…असा चालायचा शिर्डीतील ‘तो’वेश्या व्यवसाय

शिर्डी :- शिर्डी येथील हॉटेल साईधाममध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सहाजणांसह तीन महिलांवर रविवारी गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० वी शिक्षण घेतलेल्या परप्रांतीय १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला या छाप्यात पकडण्यात आले होते. आरोपींकडून कसून चौकशी केली असता शिर्डीतील ५ ते ६ हॉटेलमध्ये या … Read more

नवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून माता- पित्यांनी ठोकली होती धूम, पुढे झाले…

नवजात जुळ्या मुलींना रुग्णालयात सोडून धूम ठोकणाऱ्या माता-पित्याविरुद्ध अखेर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, या दाम्पत्याचा पत्ता पूर्ण नसल्यामुळे आणि त्यांचा मोबाईल बंद असल्याने शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.  मोहित भिकूलाल भंडारी (रा. रामकृष्ण शाळेजवळ, शिवाजीनगर, सिल्लोड) यांनी आपल्या पत्नीला १९ ऑक्टोबर रोजी सिडको … Read more

पिक विमा कंपन्यांना राजू शेट्टींनी भरला दम, म्हणाले…

सारोळा – परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावल्या गेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने विनाअट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी  पीक विमा कंपन्यांनीही हात न आखडता १०० टक्के विम्याचा लाभ द्यावा अन्यथा धडा शिकवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.  सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे मंगळवारी (दि.५) … Read more

खा. सुजय विखेंच्या ताफ्यातील वाहन दरीत कोसळले

पारनेर : खा. सुजय विखेंच्या ताफ्यातील पोलिसांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना पिंपळगाव-अळकुटी रोडवरील गारखिंडी घाटात बुधवारी दुपारी घडली. या अपघातात चालक पो. कॉ. पोपट मोकाते यांचा पाय मोडला असून त्यांना पुढील उपचारासाठी विळद येथील विखे पाटील रूग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.  तर या अपघातात … Read more

पिकांचे सरसकट पंचनामे करून महिनाभरातच मदत देणार – खा. डॉ. सुज़य विखे

राशीन : कर्जत तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागास भेट देऊन खा. डॉ. सुज़य विखे यांनी पाहणी केली. या वेळी नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना महिनाभरात मदत मिळवून देण्याचे आश्­वासन खा. विखे यांनी दिले. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथून आज सकाळी खा. विखे यांच्या दौऱ्यास प्रारंभ … Read more

पूर्ववैमनस्यातून बिर्याणी हाऊस व त्यालगत असलेले घरही पेटवले

श्रीगोंदा : काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दि.४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील बेलवंडी फाट्यावरील काळे मामा बिर्याणी हाऊस हे हॉटेल व त्यालगत असणारे घर पेटवून दिल्याची घटना घडली.  सदर घटनेबाबत रेखा संजय काळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दत्ता रामदास जाधव रा.(गव्हाणेवाडी) बेलवंडी फाटा, ज्ञानेश्वर शंकर … Read more

जिल्ह्याच्या भूजल पातळीत समाधानकारक वाढ,भूजल सर्वेक्षणचा अहवाल

अहमदनगर : जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १ हजार ६०२ गावांना येत्या ३१ मार्चअखेर टंचाईची झळ बसणार नाही.  या संदर्भात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील पंधराशे सत्तावीस निरीक्षण विहिरींच्या १५ ऑक्टॉबर दरम्यान नोंदी घेण्यात आल्या होत्या.  यासाठी प्रशिक्षित जलसुरक्षक नियुक्त करण्यात आले होते. आता यासंदर्भातील भूजल सर्वेक्षणचा अहवाल प्राप्त … Read more

पीक पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करायचा नसतो

लातूर : येणाऱ्या संकटाला धैर्याने सामोरे जा. आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. उलट आत्महत्येने तुमचे घर पोरके होईल. शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी तुमच्यासोबत उभी आहे. असा दिलासा देतानाच तुमच्या आशीर्वादाने आमचे सरकार सत्तेवर आले तर कसल्याही अटी न लावता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजारांचे अनुदान देण्यात येईल,  अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. … Read more

माझं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

बीड : अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही हे मला ठाऊक आहे. मात्र, माझं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील परभणी फाट्यावर दिली.  दरम्यान, ठाकरे यांच्या प्रतीक्षेत दोन तास कार्यकर्ते व शेतकरी रस्त्यावर ताटकळले होते. उद्धव ठाकरे हे परळी येथे पीक पाहणी करून माजलगावात दाखल झाले. सायंकाळी … Read more

चर्चेसाठी भाजपाचे दरवाजे २४ तास खुले – चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनेसोबत चर्चेसाठी भाजपाचे दरवाजे २४ तास उघडे आहेत. राज्यात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार येणार आहे.  संपूर्ण भाजपा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे … Read more

सत्तास्थापनेवर गडकरी दोन तासांत कोंडी फोडतील!

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १२ दिवस उलटून गेले असले तरी सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती यावरून दोन्ही पक्ष अडून बसले आहेत.  यातच,  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून शिवसेनेमध्ये दाखल झालेले शेतकरी संघटनेचे नेते किशोर तिवारी यांनी या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहिले. या … Read more

पीएमसी खातेदाराला आता ५० हजार रुपये काढता येणार!

मुंबई :  पीएमसी बँकेच्या तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच बँकेची आपल्या खातेधारकांना पैसे देण्याची क्षमता तपासून पैसे काढण्याची मर्यादा ४०,००० रुपयांवरून ५०,००० रुपये करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  आरबीआयने या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पीएमसी बँकेच्या तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच बँकेची आपल्या खातेधारकांना पैसे देण्याची क्षमता तपासून पैसे काढण्याची मर्यादा ४०,००० रुपयांवरून … Read more

दारुड्या पतीकडून पत्नीला लोखंडी पाइपने मारहाण

नगर – दारू पिऊन आलेल्या पतीने घरातील सर्व कपडे जाळून टाकले. कपडे का जाळले, याचा जाब विचारला असता त्याने पत्नीला लोखंडी पाइपने मारहाण केली.  ही घटना जाधव पेट्रोल पंपाजवळील साईराम सोसायटीत घडली. पत्नीच्या फिर्यादीवरून दिगंबर दत्तात्रय सोनवणे याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  सुवर्णा दिगंबर सोनवणे (३२) या भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. … Read more

खा.डॉ.सुजय विखेंकडून ‘त्या’ अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी

पाथर्डी –कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत संसदेच्या अधिवेशनानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक घेऊ, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी केली.  डिसेंबरअखेर काम मार्गी लावा; अन्यथा माझ्या मर्जीतील ठेकेदारांकडून काम पूर्ण करून घ्या, त्याची जबाबदारी मी घेतो, असेही ते म्हणाले. तहसील कार्यालयात सोमवारी महामार्गाचे अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी … Read more

मागील दहा वर्षांत त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सोडवला नाही!

तिसगाव – पाथर्डी तालुक्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी दिली. पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांचा दौरा आमदार तनपुरे करत आहेत. तिसगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती संभाजीराव पालवे होते. तनपुरे यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले.  ग्रामपंचायत कार्यालयासमोर … Read more

नगरकरांचा विश्वास उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारा ठरेल : जगताप

नगर –  मोठ्या मताधिक्याने माझी आमदारपदी पुन्हा एकदा निवड करून, आपण माझ्या विकासकामरुपी प्रयत्नांच्या प्रकाशाला साथ दिली आहे.  मतदानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास, नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.  स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र देऊन आमदार जगताप यांचा सत्कार … Read more

रॉंग साईटने आलेल्या जीपची दुचाकीला धडक, १ ठार

श्रीरामपूर – भरधाव वेगातील महिंद्रा मॅक्स जीप चालकाने रॉंग साईटने जीप चालवून दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील  तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना श्रीरामपूर – निमगाव खैरी रस्त्यावर भैरवनाथनगर शिवारात फौजी हॉटेल समोर घडली. भरधाव वेगातील महिंद्रा मॅक्स जीप नं. एमएच २३ – ४७५८ हिच्यावरील चालक आरोपीने हयगय व अविचाराने रॉंग साईटने जीप चालवून समोरुन येत असलेली हॉडा … Read more

सरपण गोळा करत असताना, अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून फरपटत नेऊन बलात्कार

संगमनेर – सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला फरपटत आडोशाला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने संभोग करुन बलात्कार केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर खंडोबा डोंगराच्या गडदीच्या लवणात घडली.  कळालेल्या माहितीनुसार, या भागात जवळे बाळेश्वर परिसरात राहणारी एक १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या मुकी व बहिरी असलेल्या नातेवाईक महिलेबरोबर सरपण गोळा करण्यासाठी गेली … Read more