मी आमदार असलो तरी साहेब नको, दादाच म्हणा : आ.प्राजक्त तनपुरे

पाथर्डी : मी जरी आमदार झालो असलो तरी माझं वय तरुणांच्या बरोबरीच आहे,त्यामुळे कार्यकत्यांर्सह हितचिंतकांनी मला साहेब न म्हणता बंधुत्वाच्या नात्याने दादाच म्हणावे, असे आवाहन राहुरी- नगर- पाथर्डीचे नवनिर्वाचित आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पाथर्डी तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला ज़ाईल, असेही आ. तनपुरे या वेळी … Read more

शेतीचे सरसकट पंचनामे करा : माजी आ.राहुल जगताप

श्रीगोंदा : सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी काल आमदार राहुल जगताप यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी द्राक्ष बागांसाह कांदा, बाजरी, मका तसेच कपाशींच्या पिकांची पाहणी केली. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी.आ.राहुल जगताप यांनी राज्य तसेच केंद्र सरकार मार्फत नुकसानग्रस्तांना भरपाई मिळून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण … Read more

शेतकरी राजा अतिवृष्टीमुळे हतबल

अहमदनगर: निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. शेतीवर सतत येणाऱ्या संकटांमुळे सर्वसामान्य शेतकरी पुरता हतबला झाला आहे. यावर्षी पाथर्डी तालुक्यातील चितळी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे आदी गावांना परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. सततच्या पावासामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more

ब्रेकिंग : शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

शिर्डी :- शिर्डीत पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. धक्कादायक म्हणजे, अनैतिक कृत्यासाठी लफडेखोरांना खोल्या दिल्या जातात. एक – दोन तासासाठी २ ते ५ हजार घेतले जातात. शिर्डीत काही हॉटेल, लॉजमधून वेश्या व्यवसाय चालतो तसेच असे प्रकार नेहमी घडतात. मात्र जे उघड होतात ते समोर येतात.अशाच एका प्रकारात काल डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त … Read more

ओला दुष्काळ जाहीर करा

अकोले :- तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील शेती उध्द्वस्त झाली असून हातातोंडाशी आलेली पिके सडून चालली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करून तातडीने पंचनामे करून शेतक ऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी,अशी मागणी अकोले तालुका काँग्रेस पार्टीच्यावतीने कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी यांनी केली आहे. प्रशासनाला दिलेल्या … Read more

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे – खासदार लोखंडे

श्रीरामपूर : तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे व यासंबंधीचा आढावा घेण्यासाठी काल खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय कृषी अधिकारी कातोरे, प्रांताधिकारी पवार यांच्यासह तहसीलदार उपस्थित होते. बैठकीला सर्व मंडलाधिकारी देखील उपस्थित होते. तालुक्यात परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे … Read more

पीक विमा योजनेत पेरू च्या समावेशासाठी प्रयत्न

राहाता : हवामानावर आधारित पीक विमा योजनेत पेरू फळाचा समावेश होण्यासाठी कृषी आयुक्तांशी बोलून निर्णय करण्यास सांगू, अशी ग्वाही ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पेरू उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. राहाता तालुका राज्यात पेरू पिकाचे आगार मानले जाते. मागील काही वर्षात पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे पेरूच्या बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. तालुक्यातील पेरूच्या शेतीचे अर्थकारणही मोठ्या … Read more

सरसकट पिकांचे पंचनामे करणे गरजेचे – विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार

राहुरी :- अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाला नुकसानभरपाई देण्यासाठी भाग पाडू, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.  रविवारी त्यांनी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी व विविध ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आमदार प्राजक्त तनपुरे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार एफ. ए. शेख, … Read more

पोहायला शिकत असताना २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

रामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील टेलटँकमध्ये पोहायला शिकत असताना २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान घडली. याबाबत माहिती अशी, गुजरवाडी रस्ता म्हसोबा मंदिर परिसरात रहात असलेले संदीप बच्चूभाऊ चितळकर यांच्याकडे गडी म्हणून काम करीत असलेला योगेश बारसे (वय २२, रा. अंदरसूल, … Read more

शेतीच्या वादातून महिलेसह मुलास मारहाण करून विष पाजण्याचा प्रयत्न

अमरावती : शेतीच्या वादातून वहिनीला मारहाण करून विष पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आईला वाचवायला गेलेल्या १३ वर्षीय मुलाला काका-काकूने विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमगाव येथे २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी २ नोव्हेंबर … Read more

कोथिंबीरीच्या एका जुडीला कोंबडीच्या दरापेक्षा जास्त भाव !

नाशिक ;- बाजार समितीत कोथिंबीरीला तब्बल २८ हजार रुपये शेकडा दर मिळाला. एरवी कोथिंबीर दर न मिळाल्यामुळे रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते; पण आज मात्र याच कोथिंबीरीला कोंबडीचा दर मिळाला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे झोडपणे सुरूच आहे. लाखो हेक्टरवरील पिकांना त्याचा फटका बसला असून, दिवसागणिक त्यात भर पडत असल्याने शेतकरी हबकला आहे. पावसामुळे … Read more

पतीच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या महिलेवर दिराने केला चाकूचा धाक दाखवत अत्याचार

अमरावती : पतीच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या एका महिलेवर दिराने चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. त्यासाठी नराधम दिराला सासूनेही मदत केली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ नोव्हंेबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी दिरासह सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी पीडित ४१ वर्षीय महिलेच्या पतीचे ५ एप्रिल २०१९ … Read more

मित्रानेच केली मित्राची हत्या, दोन तासांत आरोपींना अटक !

यवतमाळ : वणी-चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ २ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास मारेगाव शहरातील बेपत्ता असलेल्या योगेश गहुकार या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या हत्येप्रकरणी विविध चर्चेला उधान आले होते.पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच आरोपींना अटक केली.मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. राजू रामकृष्ण भोंगळे रा. मारेगाव, सुशांत … Read more

प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होऊन विवाहितेचा मृत्यू

जळगाव : गर्भवती महिलेची शनिवारी प्रसूती होऊन नवजात बालिकेस जन्म दिला. त्यानंतर प्रकृती गंभीर होऊन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विवाहितेचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. योगिता किसन गाडे (२२) शिवाजीनगर हमालवाडा जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. गर्भवती विवाहितेस प्रसूतीसाठी तीन दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी उपचाराचे बिल घेत रूग्णालयात … Read more

उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू – खा. डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर : नगर शहरातील उड्डाणपूल हा महत्त्वाचा विषय आहे. येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लष्कर हद्दीतील जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. ९० टक्के जमीन संपादित असेल, तर कार्यारंभ आदेश देता येतात. त्यानुसार उड्डाणपुलासाठी येत्या आठ ते दहा दिवसात आणखी जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले, की उड्डाणपुलाच्या कार्यारंभ आदेश जारी केले जातील. उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू … Read more

नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

अहमदनगर :- नगरकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंग्यूसह हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून शासकीय रुग्णालयांतही गर्दी वाढली आहे.  पाणी साचलेल्या ठिकाणी डासाच्या अळ्यांची निर्मिती जोमात सुरू आहे. आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात महापालिका हद्दीत डेंग्यूचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा … Read more

उद्धव ठाकरेंमुळे भाजपचं टेंशन वाढणार !

मुंबई :- धमक असेल तर भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचं ते बघू. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आज 145 पेक्षा जास्त आमदारांची यादी आहे असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊत यांच्या या दाव्यामुळे भाजपचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही जास्तिचं काहीही मागत नाही. जे आमच्या … Read more

सावधान! राज्यातील या भागात मेघगर्जनेसह पाऊस होणार ! अतिवृष्टीचा इशारा …

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ‘महा’ चक्रीवादळादरम्यान समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व … Read more