संशय घेऊन खून; पतीला जन्मठेप

पुणे :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विनोद नवबहादूर भंडारी (३४, रा. गोऱ्हे बुद्रुक, हवेली, पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने आपली पत्नी तलाशी विनोद भंडारी (२५) हिचा खून केला होता. याप्ररकणी बाळासाहेब नामदेव जावळकर यांनी … Read more

चिंता मिटली,जिल्ह्यातील धरणांत आहे इतका जलसाठा !

अहमदनगर :- दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला कमी प्रमाणात पाऊस होतो. मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र सुरुवातीला चांगला पाऊस होतो. ऑगस्टच्या मध्यात ही धरणे जवळपास भरत येतात. परंतु, यंदा परतीच्या पावसामुळे व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सध्या साठ्याची स्थिती चांगली आहे. यंदा नोव्हेंबर महिना संपत आला असला, तरी … Read more

देवेंद्र फडणवीसांचे मोठे नुकसान झाले !

मुंबई :- भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. भाजप आता विरोधी बाकावर बसणार असल्याचे निश्चित झाले आहे आणि राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपने अगदी शेवटपर्यंत अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाविकास आघाडीची घडी एवढी … Read more

आणि अजितदादा बोलले…’झालं ते झालं, आता नव्याने सुरुवात करायचीय !

मुंबई :- बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झालेले राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे पुन्हा मूळ पक्षात बुधवारी सक्रिय झाले आहेत.  यशवंतराव चव्हाण सेंटरमधील पक्षाच्या बैठकीत अजितदादांनी केवळ हजेरीच लावली नाही तर नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शनही केले. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडासंदर्भात शंका व्यक्त केली गेली नसेल तर नवलच  राष्ट्रवादीतील आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा अजित पवार यांना विश्वास … Read more

डाॅ. किरण लहामटेंचा समावेश मंत्रिमंडळात करण्याची मागणी

अकोले :- मधुकर पिचड व वैभव पिचड यांची ४० वर्षांची सत्ता उलथवणारे आमदार डाॅ. किरण लहामटेंचा समावेश मंत्रिमंडळात करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे, अमित भांगरे यांनी केली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

हेलिकॉप्टरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत १३ सैनिकांचा मृत्यू

पॅरिस : आफ्रिका खंडातील राष्ट्र मालीमध्ये एका लष्करी अभियानादरम्यान दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाल्याची भीषण दुर्घटना घडली. या घटनेत फ्रान्सच्या दहशतवादविरोधी दलाच्या १३ सैनिकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांसोबत संघर्ष सुरू असताना सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संवेदना व्यक्त करताना दिली. ठार झालेल्या सैनिकांमध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही कालावधीपासून फ्रान्सकडून … Read more

मोदी सरकारच्या हाती राज्यघटनेची मूल्ये सुरक्षित नाहीत !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे राज्यघटना सर्वोच्च असल्याचे सांगत आहेत; परंतु त्याच वेळी दुसरीकडे महाराष्ट्रात जे काही चालले आहे, यावरून या सरकारच्या हाती लोकशाही, राज्यघटना सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते, असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मंगळवारी संविधान दिनाच्या औचित्याने संसद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मोदी … Read more

देवेंद्र फडणवीसांनी रचले ‘हे’ तीन विक्रम

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या नावे तीन विक्रमांची नोंद झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. याचबरोबर सगळ्यात अल्पकाळ टिकलेल्या सरकारचे मुख्यमंत्री राहण्याचादेखील विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. १९६३ मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर पी. के. … Read more

आयुर्विम्याच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून होणार मोठे बदल !

नवी दिल्ली : आयुर्विम्याच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून मोठे बदल होणार आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया (इरडा) ही नवीन नियम लागू करणार आहे. नव्या नियमांनुसार विम्याचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे, तर गॅरेंटीड रिटर्न काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे सीएमओ कार्तिक रमन यांनी सांगितले की, जरी हप्ता वाढला तरीही … Read more

मुद्रा योजनेची परतफेड होत नसल्याने आरबीआय चिंतेत

मुंबई : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून लघु उद्योजकांसाठी ‘मुद्रा कर्ज योजना’ आणली. देशभरातील अनेकांनी या योजनेचा लाभ घेत मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले, परंतु आता कर्जाची परतफेड होत नसल्याने यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँके (सिडबी)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सूक्ष्म वित्तवरील कार्यक्रमात भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युप्टी गव्हर्नर … Read more

नगर – सोलापूर महामार्ग झाला मृत्यूमार्ग, धुळीच्या साम्राज्याने आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

मिरजगाव : नगर – सोलापूर राज्य महामार्गाची दूरवस्था झाल्याने पावसाने झालेल्या खड्डयांतून काढले आणि धुळीत टाकले, अशी गत मिरजगावकरांची झाली आहे. या राज्य महामार्गाची दूरवस्था झाल्याने अपघातांची संख्या वाढली असून, रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून ज़ावे लागत आहे तर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गावरील खड्डयांमुळे व धुळीच्या साम्राज्यामुळे महामार्ग परिसरातील नागरिकांचे … Read more

किरकोळ बाजारात कांदा शंभरीपार !

सुपा : अवकाळी पावसाचा फटका नव्या कांद्याला बसला आहे. बाजारात दाखल होत असलेला कांदा ओला असला तरी त्याला स्थानिक परिसरासून मागणी आहे. जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढली आहे. मात्र, त्याचा साठा संपत आल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली असल्याचे कांदा व्यापारी सांगतात. पावसामुळे नव्या कांद्याचे झालेले नुकसान तसेच साठवणुकीतील जुना कांदा संपत आल्याने घाऊक बाजारात जुन्या … Read more

महसूल पथकाच्या ताब्यात असलेला जेसीबी व ट्रॅक्टर पळवला

कर्जत : महसूलच्या पथकाने ताब्यात घेतलेली अवैध वाळू उपसा करणारी वाहने कारवाईसाठी घेवून येत असताना अमोल काळे, राहूल काळे, स्वप्नील भगत व इतर अनोळखी इसमांनी या पथकास दमदाटी करून सदरची वाहने पळवून नेले. ही घटना दि.२५रोजी कर्जत तालुक्यातील नागलवाडी गावातील सीना नदीपात्रात घडली. याबाबत कर्जतचे निवासी तहसीलदार सुरेश प्रभाकर वाघचौरे यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली … Read more

तृप्ती देसाई दर्शनासाठी शबरीमलात

कोची : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तथा महिलांच्या अधिकारासाठी झटणाऱ्या समाजसेविका तृप्ती देसाई या भगवान अयप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी शबरीमला येथे पोहोचल्या. यावेळी देसाई यांच्या सोबत चालूवर्षी जानेवारी महिन्यात अयप्पा मंदिरात जाऊन दर्शन घेतलेल्या सामाजिक कार्यकत्र्या बिंदू अम्मिनी यांच्यासह काही महिला कार्यकत्र्याही होत्या. यावेळी एका माथेफिरूने बिंदू यांच्या चेहऱ्यावर मिरची-स्प्रे फवारल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर … Read more

कर्जत शहरात चोरांचा धुमाकूळ, मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले!

अहमदनगर : कर्जत शहरात सध्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वीच एकाच दिवशी दोन सोन्याची दुकाने फोडून मोठा ऐवज लंपास केला होता. त्यांनतर बीएसएस मायक्रो फायनान्स या कंपनीचे कार्यालय फोडून साडे तेरा हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.याबाबत कर्जत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की,कर्जत शहरातील शिक्षक कॉलनीत असेलेले … Read more

अतिरेक्यांच्या हल्ल्यात सरपंच ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरू असलेल्या एका सरकारी कार्यक्रमादरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात एक सरपंच व फळबाग विभागातील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाकडून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राबविल्या जात असलेल्या ‘बॅक टू व्हिलेज’ कार्यक्रमादरम्यान हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर अनंतनागच्या अतिरिक्त उपायुक्तांना तातडीने बैठकीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर सुरक्षा जवान अतिरेक्यांच्या मागावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. … Read more

शेतीच्या वादातून महिलेस लाथाबुक्यांनी जबर मारहाण, पतीस ठार मारण्याची धमकी!

अहमदनगर : कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला असून तुमच्या कोर्टाच्या निकालानंतर व ताबा मिळाल्यानंतर तुम्ही शेती करा.असे सांगितल्याचा राग आल्याने पाच जणांनी एका महिलेस मारहाण करून जबर जखमी केले आहे. याबाबत जानकाबाई कचरू पिंपळे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर असे की, या शेतीचा वाद कोर्टात सुरू आहे.व निशान पाच या … Read more

दिल्लीतून राजीनाम्याचे निर्देश

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिल्लीतून आल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्यात भाजपाची सूत्रे हलविणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तत्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. न्यायालयाने फडणवीस सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले होते. तसेच विश्वासदर्शक ठरावावर गुप्तऐवजी उघड मतदान घेण्यात यावे आणि … Read more