दोन अल्पवयीन दुचाकी चोरांना पकडले

राहाता : तालुक्यातील शिंगवे येथे मोटारसायकल चोरी करताना राहात्याच्या दोन अल्पवयीन मुलांना नागरीकांनी पकडले. एक जण गाडी घेऊन पसार झाला. याप्रकरणी राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंगवे येथील शेतकरी संभांजी रंगनाथ नरोडे हे रूई रोडवरील आपल्या शेताजवळील रस्त्यावर मोटारसायकल लावून शेतात गवत कापत होते. यावेळी तिघे अल्पवयीन मुले त्याठिकाणी एका मोटारसायकलवर आले.  मोटारसायकलला … Read more

‘तुला काही कमी पडू देणार नाही’ असे म्हणत महिलेचा विनयभंग

कोपरगाव : ‘विहिरीतील चोरीस गेलेली मोटर तुला देतो. तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव. तसेच तुला काही कमी पडू देणार नाही’  असे म्हणत संतोष तुळशीराम वायसे (रा. सोनेवाडी, ता.कोपरगाव) या व्यक्तीने एका महिलेचा वेळोवेळी पाठलाग करून विनयभंग केला.  दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सदर महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या … Read more

कांदा सडला..आणि शेतकरी रडला,कांदा उत्पादकांनी पावसापुढे टेकले हात!

संगमनेर : कांदा सडल्याने संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेतकरी सध्या रडकुंडीला आले आहेत. डोळयादेखत हातातोंडाशी आलेल्या सेंद्री लाल कांद्याचे पीक परतीच्या पावसामुळे शेतामध्ये पूर्णपणे सडून गेले आहे.  त्यामुळे आता आम्ही शेतकऱ्यांनी कस जगायचं? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.संगमनेर तालुक्याच्या पठार भागाकडे नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पाहिले जात आहे. वर्षानुवर्षांपासून येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेती … Read more

पारनेर तालुक्यातील जनतेसाठी जनता दरबार घेण्याचा संकल्प – आ. निलेश लंके

पारनेर : अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांवर बोट न ठेवता सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी आ. नीलेश लंके यांनी केली आहे.  शासनमान्य दुकाने, शिधापत्रिका व इतर सोयीसुविधांविषयी माहिती घेत सर्वसामान्य लोकांचे हेलपाटे कमी करावेत, अशीही मागणी … Read more

रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघास सक्षम आमदार लाभला

जामखेड : अनेक वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या २० वर्षीपासून एक निष्ठेने काम केले. देशात व राज्यात पुरोगामी आघाडी सरकारची सत्ता होती आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पक्षाचे होते. २५ वर्षे सतत सत्तेच्या विरोधातील आमदार असायाचा त्यामुळे या मतदारसंघातील कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे व सुविधा उपलब्ध झाल्या … Read more

एकही शेतकरी वंचित राहणार नाही – खा. डॉ. सुजय विखे

शेवगाव :- अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान १०० टक्के असून, शेतीचे पंचनामे करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आकडेवारीचा खेळ न करता सरसकट पंचनामे करून शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, या जाणिवेतून काम करावे, अशा सूचना खा. डॉ. सुजय विखे यांनी दिल्या. खा. विखे यांनी आज मुंगी, हातगाव व गदेवाडी या गावांत समक्ष भेटी देऊन शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे … Read more

अहमदनगर बाजारभाव : अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका

नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्याच्या अनेक भागांत अद्यापही पाऊस कमी, अधिक प्रमाणात सुरूच आहे. या बदललेल्या वातावरणाचा भाज्यांवर विपरीत परिणाम झाला आहे.  बाहेर गावाहून नगर बाजार समितीत येणाऱ्या ५० ते ७० टक्के भाज्या पावसामुळे कुजल्या आहेत. परिणामी हाती उरलेला थोडाफार माल प्रचंड चढ्या भावाने विकला जात आहे. स्वाती नक्षत्राच्या सरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत बरसल्या. २४ … Read more

‘ते’ लोक आता राहणार सरकारी नोकरीपासून वंचित !

आसाममधील वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना १ जानेवारी २०२१ नंतर सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं जाणार नाही.  सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आसामच्या जनसंपर्क विभागाने या निर्णयासंबंधी माहिती दिली आहे.  छोटे कुटुंब पद्धतीनुसार १ जानेवारी २०२१ … Read more

या राज्यात महिलांसाठी मोफत बससेवा !

दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतुकीत महिलांना मोफत प्रवासाची योजना ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना लागू करण्याचा विचार सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांनाही लाभ देण्याचा विचार दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतुकीत महिलांना मोफत प्रवासाची योजना ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना लागू करण्याचा विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सूचित केले.  दिल्लीत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या … Read more

किरकोळ कारणावरुन मारहाण,परस्परविरोधी गुन्हे दाखल

अहमदनगर : नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे किरकोळ कारणावरुन मारहाण झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.  सत्तार पिरमोहमंद शेख (वय ५२, रा.नागरदेवळे) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सलमान हुसेन पठाण, मासूम हुसेन पठाण, शोएब चॉंद शेख, सोहेल चॉंद शेख, साहिम चॉंद शेख, कलिम शकरुद्दीन शेख, … Read more

जावयामुळे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना घ्यावा लागला हा निर्णय !

वॉशिंग्टन : ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक व पत्रकार जमाल खशोग्गी यांना हत्येपूर्वी अटक करण्यास अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जारेड कुश्नर यांनी सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांना परवानगी दिली. त्यामुळे ट्रम्प यांना उत्तर सीरियातून सैन्यवापसी करावी लागल्याचे धक्कादायक सत्य सोमवारी उजेडात आले आहे. याचवेळी कुश्नर आणि सलमान यांच्यातील संभाषणात व्यत्यय आणत तुर्कीने ट्रम्प यांना … Read more

आता पेट्रोलची चिंता सोडा, एकदा चार्ज केल्यावर ही कार ९०० किमी चालेल !

लंडन : जगभरात इले्ट्रिरक कारवर नवनवीन संशोधने केली जात असताना ब्रिटनच्या के्ब्रिरज विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एक अनोखी इले्ट्रिरक कार विकसित केली आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर ही कार तब्बल ९०० किमीचा पल्ला गाठू शकते. ताशी १२० किमी वेगाने चालू शकणाऱ्या या कारला ‘हेलिया’ असे नाव देण्यात आले आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कारची रेंज ही टेस्लाच्या कारपेक्षा … Read more

चाकुचा धाक दाखवून कार पळवली !

श्रीरामपूर : गाडी बंद पडली म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गाडीचालकास चाकू लावून त्याच्याकडील रोकड व मोबाईलसह गाडी पळवून नेण्याचा प्रकार काल रात्री ७ वाजता वडाळा महादेवजवळ घडला. हिंद सेवा मंडळाचे मानस सचिव संजय जोशी यांच्या क्रिएटा गाडीत त्यांच्या पत्नी, मेहुणे व ड्रायव्हरसह औरंगाबादहून श्रीरामपूरकडे येत होते. सायंकाळी ७ वाजता वडाळ्याजवळ त्यांच्या गाडीचा टायर फुटला.  त्यामुळे … Read more

नगर-मनमाड राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करा – आ. प्राजक्त तनपुरे

राहुरी : नगर-मनमाड राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग (एमएच १६०) म्हणून केंद्र सरकारने २२ मार्च २०१३ मध्ये राजपत्रात घोषीत केल्यानंतर आजअखेर ह्या रस्त्याचे रुपांतर करण्यात आले नाही. सदर राज्य मार्गाचे लवकरच राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.  आमदार तनपुरे पुढे म्हटले आहे की, नगर-मनमाड राज्य मार्ग … Read more

राहुरीत ढगफुटीसदृश पाऊस,ओढ्या-नाल्यांना पूर; पाच गावांचा संपर्क तुटला !

राहुरी :- तालुक्­याच्या पश्चिमेकडील दुर्गम, डोंगराळ म्हैसगाव, शेरी, चिकलठाण आदी परिसरात काल सकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल साडेचार तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना मोठ्याप्रमाणात पूर आला होता.  मुळा धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रातील विसर्ग वाढविण्यात आला. ह्या पावसाने परिसरातील बंधारे तुडुंब भरलेले होते ते बंधारे फुटले. उभ्या पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. रस्त्यांना नदीचे … Read more

संजय राऊत म्हणाले, ‘लक्ष्य तक पहुँचनेसे पहले सफर में मजा आता है’

मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्यावरून आणि मुख्यत: मुख्यमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात सध्या जबरदस्त ओढाताण सुरू आहे. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर अडून बसल्याने सत्तास्थापनेचे गणित काही जुळताना दिसत नाही.  या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आपले एक ताजे छायाचित्र आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करून त्याखाली ‘लक्ष्य तक पहुँचनेसे … Read more

शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून माणुसकीला काळीमा फासणारे वर्तन,तीन रुग्णांना फेकले रस्त्यावर !

सांगली :- मिरजेच्या शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासणारे वर्तन केले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तीन रुग्णांना कर्मचाऱ्यांनी डिस्चार्ज देतोय म्हणून सांगलीत रेल्वे स्टेशन परिसरातील जुना कुपवाड रोड, सुंदर पार्क येथील निर्जन रस्त्यावर रात्री आणून फेकले.  यातील एकाचा मृत्यू झाला आहे. शिवलिंग कुचणुरे (रा. गणेशवाडी ता. शिरोळ) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. हे … Read more

पाकिस्तानी लोक प्रियंका व राहुल गांधी यांना आपले रोल मॉडल मानतात

बलिया : काँग्रेसची विचारधारा ही देशाला कमकुवत करणारी व पाकधार्जिणी असून, पाकिस्तानी लोक प्रियंका व राहुल गांधी यांना आपले रोल मॉडल मानतात, अशी टीका उत्तर प्रदेशचे ग्रामविकास राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी केली आहे. बलिया जिल्ह्यातील राजा गाव खरौनीमध्ये रविवारी आयोजित एका कार्यक्रमात इतर पत्रकारांशी बोलताना भाजप मंत्री शुक्ला यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला.  काँग्रेस तुकडे-तुकडे … Read more