दुचाकीच्या अपघातात एक ठार

श्रीरामपूर : दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दि. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : श्रीरामपूर – नेवासा रस्त्यावर हॉटेल जय हो समोर, शिरसगाव (ता. श्रीरामपूर) येथे दि. १६ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर जीवघेणा हल्ला

कोपरगाव : शहरातील संजयनगर भागात एका तरुणावर पाच तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. यात सदर तरुणाला गंभीर दुखापत झाली असून पाचजणांविरूद्ध कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी शहरातील संजयनगर भागातील सोमनाथ संपत रोठे (वय २१) हा तरूण दि. ४ नोव्हेंबर … Read more

दारूसाठी पैसे न दिल्याने बीयरच्या बाटलीने सख्ख्या भावाची हत्या,तीन वर्षानंतर असा सापडला आरोपी..

मुंबई : दारूसाठी सख्ख्या मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या भावाला गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पोलिसांनी तीन वर्षांनंतर अटक केली आहे. विजय लक्ष्मण मानुस्करे (२५) असे अटक आरोपीचे नाव असून तो घणसोली, नवी मुंबईत राहत होता.  गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे पोलीस नायक हृदयनारायण मिश्रा यांना एका विश्वसनीय बातमीदाराने खबर दिली की, २०१६ मध्ये सिद्धिविनायक टिटवाळा येथे राहणाऱ्या … Read more

विखे पाटील कुटुंबियाची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई करा

संगमनेर : सोशल मिडीयावरुन आ.राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ.सुजय विखे पाटील यांची बदनामी करणारा मजकूर प्रसारीत करणाऱ्या व्यक्ति विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी विखे समर्थक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस आणि आश्वी येथील पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून विखे यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकणाऱ्याचे मोबाईल नंबर देण्यात आले … Read more

भारतात भय, कटुता, द्वेष, नकारात्मकता यांना स्थान नाही!

नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. आजचा दिवस जुनी कटुता विसरून एकजुटीने वाटचाल करण्याचा दिवस आहे.  नव्या भारतात भय, कटुता, द्वेष, नकारात्मकता यांना स्थान नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला आता राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी घेऊन पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. मोदी म्हणाले की, भारत जगातील सर्वात … Read more

पुरुषाच्या वेशात तिने अल्पवयीन मुलींचे सेक्स टॉय वापरत केले लैंगिक शोषण

विजयवाडा-  अल्पवयीन मुलींना पुरुषाचा वेश बनवून,  मुलींशी मैत्री करून,  मुलींना आमिष दाखवून शरीर संबंध बनवण्यासाठी बळजबरी करून लैगिक शोषण केल्याप्रकारणी ३२ वर्षीय महिलेविरोधात पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक  घटना आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये घडली आहे. अधिक माहिती अशी की,  प्रकाशममध्ये जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. कृष्ण किशोर … Read more

नगर शहरातून २८८ जण हद्दपार, ५७ जण अटी, शर्तीत; उल्लंघन केल्यास कारवाई

अहमदनगर : अयोध्या निकाल, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने नगर प्रांताधिकारी तथा नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तब्बल २८८ जणांना हद्दपार केले आहे.  याचबरोबर ५७ जणांना अटी, शर्ती लादून शहरात वास्तव्याची मुभा दिली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (२) अन्वये श्रीनिवास यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करीत हे … Read more

येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम मतदारसंघ घडवण्यासाठी मी कटिबद्ध – आ. लंके

पारनेर –मतदारसंघातील शेतीचे व्यापक प्रश्न, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम मतदारसंघ घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. मांडवे खुर्द येथे मोठे मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल आमदार लंके यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेेळी ते बोलत होते.  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांची … Read more

बळीराजापुढे दुसरे नवे संकट, कापसाचे भाव ५०० रुपयांनी घसरले

राहुरी – अचानक बाजारभाव ढासळल्याने पावसाने आधीच घायाळ झालेल्या राहुरीच्या शेतकऱ्यांपुढे दुसरे नवे संकट उभे राहिले आहे. उसाला पर्याय म्हणून राहुरी तालुक्यात कपाशीचे क्षेत्र वाढले आहे.  दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे कपाशीच्या पिकाची वाताहत झाली. पहिली वेचणी झालेल्या कपाशीला मागील आठवड्यात ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला होता.  … Read more

राहुरीत ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, मुळा धरणाच्या पाण्यात मारली उडी

राहुरी शहर –राहुरीतील मुळा धरणाच्या पाण्यात अज्ञात ३५ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या तरुणाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मुळा धरणात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेतली. मुळानगरचे माजी सरपंच अंकुश बर्डे यांनी या घटनेची खबर राहुरी पोलिसांना दिली.  … Read more

श्रीगोंद्यात बनावट नोटा प्रकरण, विधानसभा निवडणुकीत नाेटांच्या वापराची शक्यता?

श्रीगोंदे – बनावट नोटाप्रकरणी श्रीगोंदे पोलिसांच्या पथकाने घोगरगाव परिसरातून अतुल रघुनाथ आगरकरला याला  ताब्यात घेतले आले. तो बनावट नोटा देऊन सोने खरेदी करणार होता. यांच्याकडे दोन लाख ८३ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.  त्याचा मास्टरमाईंड श्रीकांत सदाशिव माने याला बारामतीमध्ये ताब्यात घेतले होते. तसेच पोलिसांनी खाक्या दाखवताच यातील अन्य दोन आरोपी यात … Read more

एकही शेतकरी वंचित राहाता कामा नये ! आ. तनपुरेंनी अधिकाऱ्यांना खडसावले

राहुरी – नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करताना अधिकार्यांनी निव्वळ आकडेवारीचा खेळ दाखवु नये. प्रत्यक्ष कृती करुन दाखवा. उघड्या डोळ्याने न बघता शेतकऱ्याच्या शेतात जावुन प्रत्यक्ष पंचनामे करा. नगर तालुक्यातील एकही शेतकरी वंचित ठेवू नका.  काढलेल्या पिकांचेही पंचनामे करा. एकही शेतकरी यापासुन वंचित राहाता काम नये. नगर येथिल शेतकर्यांच्या पिक नुकसान बैठकीत नगर, पाथर्डी, राहुरी मतदार … Read more

भाजप माझे भगवेकरण करण्याच्या प्रयत्नात, पण मी त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही !

चेन्नई : सत्तारूढ भाजप माझे भगवेकरण करण्याचा प्रयत्न  केला जात आहे, असा खळबळजनक आरोप तामिळी सुपरस्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी केला आहे.  भाजपच्या जाळ्यात मी अडकणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.  ज्येष्ठ अभिनेते कमल हसन आणि रजनीकांत यांनी चेन्नई येथे राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या नव्या कार्यालयात दिवंगत दिग्दर्शक के. बालाचंदर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले.  त्यानंतर रजनीकांत म्हणाले की, काही … Read more

भाजप सोडून या 5 पक्षांचा लोकसभा निवडणूक खर्च जाहीर, काँग्रेस- ८२० कोटी, राष्ट्रवादी-..

नवी दिल्ली : चालू वर्षात लोकसभा निवडणूक व त्यासोबत झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने ८२० कोटी रुपये खर्च केले. निवडणुकीदरम्यान जमा केलेल्या ८५६ कोटींहून अधिक निधीतून हा खर्च करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिली आहे. तसेच  राष्ट्रीय राजकीय पक्षांनी सादर केलेल्या अहवालानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने ७२.३० कोटी रुपये, तृणमूल काँग्रेसने ८३.६० कोटी रुपये, … Read more

भाजपा फोडाफोडीचे राजकारण करू शकते!

ठाणे : गोवा, कर्नाटक, मणिपूर या ठिकाणी भाजपाचे कमी आमदार निवडून आले असतानाही आमदारांची तोडफोड करून भाजपाने सरकार स्थापन केले, ही भाजपाची नीती.  त्यामुळे महाराष्ट्रातही आमदारांचा घोडेबाजार होण्याचा धोका नाकारता येत नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेसचे माजी प्रभारी आणि प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी भाजपाच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. भाजपा सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी … Read more

मोदींवर लेख लिहिल्यामुळे पत्रकाराचे ओसीआय कार्ड रद्द झाले?

नवी दिल्ली : लेखक तथा पत्रकार आतिशअली तासीर यांचे ‘ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया’ (ओसीआय) कार्ड भारत सरकारने रद्द केले आहे. ब्रिटनमध्ये जन्मलेले आणि मूळचे पाकिस्तानी असलेले लेखक आतिशअली तासीर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘टाइम’ मॅगेजिनमधील एका लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘डिव्हायडर इन चीफ’ असे म्हटलेले होते. या लेखामुळेच त्यांचे ओसीआयचे कार्ड रद्द करण्यात आलेले असल्याचा … Read more

थोडीशी वाट बघा, राज्यात राम राज्यच येणार – गिरीश महाजन

नाशिक – नाशिकमध्ये अयोध्या निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली. मंदिरात जय श्री रामाचा जयघोष यावेळी करण्यात आला. महाजन याप्रसंगी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज्यात राम राज्यच येणार आहे, थोडा धीर धरा वाट बघा असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे म्हणाले. ते … Read more

न्यायालयाचा निर्णय कोणाचा विजय किंवा पराभव नाही

मुंबई : ‘सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही. तर भारतीय आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे. मुळातच जवळजवळ सर्वानी या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे विधान राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर … Read more