माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर : श्रीगोंद्यातील तरुणाचा दशक्रिया विधी महावितरण कार्यालयाच्या आवारात केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह ३० जणांविरुद्ध सोमवारी (दि. ११) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या संदेश आढाव वय १७ याचा शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. … Read more

निवडून आलेले ते सर्व आमदार बिनकामाचे

अहमदनगर :- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता राज्यात निवडून आलेले 288 आमदारांना कोणतेच अधिकार राहिले नसून. यामुळे हे सर्व आमदार बिनकामाचे ठरणार आहेत. राष्ट्रपती राजवटीमुळे राज्यात निवडून आलेले 288 आमदार यांना कोणतेच अधिकार राहणार नाही.राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत त्यांची अवस्था अशीच राहणार आहे. दरम्यान या आमदारांचं विधानसभा सदस्यत्व कायम राहणार असून जोपर्यंत विधानसभा … Read more

श्रीगोंद्यात कार अपघातात एक ठार

श्रीगोंदा :- स्कार्पिओची (एमएच ४२ के ८६२२) आय टेन कारला (एमएच १६ बीएच ४७१०) धडक बसून जयसिंग मरकड या तरुण इंजिनियरचा मृत्यू झाला, तर अन्य व्यक्ती जखमी झाले. १० नोव्हेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास नगर-दौंड रस्त्यावर काष्टीजवळ शिवनेरी पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. मरकड हे काष्टीहून पाचपुतेवाडीकडे जात होते. स्कार्पिओ चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात … Read more

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून घरात घुसून लैंगिक अत्याचार

पारनेर :- तालुक्यातील वडगाव दर्या येथे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्या चुलत भावाने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली. मुलीचे आई-वडील जवळच्या गावात नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. शाळेला सुटी असल्याने मुलगी घरी एकटीच होती. दुपारी एकच्या सुमारास ती घरात टीव्ही पाहत असताना शेजारी राहणारा चुलत भाऊ घरात आला. त्याने पिण्यासाठी पाण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :रक्ताच्या नात्याला काळिमा वडिलांकडून मुलीवर अत्याचार !

पारनेर :- तालुक्यातील सुपे येथे वडिलांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून रक्ताच्या नात्याला काळिमा फासलीय. या घटनेमधील पीडिता अल्पवयीन आहे. वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,सुप्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बापाने शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास स्वतःच्या मुलीस वासनेची शिकार बनवली. अत्याचारानंतर कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची … Read more

सरसकट पीक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील: आ.तनपुरे

अहमदनगर: योग्य पद्धतीने नियोजन करून मुळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी नगर पाथर्डी तालुक्यांसाठी योजनेमार्फत पुरवले जाईल. शेतकऱ्­यांच्या जनतेच्या हिताच्या प्रश्­नासाठी कायम कटिबद्ध असून, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्­यांना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सरसकट पिक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील खोसपुरी येथे … Read more

मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास तीन वर्षे शिक्षा

नेवासा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत भाऊसाहेब पवार (रा. लोहगाव, सोेनई, ता. नेवासा) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत पवार याने सन २०१८ साली पिडीत मुलगी ही दहावीचा पेपर देण्यासाठी जाताना व … Read more

आ. थोरातांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम

संगमनेर : सहकारामुळे रोजगार निर्मिती होवून ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. शासनाने नेहमी सहकाराला पूरक असे धोरणे घेणे गरजेचे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम असून, शेतकऱ्यांसाठी शाश्­वत असलेल्या ऊस पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब … Read more

कांद्यास सहा हजार रूपये भाव

राहुरी : बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर काल गावरान कांद्याची २,९५० गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास सहा हजार रूपये क्विंटल भाव मिळाला असून लाल कांद्याची १२२७ कांदा गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास तीन हजार रूपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे (गावराण … Read more

सरकारविरोधात हिंसक आंदोलनात १५०० जखमी

यॉर्क : हिंसाचाराच्या गर्तेत रुतलेल्या इराकमध्ये सरकारविरोधात जनक्षोभ उसळला आहे. इराक सरकार बरखास्त करणे, देशात आर्थिक सुधारणा घडविणे, रोजगार निर्मिती या मुद्यांवर गेल्या महिनाभरापासून देशात हिंसक निदर्शने होत आहेत. आतापर्यंत यात ३१९ जणांना प्राण गमवावा लागला आहे. तर पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरात १५ हजार जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, हिंसाचार थांबवून इराकमध्ये तातडीने सार्वत्रिक निवडणूक … Read more

भारतात मान्सून उशिरापर्यंत थांबल्यामुळे ऑस्ट्रेलियाला भोगावे लागत आहेत हे परिणाम !

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पूर्व सागरी किनाऱ्यावरील राज्यात वणव्यामुळे धगधगत्या ज्वालांचे आव्हान उभे राहिल्याने सरकारला अखेर आणीबाणी घोषित करावी लागली. भारतात मान्सून गरजेपेक्षा जास्त काळ थांबल्यामुळे ऑस्ट्रेलियावर बिकट परिस्थिती ओढावल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. जवळपास १० लाख हेक्टर परिसरातील भीषण वणव्यामुळे न्यू साऊथ वेल्स राज्यात आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला, तर … Read more

पोटनिवडणुकीचा खर्च ‘त्या’ उमेदवारांकडून वसूल करावा

जामखेड : सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले आमदार, खासदार नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: राजीनामा दिल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारास विज़यी घोषित करावे तसेच अशा मतदारसंघात सरकारी खर्चातून पुन्हा निवडणूक घेऊ नये, यदा कदाचित पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्यास राज़ीनामा दिलेल्या उमेदवाराकडून पोटनिवडणुकीचा खर्च वसूल केला ज़ावा अशी मागणी महाराष्ट्र धडाका आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. महारुद्र … Read more

शेतीच्या वादातून बेदम मारहाण 

अहमदनगर : नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे येथे शेतातील पाईप कोणी काढले असे विचारल्याचा राग येवून ८ जणांनी शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळासाहेब भगवंत मगर (वय ६७, रा. जेऊर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या शेतातील पाण्याचे पाईप काढलेले दिसल्याने त्यांनी पाण्याचे पाईप कोणी … Read more

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

श्रीरामपूर : वडिलांनी बोलाविले असल्याचे सांगून येथील एका शाळेत सहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. टिळकनगर येथील संविधान कॉलनीत काल दुपारी हा प्रकार घडला. ही अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी असता एक तरुण तोंडाला रुमाल बांधून लाल टी शर्ट व काळी जीन्स पॅन्ट परिधान करून दुचाकीवरून मुलीच्या घरी आला. तुला तुझ्या … Read more

तरुणाचा गळा आवळून खून 

सोलापूर : माळशिरस येथे एका तरुणाचा गळा आवळून खून झाल्याची घटना दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री घडली असून योगेश औदुंबर गुरव (वय २३, रा.माळशिरस) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत माळशिरस पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत तीन ते चार जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. योगेश हा १० नोव्हेंबर रोजी बाजारतळ येथील आपल्या घरातून … Read more

सर्वात मोठा तुळशी विवाह उत्साहात

अकोले : आकर्षक रंगित लग्नपत्रिका, त्यात प्रमुख उपस्थित अतिथी, कार्यवाहक, आशिर्वाद देणाऱ्यांची आणि प्रेक्षकांची भली मोठी यादी, सोबत मामा व मित्र परिवाराचा उल्लेख, घरोघरी जाऊन दिलेले प्रत्यक्ष निमंत्रण, सनईचे मंजुळ सूर, ढोल ताशांचा नाद, आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, मान्यवरांचे सत्कार, वऱ्हाडी मंडळीची लगबग, नटलेल्या करवल्यांची लुडबुड, स्वागतासाठी दरवाजात उभे असणारे यजमान, अंगावर शिंपडले जाणारे … Read more

एका चुकीमुळे वडील-मुलगी उकळत्या तेलात होरपळली

झाशी : मध्य प्रदेशातील झाशी येथील सिपरी बाजार भागातील अंगावर शहारे उभे करणारी घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आली आहे. झाले असे की, मिठाईच्या दुकानाबाहेर स्कूटीवर पुढे बसलेल्या मुलीने अचानक गाडीचे सेल्फ बटन दाबले. त्यामुळे स्कूटी थेट दुकानात घुसली. जिलेबीचा पाक आणि उकळत्या तेलात मुलगी आणि तिचे वडील जाऊन पडले. त्यामुळे मुलगी आणि वडील गंभीररीत्या भाजले. … Read more

हातात रायफल घेऊन लग्नात !

गुवाहाटी : केंद्र सरकार एकीकडे ईशान्य भारतातील नागा बंडखोरांशी ऐतिहासिक शांतता करार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशातच नागा संघटनेचा प्रमुख किलो किलोन्सरचा पुत्र बोहोतो किबा याने आपल्या लग्नात चक्क हातात रायफल घेतल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे बोहोतो किबासोबत त्याच्या नववधूनेसुद्धा हातात बंदूक घेतल्याचे समोर आले आहे. ही दृश्ये पाहून … Read more