नुकसानग्रस्तांना महिना अखेर पर्यंत भरपाई दिली जाणार – खा. विखे

टाकळी ढोकेश्वर: चालू नोव्हेंबर महिन्याच्या आत पारनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानासह रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन खा. डॉ. सुज़य विखे यांनी शेतकऱ्यांना दिले. अतिवृष्टीने झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी खा. विखे हे पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. खा. विखे यांनी तालुक्यातील भाळवणी, वासुंदे, कर्जुले हर्या येथील अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी केली, या वेळी … Read more

कांद्याच्या दरात हजार रुपयांची घसरण!

लासलगाव : परतीचा पावसाने उघडीप दिल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीत नवीन लाल कांद्याची आवक होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढल्याने मागणी घटली. परिणामी लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या (दि.४) तुलनेत मंगळवारी आणि बुधवारी टप्प्याटप्प्याने दोन दिवसांत प्रति क्विंटलमागे १ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव ५ हजार रुपयांच्या आत … Read more

विमा कंपनीवर शिवसैनिकांचा हल्ला

पुणे : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. अशा प्रकारे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असतानाही विमा कंपन्या बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करीत बुधवारी सकाळी संतप्त शिवसैनिकांनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ‘इफ्को टोकिओ’ कंपनीच्या कार्यालयावर जोरदार हल्ला चढवत कार्यालयाची तोडफोड केली. शेतकऱ्यांना तत्काळ विम्याचा लाभ … Read more

शरद पवारांचे वेट ॲण्ड वॉच

मुंबई : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा वेट ॲण्ड वॉचची भूमिका कायम ठेवल्यामुळे मुंबईतल्या तख्तावर कोण बसणार, याबाबतचा सस्पेंस वाढला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. सोनिया गांधी यांची … Read more

मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार, गोड बातमी सुधीर मुनगंटीवार देणार

मुंबई : भाजपा हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी राज्यपालांची निश्चितच भेट घ्यावी. बहुमतासाठी ते निश्चितच १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र काहीही झाले तरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.  शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, हीच गोड बातमी सुधीर मुनगंटीवार देणार असल्याचेही राऊत … Read more

एकनाथ खडसे म्हणतात लवकरच त्रास देणारांची नावे उघड करणार !

शिर्डी : आपल्यावर अनेक आरोप झाले. त्यात तथ्य आढळले नाही. निर्दोष असूनही अनेकांनी त्रास दिला, तरीही आपण श्रद्धा व सबुरीचे धोरण ठेवले़. लवकरच आपण मला त्रास देणारांची नावे उघड करणार असल्याचा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला़. एकनाथ खडसेयांनी संपूर्ण कुटुंबासह शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर माध्यामांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मी … Read more

शरद पवारांनी भाजप सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील कृषी, वाहन उद्योग, लघुउद्योग आणि बांधकाम क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसला असून देशाच्या विकास दरात (जीडीपी) मोठी घसरण झाली आहे. देशाची बिघडत चाललेली अर्थव्यवस्था सरकार लवकर रुळावर आणावी अन्यथा जनता धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. बुधवारी पवार यांनी पत्रकार परिषद … Read more

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची हकालपट्टी करा

पुणे :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्यांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.  या वेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे शिवाजी खरात, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्ष विभागाचे शिवांकुर खेर, योगेश शेटे, … Read more

अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई, आठ बोटींसह ४० लाखांचा मुद्देमाल नष्ट

श्रीगोंदे :- तालुक्यातील अजनुज, आर्वी, पेडगाव परिसरात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळूउपसा होत असल्याचे दिसताच येथील तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने एकूण ८ बोटी जिलेटीनने उडवून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल बुधवारी नष्ट केला. अजनुज, आर्वी व पेडगाव या नदीकाठच्या गावांत नदीपात्रातून विनापरवाना राजरोस वाळूउपसा होत असल्याचे माहिती तहसीलदार माळी यांना समजताच महसूलचे पथक पोलिस कर्मचाऱ्यांसह नदीपात्रात … Read more

खा. लोखंडेंवर शेतकरी नाराज

राहुरी :- तालुक्यातील टाकळीमियाॅ पंचक्रोशीत सातशे हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असताना शिवारफेरी करण्याऐवजी खासदार सदाशिव लोखंडे, तसेच महसूल व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत बैठक बोलावून निव्वळ देखावा केल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रवि मोरे यांनी केली. परतीच्या पावसामुळे टाकळीमियाॅ व देवळाली मंडलामधील ३२ गावांतील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी … Read more

नगरच्या तरुणांना इस्त्रोची संधी उपलब्ध करणार – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- विविध संशोधनांमुळे तंत्रज्ञानात मोठे बदल घडत आहेत. विज्ञानातील विविध पैलूंची सखोल माहिती तरुण पिढीला होणे आवश्यक आहे. तरुणांना वैज्ञानिक क्षेत्रात गरुडभरारी घेता यावी, यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्र आयोजित करणार असून नगरमधून जास्तीत जास्त तरुण इस्त्रोमध्ये कसे जाऊ शकतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. सावेडीतील प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रात … Read more

नदीपात्रात उडी मारून तरुणाची आत्महत्या

राहुरी :- मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या पाथरे खुर्द येथील गणेश मोतिराम हापसे (३०) या तरूणाने प्रवरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. स्थानिक शेतकऱ्यांनी नदीपात्रात गणेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आत्महत्या केलेल्या नदीपात्राच्या ठिकाणाची खोली २० फुटांच्या पुढे होती. सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्यावर … Read more

पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप !

पारनेर :- पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याची खरमरीत टीका खासदार सुजय विखे यांनी बुधवारी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल … Read more

दोन गटात हाणामारी; १८ जणाविरूध्द गुन्हा दाखल

नगर – सावेडीत दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तिघे जखमी झाले आहेत. लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दगड , विटाने हाणामारी करण्यात आली. याप्रकरणी विरेन मधूकर भिंगारदिवे, आकाश शालूमन जाधव, मधूकर दयानंद भिंगारदिवे, विलास दयानंद भिंगारदिवे, पदमा विलास भिंगारदिवे, कलावती … Read more

शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू

नेवासा – तालुक्यातील लांडेवाडी येथील योगेश अण्णासाहेब दरंदले, वय २७ या शेतकऱ्याचा शेतात काम करताना सर्प दंशाने मृत्यू झाला. त्यांना सोनई, नगर येथे दवाखान्यात केले असता उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, चुलते, चुलती, आजी असा परिवार असून योगेश यांचा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ना. विजय औटी यांच्यासह पदाधिकार्यांच्या शेतीचे जास्त नुकसान झाले नसावे ‘त्या’ वादावर खा.विखे यांचा चिमटा !

पारनेर- ना. विजय औटी यांच्यासह पदाधिकारी यांना बुधवारी माझ्या तालुका दौऱ्यासंदर्भात निरोप दिले असताना ते या दौऱ्यात का सहभागी झाले नाही ते कळाले नाही. यामुळे एकतर त्यांच्या शेतीचे जास्त नुकसान झाले नसावे किंवा त्यांचे पंचनामे राहिले असावेत, असा चिमटा खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तर दुसरीकडे सध्या राजकीय परिस्थिती पाहता यावर … Read more

नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघतात एकाचा मृत्यू

नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या कंटेनर-कार अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. विठ्ठल पांडुरंग कौसे (वय ३२, रा.कावलगाव, ता.पूर्णा, जि. परभणी) हे अपघातात मृत झाले, तर अनिल सखाराम पारसकर (निगडी, ता.मावळ, जि.पुणे) हे जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारसकर व कौसे हे स्वीप्ट कारमधून मंगळवारी नांदेड येथून पुण्याकडे … Read more

आमदार रोहित पवारांच्या विजयी मिरवणुकीमुळे छगन भुजबळ यांच्या स्वीय साहाय्यकास जेलची हवा !

जामखेड :- मतदारसंघात एकीकडे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीवरील उधळपट्टी हा चर्चेचा विषय झाला होता मात्र आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विजयी मिरवणुकीत गालबोटही लागल्याचेही समोर आले आहे. हृदयविकाराचा झटका बसलेल्या आईला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या लेकरास तुरुंगात जावे लागले आहे. रस्ता मोकळा करून देण्याचे सोडून पोलिसांनी रुग्णवाहिकाच अडविण्याचे … Read more