विहरित पडलेल्या अडीच वर्षाच्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील कोल्हार येथे लोणी कोल्हार रोडवर काळामळा येथे जितेंद्र हिरालाल खर्डे यांच्या गट नंबर १३७ मध्ये बुधवार बुधवारी पहाटे अडीच वर्षे वयाचा नर बिबट्या भक्षाच्या शोधात असताना विहिरीत पडला.

राहाता तालुक्यातील कोल्हार येथे कोल्हार लोणी रोड लगत असलेल्या काळामळा शिवारात खर्डे यांची शेती आहे . याच गट नंबर १३७ मध्ये विहिर आहे.

खर्डे हे नेहमी प्रमाणे मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या पडलेला दिसला. सदर घटनेची माहिती मिळताच गावात वाऱ्यासारखी पसरली घटणा स्थळी गावकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती .

मोबाईल कॅमेरातकैद कैद करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. घटनेची माहिती कळताच प्राणी मित्र घटना स्तळी हजर झाले .

वनपाल गाढे,वनकर्मचारी संजय साखरे, शेळके तातडीने कोल्हार येथे येवून स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतील बिबट्याला बाजीच्या साहाय्याने तरंगत ठेवले. नंतर क्रेन च्या साहाय्याने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले