त्या १६ अपात्र आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर आगामी ५ डिसेंबर रोजी राज्यात १५ जागांसाठी होऊ घातलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत यापैकी १३ जणांना भाजपने उमेदवारी देऊ केली आहे. या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवीत राज्यातील सरकारला पूर्ण बहुमत मिळवून देण्याचा भाजपचा मुख्य … Read more

डास चावल्याने त्रस्त झालेल्या पत्नीने रागाच्या भरात पतीला मुसळाने बदडले !

अहमदाबाद :- शहरात डास चावल्याने त्रस्त झालेल्या पत्नीने रागाच्या भरात पतीला मुसळाने बदडले असल्याची घटना घडली आहे. यात पतीला जबर मार लागला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या उजव्या डोळ्याजवळ सात टाके टाकण्यात आले आहेत. या घटनेत मुलीने देखील आईला साथ दिली असल्याचे वृत्त आहे. अहमदाबादमधील नरोदा भागात भूपेंद्र लेऊआ आपल्या कुटुंबासमवेत … Read more

पारनेरमध्ये जेसीबी पळविला !

पारनेर :- तहसिलदार व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृह परिसरातून वनकुटे येथील चार वाळू तस्करांनी पळवला. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिस अधीक्षक ईशू सिंंधू यांनी वाळूतस्करी बंद करण्याच्या सूचना प्रत्येक ठाण्याच्या अधिकाऱ्यास दिल्याने वाळूतस्करी थंडावली होती. विधानसभा निवडणुकीत पोलिस तसेच महसूल यंत्रणा व्यग्र झाल्याने अवैध … Read more

…तर बाळासाहेब थोरात होणार उपमुख्यमंत्री !

अहमदनगर :- राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस अशी एक नवीच आघाडी महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे. हे तिन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे सहाजिकच सत्तावाटपाचे सूत्र कसे अमलात येईल याबाबत उत्सुकता आहे. मात्र, ही उत्सुकता कायम असतानाच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या आमदाराची मंत्रिपदावर वर्णी … Read more

बालिकाश्रम रोडवर दोन गटांमध्ये दगडफेक

अहमदनगर : शहरातील बालिकाश्रम रोडवरील पोलिस कॉलनीजवळ जुन्या भांडणाच्या कारणातून दोन गटांमध्ये हाणामाऱ्या होऊन दगडफेक झाली.    त्यात दोन्ही गटांतील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध जीवे मारण्य़ाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, दंगा करणे या कलमांनुसार तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   विठ्ठल नंदू … Read more

संध्याकाळी ६ वाजेनंतर जड जेवण घेण्याची सवय असेल तर हे नक्की वाचा !

वृत्तसंस्था : न्यूयॉर्क संध्याकाळी सहा वाजेनंतर जड जेवण करणे महिलांच्या हृदयांसाठी घातक असल्याचे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे.अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे १६ ते १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वैज्ञानिक परिषदेत याबाबतचे संशोधन सादर केले जाणार आहे. सरासरी वय ३३ वर्षे असलेल्या ११२ महिलांवर हे संशोधन करण्यात आले आहे. या महिलांवर वर्षभर संशोधन करण्यात आले … Read more

मुलाला फाशी देत आईची छताला गळफास घेऊन आत्महत्या !

नांदगाव : दीड वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईनेही घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील मणिकपुंज येथे घडली. गोरख तुकाराम मेंगाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरी करून उदरनिर्वाह करणारे गोरख आणि राहीबाई त्यांचा दीड वर्षाचा मुलगा संदीप, भाऊ शरद आणि त्याची पत्नी मंगलाबाई एकत्र मणिकपुंज … Read more

शिवसैनिक संतापला : उद्धव ठाकरे बोलत नाहीत तोपर्यंत टॉवरवरून उतरणार नाही !

नंदुरबार :- शिवसेना व भाजपला मतदारांनी जनादेश दिल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचा हा निर्णय शिवसैनिकांसह मतदारांचा अनादर करणारा आहे. ठाकरे यांनी भाजपसोबतच राज्यात सत्ता स्थापन करावी, या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील कार्ली गावातील तुकाराम पाटील या शिवसैनिकाने मोबाइल टॉवरवर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन सुरू … Read more

बेकायदा गर्भपातप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा 

जामखेड – अकलूज येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून स्रीगर्भ असल्याचे समजताच जामखेड येथील दुकानातून गोळ्या घेऊन गर्भपात केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मच्छिंद्र वायफळकर, शिवाजी कपणे व पाटील (पूर्ण नाव माहीत नाही), दोन महिलांसह लिंगनिदान करण्यासाठी मदत करणारा डॉक्टर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील आरोळेवस्ती येथील विवाहितेने अकलुजजवळील एका गावातील … Read more

पत्नी, मुलाचा चाकूने भोसकून खून करून आत्महत्येचा प्रयत्न

माजलगाव :- पत्नी, मुलाचा चाकूने भोसकून खून करून आरोपीने नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील मोगरा गावाजवळील रामनगर तांड्यावर बुधवारी दुपारी घडली. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. बंडू उत्तम जाधव (४०) असे आरोपीचे नाव आहे. रामनगर तांड्यावर तो वास्तव्यास आहे. बुधवारी पत्नी गंगा, मुलगा करण व मुलीसह तो शेतात कापूस वेचत … Read more

अयोध्येचा होणार कायापालट, राममंदिर असेल देशातील सर्वात मोठे देवस्थान !

लखनऊ :- अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार तेथे कायापालट करण्याची योजना आखत आहे. येथे आगामी काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बस टर्मिनल आणि विमानतळ उभारले जाईल. सोबत रिसॉर्ट आणि पंचतारांकित हॉटेल्सही असतील.  शरयू नदीत क्रूझ सेवा देण्याची योजनाही यात आहे. अयोध्या मंडळाचे माहिती उपसंचालक मुरलीधरसिंह यांनी ही माहिती दिली. सर्वात आधी अयोध्या तीर्थक्षेत्र विकास परिषद स्थापन … Read more

शरद पवारांच्या गेममुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री ?

मुंबई :- शरद पवारांच्या गेममुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात महाशिवआघाडी उदयास आली तर पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, त्यानंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत. सत्तेच्या याच सारीपाटात राष्ट्रवादी काँग्रेस एक विक्रम … Read more

बचत गटांसाठी 27 नोव्हेंबरला कार्यशाळा

अहमदनगर : बचत गट स्थापन करून महिला व शेतकरी सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या किंवा असे गट स्थापन करून ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करू इच्छिणाऱ्या महिला भगिनी व शेतकरी बांधवांसाठी लोकरंग फाउंडेशन संस्थेने दि. 27 नोव्हेंबर, 2019 रोजी (बुधवार) एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.   थेट शेतमाल विक्री, ऑनलाईन मार्केटिंग व अन्नपदार्थ पॅकेजिंग उद्योगमधील … Read more

कागदावरच झाडे लावणाऱ्या अधिकाऱ्याचे नगरसेवकाने धरले पाय!

नगर – शहरात तब्बल १७ हजार झाडे लावल्याचा दावा प्रशासनाने केल्यानंतर नगरसेवक गणेश भोसले यांनी यादी मागवली. ही झाडे कागदावरच लावल्याचे स्पष्ट झाले. उद्यान विभागाच्या या कारभारामुळे संतापलेले नगरसेवक गणेश भोसले यांनी या विभागाचे यु. जी. म्हसे यांचे पाय धरून दर्शन घेतले. या प्रकारामुळे मनपाचे प्रशासन किती निर्ढावले आहे, हे स्पष्ट झाले. मनपा स्थायी समितीची … Read more

श्रीरामपूरमध्ये दोघांना लाच घेताना पकडले !

श्रीरामपूर: पत्नीच्या नावाने काढलेला जीएसटी क्रमांक दंड न भरता बंद करण्याठी चार हजारांची लाच घेताना नगरच्या जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. येथील हरिकमल प्लाझा येथे ही कारवाई करण्यात आली.  तक्रारदार हे श्रीरामपूरमधील असून पत्नीच्या नावे व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी जीएसटी नंबर डिसेंबर २०१८ मध्ये काढला होता. काही कारणामुळे ते व्यवसाय … Read more

बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवल्याच्या वादातून बेदम मारहाण

कोपरगाव : बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास पाच जणांनी पहार व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना ६ ला संजयनगरमध्ये घडली. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या संदर्भात राहुल सोमनाथ गायकवाड (२० वर्षे) यांनी फिर्याद दिली. बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवली, याचा जाब फिर्यादीने विचारला असता अमोल संपत रोठे, सोमनाथ संपत रोठे, … Read more

आमदार बच्चू कडू यांना अटक !

मुंबई :- प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू हे  ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा काढून जोरदार आंदोलन करणार होते. यावेळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. Maharashtra: Farmers in Mumbai staged a … Read more

अण्णा हजारे यांची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

पारनेर :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी अवमानकारक वृत्त प्रसिद्ध केल्याने समर्थकांनी बुधवारी संताप व्यक्त करत त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे केली. २० नोव्हेंंबरपर्यंत कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील एका दैनिकाने रामजन्मभूमीच्या निकालानंतर हजारेंच्या तोंडी काही आक्षेपार्ह विधाने घातली. … Read more