नगरकरांनो सावधान ! नगर तालुक्यातील ‘या’ ठिकाणी आढळून आला बिबट्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.(leopard news) 

यातच नगर तालुक्यातील देहरे टोल नाका भागात पांढरी वस्ती तसेच काळे व कपाले वस्ती भागात चार पाच दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे.

या संदर्भात जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. जगताप यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. दरम्यान विळद व देहरे परिसरात अनेक वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे.

मात्र त्यांच्याकडून मानवास कोणताही उपद्रव झालेला नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी घाबरून न जाता सायंकाळनंतर शेतात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऊसतोड करताना विशेष काळजी घ्यावी. पिले आढळून आल्यास त्यांना न हाताळता हा परिसर निर्मनुष्य करून तत्काळ वन विभागास माहिती द्यावी,

असे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.