खळबळजनक ! विहिरीत आढळले माजी सैनिकासह दोन मुलांचे मृतदेह

बुलडाणा : खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील एका माजी सैनिकासह त्याच्या दोन मुलांचे मृतदेह २१ ऑक्टोबर रोजी सकाळी विहिरीत आढळून आले. त्यांच्यासोबत अपघात घडला की, त्यांनी आत्महत्या केली याविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आंबेटाकळीचे रहिवासी असलेले गोपाल चराटे (वय ३६) सैन्यात कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी सेवा समाप्तीनंतर ते गावी परतले. दरम्यान, सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी … Read more

मतदान कक्षात सेल्फी काढणे आले अंगलट

नाशिक : शहर आणि जिल्ह्यातील उत्साही मतदारांना मतदान कक्षात सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले असून, सात सेल्फी बहाद्दरांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  नागरिकांनी सेल्फीचा मोह टाळावा तसेच मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेले असून, सेल्फी काढण्याचा मोह हा एक गुन्हा ठरला आहे. संबंधितांविरोधात रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत … Read more

राज्यातील पहिल्या मतदान केंद्रावर झालं फक्त ३२८ पैकी 1 चं मतदान

नंदूरबार : राज्यातील प्रथम क्रमांकाच्या अक्कलकुवा मतदारसंघातील प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र असलेल्या मणिबेली या केंद्रावर केवळ एकच मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ३२८ पैकी ३२७ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.  अक्कलकुवा-अक्राणी हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदार संघ आहे. तर याच मतदार संघात मणिबेली हे प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र आहे. अतिदुर्गम भागात असलेले हे मतदान केंद्र … Read more

चंद्रकांत पाटलांच्या त्या ऑफवर मनसेचे किशोर शिंदे म्हणाले…

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मतदान केंद्रावरच प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांना भाजपा प्रवेशाची ऑफर दिली.  अर्थात त्यांची ही ऑफर शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत धुडकावून लावली. या ‘ऑफर’ प्रकरणाची कोथरूड व शहरात सध्या जोरदार चर्चा झाली.  कोथरूड विधानसभेचे भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनीही मयूर कॉलनीमधील … Read more

ईव्हीएम मशीनसमोरच मतदाराने सोडला जीव

पिंपरी : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले असतानाही ते मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सकाळीच मतदान केंद्रात दाखल झाले. मात्र ईव्हीएम मशीनसमोरच त्यांचा मृत्यू झाला.  अब्दुल रहीम नूरमोहम्मद शेख (६०, रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे. शेख हे पूर्वी भोसरीत राहत होते. ते दोन वर्षांपूर्वी बारामतीमध्ये राहण्यास गेले होते.  तसेच चार महिन्यांपूर्वी त्यांना घशाचा … Read more

भुजबळ कुटुंबीयांनी मतदानाकडे पाठ का फिरवली?

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यादीत नाव नसल्याची तक्रार करणाऱ्या भुजबळ कुटुंबीयांनी आता विधानसभा निवडणुकीत मात्र मतदानाकडे पाठ फिरवली. माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ येवला व नांदगाव मतदारसंघातच अडकून पडल्यामुळे त्यांनी त्यांच्या मतदारयादीतील विधानसभेसाठी मात्र मतदान केले नाही!सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ कुटुंबीय नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदान केंद्रावर … Read more

इतिहासात प्रथमच पाकिस्तानने बंद केली भारताची टपालसेवा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तानातील तणाव वाढतच चालला आहे. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पाकिस्तानने दोन्ही देशांच्या दरम्यान सुरू असलेली टपाल सेवा बंद केली आहे.  मागील दीड महिन्यापासून भारतातून येणारी पत्र घेणे बंद केले आहे. यामुळे दोन्ही देशांत सुरू असलेली ही टपाल सेवा आता खंडित झाली आहे.  भारतीय डाक विभागाच्या उपमहासंचालक अजय … Read more

जिल्ह्यात मतांचा धो-धो पाऊस, सरासरी ६७ %, सर्वाधिक नेवासा, तर सर्वात कमी नगर शहर

अहमदनगर – पावसामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मतदारांनी सोमवारी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडून मतांचा पाऊस पाडला. मतदानाचा टक्का अनेक ठिकाणी वाढल्याने धक्कादायक निकाल लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत सायंकाळी ६ पर्यंत एकूण ६७ टक्के मतदान झाले. नेवासे मतदारसंघात सर्वाधिक ८० टक्के, तर नगर शहर मतदारसंघात … Read more

मतदारांना पैशाचे आमिष, तिघांवर गुन्हा दाखल

पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मत देण्यासाठी मतदारांना पैशाचे आमिष दाखवून ते देण्याच्या उद्देशाने स्वत: जवळ १ लाख ५२ हजार ३०० रूपये बाळगल्याप्रकरणी तिघांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अनिल रामकृष्णा भोसले (रा.सरकोली), सोमनाथ चंद्रकांत घाडगे (रा. अन्नपूर्णानगर), दीपक त्रिंबक येळे (रा. येळे वस्ती, पंढरपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे … Read more

चारित्र्याचा संशय घेतल्याने महिलेची आत्महत्या

नाशिक:चारित्र्याचा संशय व लग्नात मानपान दिला नाही या कारणावरून त्रस्त झालेल्या एका विवाहितेने शेततळ्यात आत्महत्या केल्याची घटना शिंदे पळसे भागात घडली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोपट पुंडलिक सोनवणे (३५, रा. इंदिरानगर, पाथर्डी गाव) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यांची भाची दीपालीचा विवाह सन २०१८ मध्ये नाशिक – … Read more

‘तुम्ही कोणतेही बटन दाबले तरी मत कमळाच्या फुलालाच मिळेल’ – भाजप उमेदवार

जिंद : भाजपच्या हरयाणातील एका उमेदवाराने रविवारी ‘विधानसभा निवडणुकीत कुणालाही मत दिले तरी ते भाजपलाच मिळणार’ असल्याचा वादग्रस्त दावा केल्यामुळे देशात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ हरयाणात चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपचे असंध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीशसिंह विर्क यांनी हा दावा केला आहे. ‘तुम्ही कोणतेही बटन दाबले तरी मत कमळाच्या फुलालाच मिळेल.  आज … Read more

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे दांडीबहाद्दर अडचणीत

अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन नगर शहर मतदारसंघातील तिघांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान साहित्य नेण्यासाठी दोन केंद्राध्यक्ष, एक मतदान अधिकारी यांनी टाळाटाळ व हलगर्जीपणा केल्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.  या तिघांच्या सेवेतून निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना तत्काळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगर शहर मतदारसंघाचे सहायक … Read more

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा

हाजीपूर : बिहारच्या नागरिकांविषयी अवमानास्पद विधान केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात येथील एका न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘बिहारचे नागरिक ५०० रुपयांचे तिकीट काढून रेल्वेने दिल्लीला येतात व ५ लाख रुपयांचा मोफत उपचार करवून परत बिहारला निघून जातात,’ असे वादग्रस्त विधान अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच … Read more

विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही

कर्जत : विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, त्याची सुरुवात ना. शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात केली आहे. विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही की, फिरवली की झाला विकास. ना. शिंदे या सर्वसामान्य व्यक्तीकडे ना कारखाना होता, ना शिक्षण संस्था, ना पैसा. तरीही त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर मतदारसंघात विकासाची प्रक्रिया सुरू केली, ही त्यांची … Read more

लोकसभेप्रमाणेच आघाडीचे पानिपत होईल

अहमदनगर : नगर तालुक्यातील बहुतांशी पाणी योजना शिवसेनेने आणल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार शेलार यांनी खोटे बोलून दिशाभूल करुन श्रेय लाटू नये. शिवसैनिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत. मागील ५ वर्षात सत्तेच्या विरोधातील आमदार निवडून दिल्याने तालुक्याची पिछेहाट झाली. चुकीच्या माणसाला निवडून दिल्याने मागील ५ वर्षे जनतेने शिक्षा भोगली आहे. असे टीकास्त्र शिवसेनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. गाडे … Read more

मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील !

कर्जत : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही; परंतु ठराविक उद्योजकांसाठी मोठ-मोठ्या सवलती दिल्या जातात, याला नेमकं काय म्हणायचं? भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांची मोठी उपेक्षा केली असून, त्याची किंमत आता त्यांना मोजावी लागणार आहे. मतदार आता खोटे आश्वासन देणाऱ्या युती सरकारला घरी बसवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. महाआघाडीच्या … Read more

अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी मला ताकद द्या

राहुरी : तालुक्यातील हक्काचे पाणी, जमीन ताब्यात राहाण्यासाठी, गोर- गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी, तुम्ही मला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी केले. नवी पेठ येथे काल तनपुरे यांची सांगता सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तनपुरे यांनी बाजार समितीपासून प्रचार फेरी काढली … Read more

आमदारकीचा षटकार ठोकणार: आ. कर्डिले

अहमदनगर : जेऊर गटामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आमदार होण्याची संधी मिळाली. नगर नेवासा मतदारसंघाचे विभाजन झाले. त्यानंतरही राहुरी मतदार संघात जेऊर गट आहे. आणि तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने मी सहाव्या वेळीही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास आ. शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला. आ. कर्डिले यांनी नगर तालुक्यातील ४० गावांमध्ये रॅली काढत जेऊर … Read more