या ठिकाणी होणार अहमदनगर जिल्ह्यातील मतमोजणी…

अहमदनगर ;- मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  विधानसभा निवडणुकी साठीची मतमोजणी प्रक्रिया ही त्या-त्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्याची सर्व तयारीही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे. त्याठिकाणी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली आहे. विशेषता तेथील सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असणार आहे. तेथील … Read more

२४० महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून सेक्स स्लेव्ह बनवत ब्लॅकमेल !

ब्राझील :- एक दोन नव्हे तर तब्बल २४० महिलांचं लैंगिक शोषण केलेल्या नराधमाला दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये मध्ये अटक करण्यात आली आहे. ह्या आरोपीने या सर्व महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांना सेक्स स्लेव्ह बनवत त्यांना ब्लॅकमेल केलं. तसेच आरोपीने अज्ञात व्यक्तींसोबत या महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. इतकेच नाही तर तो या महिलांना प्राण्यांसोबतही … Read more

निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढणाऱ्या उमेदवारावर गुन्हा !

रत्नागिरी : निवडणुकांच्या निकाल जाहीर होण्या आधीच विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय कदम हे खेड दापोलीचे उमेदवार आहेत. संजय कदम यांच्यासह पत्नी सायली कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेचे मतदान पार … Read more

रेशनिंगच्या काळ्याबाजाराचा भांडाफोड

अहमदनगर – शहराच्या तांगे गल्ली येथील स्वस्त धान्य दुकानातील रेशनिंगचा माल इतर गोण्यात पॅकिंग करुन विक्रीसाठी टेम्पोमध्ये भरला जात असताना जन आधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन रेशनिंग मालाच्या काळ्याबाजाराचा भांडाफोड केला. रेशन दुकान मालकांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला असता पोटे यांनी यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारींसह जिल्हा पुरवठा विभागाला कळविले. पुरवठा विभागाच्या अधिकारी … Read more

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चार नगरसेवकांचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर ;- महानगर पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा सभागृहाचा दोन वर्षापुर्वी ठराव झालेला असताना पुतळा तातडीने बसविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार वाकळे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह 11 शिवप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात आली. सदर पुतळ्याचे काम प्रगतीपथावर न आल्यास 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा … Read more

मोदींच्या मंत्रिमंडळात होणार बदल

नवी दिल्ली :- संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची शक्यता आहे. या नव्या मंत्र्यांमध्ये मित्रपक्षांच्या मंत्र्यांचा मोठ्या संख्येने समावेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या वर्षी 30 मे रोजी … Read more

नशीब हे बलात्कारासारखं असतं म्हणणाऱ्या खासदाराची पत्नी वादाच्या भोवऱ्यात

तिरुअनंतपुरम : नशीब हे बलात्कारासारखं असतं, तुम्हाला ते सहन करता येत नसेल, तर आनंद लुटा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे केरळातील खासदाराची पत्नी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काँग्रेस खासदार हिबी ईडन यांची पत्नी अॅना यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली होती. अॅना लिंडा इडन यांनी मंगळवारी सकाळी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. सोबत आपले … Read more

बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने वडिलांची आत्महत्या, जमावाकडून पोलिसांना मारहाण

मुंबई –कुर्ल्यातून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. यात पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले. काही दिवसांपासून पंचाराम रिठाडिया यांची मुलगी बेपत्ता झाली आहे.  मुलीचा शोध लागत नसल्याने रिठाडिया यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी त्यांच्या अंत्ययात्रेदरम्यान संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाची स्थिती … Read more

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या क्लासचालकाची धुलाई

पुणे –शिकवणीसाठी येणाऱ्या नववीच्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या खासगी क्लासेसच्या चालकाला मुलीच्या पालकांनी बेदम चाेप दिल्याची घटना पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात सोमवारी घडली.  याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी संबंधित चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. जयप्रकाश पाटील (३४, मु. रा. लातूर) असे आरोपीचे नाव आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख नीलेश गिरमे यांनी याप्रकरणी पाेलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली … Read more

कांदा दरात एक हजार रुपयांची वाढ

लासलगाव – लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग दोन दिवसांच्या सुटीनंतर झालेल्या कांदा लिलावात कांद्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली.  शनिवारी २५०० रुपये सरासरी असलेला कांदा मंगळवारी ३५७० रुपये दराने विक्री झाला. मंगळवारी कांदा दरात तब्बल एक हजार रुपयांनी वाढ झाली.

अजित पवारांना मिळाल्याने ‘या’ उमेदवाराची मारहाण करत धिंड काढली

बारामती –राष्ट्रवादी काँग्रेससोबत गुप्तपणे हातमिळवणी करून अजित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याच्या रागातून बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बसपचे उमेदवार अशोक माने यांची मारहाण करत बारामतीत धिंड काढली. बारामतीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आमराई भागातून सर्वांगाला काळे फासून अर्धनग्न धिंड काढून कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनाही शिव्यांची लाखोली वाहत मारहाण केली.  काही अंतर धिंड … Read more

राज्यातील ‘या’ भागात 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता!

पुणे-अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र (ट्रफ) यांची तीव्रता टिकून असल्याने राज्यात आगामी तीन ते चार दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याचे संकेत आयएमडीने दिले आहेत.  त्यामुळे पश्चिम-मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीनंतर पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर परिसरात आणि कोकणात … Read more

श्रीगोंदे तालुक्यात मुसळधार पाउस, नद्यांना पूर, शेतकरी खुश

श्रीगोंदे – परतीच्या पावसाने श्रीगोंदे तालुक्यात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कोळगाव, पारगाव, घारगाव, येळपणे, येथील नद्यांना पूर आला. दुथड्या भरून वाहणाऱ्या नद्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. २-३ तास चाललेल्या पावसाने गावातील मुख्य रस्त्यांवर दोन ते अडीच फुटांपर्यंत … Read more

इव्हीएममध्ये घोळ असल्याची गडाख समर्थकांची तक्रार

कुकाणे :- नेवासे बुद्रूक व साईनाथनगर येथे मतदान यंत्रात घोळ झाल्याची तक्रार गडाख समर्थकांनी केली आहे. मतदान यंत्रातील सात नंबरचे बटण दाबल्यावर एक नंबरचा दिवा लागत असल्याचे मतदारांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार घेतली नाही, असे बाळासाहेब कोकणे यांनी सांगितले, तर याबाबत तक्रार दिली नसल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी सातपासून मतदान केंद्रांवर … Read more

अहमदनगर मध्ये अवघ्या ७.५० लाखांमध्ये फ्लॅट !

केडगाव :- परवडणाऱ्या दरात सर्व सुखसोयींनी सुसज्ज हक्काचे घर असावे असे मनोमन वाटणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करणारा १ बीएचके फ्लॅटचा स्वप्नपूर्ती हा अतिभव्य गृहप्रकल्प केडगाव-कल्याण लिंकरोडवर साकारला जात आहे. स्वप्नपूर्ती साकारणारे ‘शुभवास्तू रियल्टी’ फर्म क्रेडाई अहमदनगरचे सदस्य आहे. या आठ बिल्डिंगच्या गृहप्रकल्पातील चार बिल्डिंगमधील फ्लॅटचे बुकिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित चार बिल्डिंगमधील फ्लॅटसाठी गुरुवार, २४ ते २८ … Read more

प्रतिभा पाचपुतेंसह चार महिलांविरोधात गुन्हा

श्रीगोंदे | काष्टी येथील मतदान केंद्र २८० मध्ये बळजबरीने घुसून मतदान कंट्रोल मशीनची पूजा करून त्याचा फोटो काढल्याची तक्रार केंद्राध्यक्ष सीताराम नाना घोडके यांनी दिल्यानंतर भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांची पत्नी प्रतिभा पाचपुतेंसह अन्य चार महिलां विरोधात मंगळवारी पहाटे श्रीगोंदे पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिभा बबन … Read more

बाळासाहेब थोरात म्हणतात जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय !

अहमदनगर :- जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडासाफ झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतंय. पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात … Read more

निवडणुकीनंतर रोहित पवारांनी केल हे ‘काम’ !

बारामती :- महाराष्ट्राच्या राजकारणातील आश्वासक युवा चेहरा म्हणून रोहित पवार ओळखले जातात. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू म्हणून त्यांची विशेष ओळख. बारामती हा आपला बालेकिल्ला सोडून रोहित थेट कर्जत-जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. गेली पाच-सहा महिने रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे आपली लाडकी मुलगी आनंदीता आणि मुलगा शिवांश यांना त्यांना वेळ देता … Read more