पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची रामावर आली वेळ !

कर्जत :- दहा वर्षे कर्जत-जामखेडची आमदारकी, पाच वर्षे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद, सहा खात्यांचा कारभार असे भाग्य लाभलेल्या मंत्री राम शिंदे यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, मंत्रिपदाचे वलय प्राप्त झाल्यानंतर कमी झालेला जनसंपर्क आणि ठरावीक लोकांनाच जवळ करण्याची प्रवृत्ती आड आली. पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्न भंग होऊन वनवासात जाण्याची वेळ रामावर आली. जनतेच्या प्रश्नांकडे … Read more

हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका !

कर्जत :- जामखेड विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पराभव केला. गेल्या २५ वर्षपासूनचा भाजपचा बाल्लेकिल्ला ढासळा आहे त्यामुळे पराभवाची कारणमीमांसा शोधू, अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट शिंदे यांनी केली आहे. “हताश होऊ नका, मी खचलो नाही तुम्हीही खचू नका, नव्या जोमाने कामाला लागू, अनेक पराभव मी पाहिले, पचवले आहेत. … Read more

जनतेच्या हितासाठी सत्ता राबविणार- आमदार शंकरराव गडाख

सोनई : विरोधकांनी सत्तेच्या माध्यमातून राजकीय सुडबुद्धीने दिलेला त्रास मी विसरलो आहे. आपली राजकीय ताकद विरोधकांची जिरविण्यासाठी अजिबात खर्ची घालणार नसून जनतेच्या हितासाठी राबविणार असल्याचा दृढ संकल्प नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला. विजयी घोषित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडाख यांनी वरील भावना व्यक्त केली. विजयानंतर त्यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद … Read more

रोहित पवार यांच्या रुपाने राष्ट्रवादीला मिळाले नवे नेतृत्व !

अहमदनगर :-  राष्ट्रवादी काँग्रेसने दुपटीहून अधिक जागा पटकावत जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध केले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी यंदाच्या नगर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते.  मागील निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या श्रीगोंद्याच्या बबनराव पाचपुतेंना पराभूत करून पवारांनी जसा करिष्मा दाखवला होता, तसाच या वेळी अकोल्यात पिचडांना पराभूत करून दाखवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात … Read more

अण्णांनी दिला आमदार लंकेना विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला

पारनेर :- सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांना दिला. राज्यातील निकाल पाहता मतदार जागा झाल्याचे दिसून आले. हे निकोप व सदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे हजारे यांनी यावेळी सांगितले. विजय संपादन केल्यानंतर लंके यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशीर्वाद घेतले. हजारे यांनी त्यांचे … Read more

दारूड्या नातवाकडून आजी-आजोबांना मारहाण

करंजी :- दारूड्या नातवाकडून होणाऱ्या मारहाणीला आजी व आजोबा वैतागले आहेत. मात्र, पोलिस या नातवावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. दारू पिऊन घरी येणाऱ्या नातवाकडून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने या जाचाला वैतागलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आजीबाई, रखमाबाई रंगनाथ अकोलकर यांनी थेट पाथर्डी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी नातू मालू रामदास अकोलकर … Read more

कोल्हेंनी केलेली कामे निवडून येण्यासाठी पुष्कळ होती, परंतु जनतेने त्यांना नाकारले…

कोपरगाव :- राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय व युतीच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव अनेकांसाठी अनपेक्षित होता. कोल्हेंशिवाय अन्य उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशीच धारणा राजकीय वर्तुळात झाली होती, परंतु जनमानसात कोल्हेंबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा घेत आशुतोष यांनी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयामागे अनेक शिलेदार आहेत. छुपे मतदानही काळेंच्या पारड्यात पडले. मागच्या पराभवाचा वचपा काढत … Read more

विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला -प्रा.माणिक विधाते

अहमदनगर :- मागील पाच वर्षाचे विकासात्मक कार्य पाहून जनतेने संग्राम जगताप यांच्याबाजूने कौल दिला आहे. विकास विरुध्द निष्क्रीय माजी आमदारामध्ये ही लढत होती. यामध्ये विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला असल्याची भावना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकितील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसर्‍यांदा विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल व … Read more

रोहित पवारांच्या विजयात बारामती ॲग्रोच्या टीमचा सिंहाचा वाटा !

कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पवार घरातील तिसऱ्या पिढीचे रोहित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना थेट आव्हान देत या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष खेचले होते. युतीच्या मंत्रिमंडळातील बडे प्रस्थ व मुख्यमंर्त्यांच्या अत्यंत जवळचे मंत्री म्हणून ना. शिंदे ओळखले जात होते. मात्र, रोहित पवार यांनी गेल्या एक वर्षापासून अत्यंत शिस्तबद्ध व … Read more

पराजय झटकून किरण काळे लागले कामाला

कालच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. असे असले तरी काळे यांनी आजच महानगरपालिकेमध्ये दाखल होत सुरू केलेल्या कामामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. निवडणुकीमध्ये काळे यांनी जाहीर केलेला वचननामा आणि जाहीरनामा हा चांगलाच गाजला होता. काळे हे वंचित बहुजन आघाडचे उमेदवार होते.  अल्पावधीत त्यांनी आपला प्रचार केला होता. परंतु … Read more

राम शिंदे यांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ !

कर्जत: कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी अत्यंत रोमहर्षक व ऐतिहासिक विजय मिळवत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला. गेली पंचवीस वर्षे येथे असलेली भाजपाची सत्ता संपुष्टात आणत पवारांनी नवीन पर्वाला सुरुवात केली. कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे रोहित पवार यांनी … Read more

भाजपाचा बुरुज उद्ध्वस्त करण्यात पवारांना यश !

कर्जत – जामखेडच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपाचे विद्यमान आमदार तथा मंत्री ना.शिंदे विरुद्ध पवारांचे नातू रोहित पवार यांच्यात लढत होती. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. रथी-महारथींच्या सभा कर्जत-जामखेडला गाजल्या. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. रोहित पवारांनी तब्बल ४३ हजार ३४७ इतक्या मताधिक्क्यांनी ना.शिंदेंना पराभवाची धूळ चारली. ना.शिंदे यांना ९२ … Read more

पारनेर मध्ये गुरुला शिष्याने हरविले !

पारनेरला शिवसेनेचे विजय औटी यांच्यासमोर त्यांच्याच पक्षात एकेकाळी असलेले व त्यांचे शिष्य मानले जात असलेले निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून औटींसमोर मोठे आव्हान उभे केले होते. लंके यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांपैकी काहींनी स्वीकारले व काहींनी विरोधात भूमिका घेतली. पण पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांची साथ मिळाल्याने त्यांना आणखी ताकद मिळाली. विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले असले तरी औटी … Read more

भाजप – शिवसेनेचे गर्वहरण, अहमदनगर जिल्ह्यात आघाडीची हवा !

अहमदनगर – जिल्ह्यात भाजपचे हेवीवेट मंत्री समजले जाणारे राम शिंदे यांच्या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. शरद पवाराचे यांचे नातू रोहित पवार यांची जोरदार ‘ एन्ट्री’ झाली आहे.  राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वगळता उर्वरित सर्वच उमेदवार ‘गॅस’ वर राहिले. विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना चौकार ठोकण्यात सपशेल अपयश आले.  येथे राष्ट्रवादीचे नीलेश लंके हे जायंट … Read more

आई – वडिलांच्या पराभवांचा वचपा काढला, राहुरीत प्राजक्त पर्वाला सुरुवात…

राहुरी  – नगर जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल राहुरी मतदार संघात लागला असून २५ वर्षापासून आमदारकी भूषविणारे भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचा सुमारे २२ हजार हुन अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला आहे. या ठिकाणी राहुरीचे नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे युवा उमेदवार प्राजक्त दादा तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचे वडील … Read more

जिल्ह्यातून शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात !

अहमदनगर –  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा दारून पराभव झाला आहे. नगरमधून अनिल राठोड, पारनेर – नगर मतदारसंघातून विजय औटी, श्रीरामपूर मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे व संगमनेर मतदारसंघातून साहेबराव नवले पराभूत झाले आहेत. या जिल्ह्यात भाजपने ८ तर शिवसेनेने ४ जागा लढविल्या होत्या. सेनेच्या चारही जागा पराभूत झाल्या आहेत. विधानसभेचे उपसभापती … Read more

शिंदे शाहीला सुरुंग, रोहित पर्वाची पावरफुल ‘एन्ट्री’!

अहमदनगर – जिल्ह्यात जोरदार मुसंडी घेत दोन्ही काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. भाजप – शिवसेनेला चारीमुंड्या चीत करत दोन्ही काँग्रेसने आपापले ‘गड’ पुन्हा। काबीज केले. जिल्ह्यात भाजपचे हेवीवेट मंत्री समजले जाणारे राम शिंदे यांच्या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. शरद पवाराचे यांचे नातू रोहित पवार यांची जोरदार ‘ एन्ट्री’ झाली आहे.  १२ – ० चा नारा … Read more

शिंदेच्या घरी गेल्यावर रोहित पवारांनी केली राम शिंदेच्या आईला ही मागणी !

रोहित पवार यांचं गेल्या वर्षभरातील वागणं पाहिलं तर त्यांच्यात एखादा मुरब्बी राजकरणी दडलेला आहे असे नेहमी जाणवते . त्यांच्या भाषणात वागण्यात बोलण्यात संयमीपण असतो , शरद पवारांची तिसरी पिढी राजकरणात सक्रिय झाली आहे. रोहित पवारांच्या रूपाने या घराण्याला एक नवे युवा नेतृत्व लाभले आहे असे  जाणवते.  याचा प्रत्यय आज कर्जत जामखेडकरांना आणि अख्या महाराष्ट्राला आला. … Read more