शेतातील उसात लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- अकोले शहरापासून जवळच असलेल्या महालक्ष्मी मंदिराजवळ शेतातील उसात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून महालक्ष्मी परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वनखात्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन खात्याने संबंधित परिसरातील शेतात उसात पिंजरा लावला … Read more

नरभक्षक बिबट्या जेरबंद अन ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा निश्वास

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान असाच संगमनेर तालुक्यात धुमाकूळ घालणारा एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील कारथळवाडी शिवारात हल्ला करीत महिलेस ठार करणारा मादी बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. नरभक्षक … Read more

तो दुचाकीवरून चालला अन अचानक बिबट्या त्याच्यावर झेपावला

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- एक युवक मोटार सायकलवरून जात असताना अचानक चालू मोटार सायकलवर बिबट्याने झडप मारून त्यास जखमी केले असल्याची भयानक घटना श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात संकेत सारंगधर झुराळे हा जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संकेत झुराळे हा कामानिमित्त घरून संध्याकाळी सातच्या दरम्यान राजू … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्यातील एका शालेय मुलावरही बिबट्याने हल्ला केलेली घटना घडली होती. त्यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवन शिवारात हिराताई बडे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मेंढवण शिवारात हिराताई बडे यांची … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू…!

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा तालुक्यातील अधोरे वाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यू झाल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालक चिंतेत तसेच भीतीखाली वावरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील अधोरे वाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत पावल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी वनविभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. यामुळे … Read more

‘तो’ अचानक उसातून आला अन …

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  शेतात चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या मेंढ्यांच्या काळपावर उसात दडी धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून एका मेंढीला ऊसाच्या शेतात ओढीत नेवून तिचा फडशा पडला. ही घटना नेवासा तालुक्यातील चांदा या गावात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संजय थोरात हे आपल्या मेंढ्या व काही शेळ्या घेऊन येथील मोरंडी … Read more

विहरित पडलेल्या अडीच वर्षाच्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश..

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील कोल्हार येथे लोणी कोल्हार रोडवर काळामळा येथे जितेंद्र हिरालाल खर्डे यांच्या गट नंबर १३७ मध्ये बुधवार बुधवारी पहाटे अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या भक्षाच्या शोधात असताना विहिरीत पडला. राहाता तालुक्यातील कोल्हार येथे कोल्हार लोणी रोड लगत असलेल्या काळामळा शिवारात खर्डे यांची शेती आहे . याच गट … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वाढला बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पुणतांबा फाटा परिसरात आबनाबे वस्तीजवळ नगर मनमाड हायवे पास करत असताना राहुल दहिवाड, कैलास वाघ, वसंत त्रिभुवन, देवा लोखंडे यांना बिबट्या … Read more

… अन शिकारीच झाला शिकार! वाचा सविस्तर..

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भक्ष्याच्या शोधात असलेला तीन वर्षाचा बिबट्या लक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला. अन अलगद पिंजऱ्यात कैद झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली.(leopard news) नर जातीचा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना रात्रीच्या सुमारास पावसे यांच्या बिनकठड्याच्या विहिरीमध्ये पडला. विहिरीला कठडे नसल्याने बिबट्या विहिरीत पडल्याची बाब सकाळी पावसे यांच्या … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू ‘या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील किन्ही , बहिरोबावाडी परिसरात गेली पाच , सहा महिन्यांपासून दोन बिबट्यांचा वावर आहे. या बिबट्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केलेले आहेत.(leopard news)  बिबट्याचे किन्ही , बहिरोबावाडी परिसरात नित्यनेमाने वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना दर्शन होत आहे. सोमवारी राञी किन्ही येथे कान्हुर रोडवरील किनकर वस्तीलगत असलेल्या कैलास किनकर … Read more

धक्कादायक ! उसाच्या शेतात आढळून आले अवशेष…

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे बिबट्या आढळून आला होता. पांडवडगर तलावानजीक आजिनाथ दादासाहेब गिरगुणे यांच्या शेतात बिबट्या आढळून आला होता.(leopard news)  बिबट्या दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिला होता. त्यानंतर बिबट्याने जवळच्या ऊसात पलायन केले. दरम्यान याच परिसरातून बिबट्याने एका शेतकऱ्याची मेंढी फस्त केली होती. आज त्याच उसाच्या शेतात फस्त … Read more

धूमकेतू पाहण्यासाठी गेलेल्या खगोलप्रेमींना दिसला अचानक बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :-   जिल्ह्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे शहर तसेच गाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच एक धक्कादायक घटना चांदबीबी परिसरात घडली आहे.(leopard news)  नगर मधील चांदबीबी परिसरात नवा धूमकेतू पाहण्यासाठी जाणार्‍या खगोलप्रेमींना अचानक बिबट्या आडवा गेल्याने त्यांची तारांबळ उडाली. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे यापूर्वीही … Read more

…म्हणून भयभीत झालेले शेतकरी शेतात जाण्यापासून घाबरतायत

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(leopard news) नुकतेच कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी व चांदेकसारे परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकर्‍यांना आपल्या शेतात जाणे कठीण बनले आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी … Read more

नगरकरांनो सावधान ! नगर तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आढळून आला बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.(leopard news)  यातच नगर तालुक्यातील देहरे टोल नाका भागात पांढरी वस्ती तसेच काळे व कपाले वस्ती भागात चार पाच दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. या संदर्भात जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. … Read more

बिबट्याच्या वाढत्या वावराने येथील नागरिक जगतायत दहशतीखाली…

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर दत्तनगर परिसरासह शहराच्या लोकवस्ती असलेल्या पूर्णवादनगर भागात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत परिसर्फातील दोन बकरं फस्त केेले.(leopard news)  त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान गेल्या … Read more

मध्यरात्री येत बिबट्याने शेळीवर हल्ला चढवला; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परीसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍यांची शेळी गंभीर जखमी झाल्याची घटना भोकर परीसरात घडली.(Leopard news)  वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. भोकर परीसरात काही महिन्यांपासून बिबट्यासह मादी व बछड्याचा वावर आहे, बिबट्याने या परीसरातील अनेक कुत्रे, शेळ्या, मेंढ्या फस्त केल्याच्या … Read more

‘या’ परिसरात बिबट्याचा समूह असण्याची शक्यता; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  उक्कलगाव व पटेलवाडी परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आले आहे.(leopard news) शुक्रवारी रात्री बिबट्याने बेलापूर-कोल्हार रोडवरील उक्कलगाव येथे शेतात वस्ती करून राहणारे सेवानिवृत्त शिक्षक विजय नामदेव मोरे यांच्या घराचे कंपाउंड तोडून घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप मारून त्याला ठार केले. दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी उक्कलगाव-पटेलवाडी रोडवरील थोरात वस्ती … Read more