्या वासराचा जन्म !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-गोंदिया जिल्हातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगांवबांध येथील आझाद चौकातील रहिवाशी, शेतकरी दिनेशचंद्र उजवणे यांच्याकडे गेल्या काही अनेक वर्षांपासून पाळीव गायी आहेत, त्यातील एका गाईने एक विचित्र वासराला जन्म दिला आहे, या नवजात वासराला दोन डोके,चार डोळे आहेत शारीरिक व्यंग असलेल्या विचित्र वासराचा जन्म झाल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली … Read more

मंगलकार्यालय चालक आर्थिक संकटात; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- शहरातील मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे व्यावसाय बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाचे टॅक्स, हॉलचा असणारा अवाढव्य खर्च, बँकांची कर्जामुळे मंगल कार्यालय मालक हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. कोविडचे संकट दूर होत असताना पुन्हा पेशंट वाढल्याने पुन्हा मंगल कार्यालय, हॉल चालक … Read more

जिल्ह्यात रात्री नऊ ते सकाळी सहा संचारबंदी ! जिल्हाधिकारी भोसले यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेत शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी खबदारीचे आणखी एक पाऊल उचलले आहे. येत्या दि. १५ एप्रिलच्या कालावधीत जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत सार्वजनीक ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. … Read more

दुकानदार, फळे व भाजी विक्रेते या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांची बेफिकीरी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण आणि वाढती आकडेवारी यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासन सतर्क झाले आहे. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका … Read more

धोका वाढला : कोरोनासोबत करावा या गोष्टीचा सामना !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-देशभरात सध्या कोरोना संसर्ग वेगाने वाढत असून रोज धक्कादायक असे रुग्णसंख्येचे आकडे समोर येत आहेत मात्र कोरोना संकट सुरु असतानाच आणखी एक संकट ह्या वर्षी आपाल्याला भोगावे लागणार आहे. यंदा मार्च महिना संपण्याआधीच राज्याच्या विविध भागांत उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसार (ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स) भारत … Read more

महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे, पटोलेंचा शिवसेनेला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी, लवकरच मुख्यमंत्री उद्धव … Read more

जर तुम्ही ‘ह्या’ बँकेसोबत मिळवला हात तर आपल्याला स्वस्तात पडेल पेट्रोल-डिझेल

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत शंभर रुपयांच्या पलीकडे गेली आहे. बर्‍याच दिवसांपासून, पेट्रोलचे दर केवळ वाढत आहेत आणि आता लोक स्वस्त पेट्रोल आणि डिझेलची अपेक्षा करीत आहेत. तुम्हालाही स्वस्त पेट्रोल आणि डिझेल हवे असे वाटत असल्यास ही बातमी नक्की वाचा. युनियन बँकेमुळे हे शक्य होऊ शकते. होय, आता युनियन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा रेकॉर्ड …एकाच दिवसात वाढलेत इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-जिल्ह्यात आज ६६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ०९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३३८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४७९९ इतकी झाली … Read more

कापड बाजार, मोची गल्लीतील रस्त्यावरील अतिक्रमणे काढा

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-कापड बाजारातील अनाधिकृत अतिक्रमणे काढावीत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाज कंटकांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जय जिव्हेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्त यांना संयुक्तरित्या दिले. कापड बाजारातील घासगल्ली, शहाजी रोड, नवीपेठ, महात्मा गांधी रोड, मोची गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच पथविक्रेत्यांनी बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे अतिक्रमणे केलेली आहेत. या … Read more

भिंती रंगवून नगरकर देतायत स्वच्छतेचा संदेश

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- स्वच्छ भारत अभियाना निमित्त नगर शहर हे फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी सज्ज झाले असून मनपाच्या वतीने विविध ठिकाणी भिंती रंगवून स्वच्छतेचे संदेश देण्याचे काम केले आहे. या माध्यमातून नागरिकांनामध्ये जनजागृती होण्यास मदत होईल. मनपाचे घनकचरा विभागातील कर्मचारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबवित आहे. याचबरोबर नगरकरही या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठया संख्येने उतरले … Read more