कोरोना व्हायरसचा धुमाकूळ : जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट्स या लिंकवर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभर धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता अहमदनगर शहरात देखील आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.जाणून घ्या कोरोना व्हायरसबाबत प्रशासनाचे अपडेट्स, उपाययोजना,निर्णय, माहिती व बातम्या या पेजवर.  (लास्ट अपडेट 4.22 AM 16-03-2020) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत.  नगरमध्ये कोरोनाचा आढळून आलेला रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती … Read more

Delhi Results Live आप 57 जागेवार आघाडीवर तर भाजप १३ जागांवर आघाडीवर 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या  ७० जागांकरता झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होत  आहे. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदान हे 62.69 टक्के नोंदवण्यात आले होते. एक्झिट पोलने सत्ताधारी आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल असा दावा केला आहे. Delhi Results Live   आप 57 जागेवार आघाडीवर तर भाजप १३ जागांवर आघाडीवर आप ५४ जागेवार घाडीवर … Read more

Union budget 2020 Live : आता आई होण्याचं वयही ठरणार : निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज (शनिवार 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या बजेटचं वाचन सकाळी 11 वाजता सुरु होईल. कोणत्या वस्तू महागणार आणि कशाचे दर स्वस्त होणार? इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? सीतारमन यांच्या पोतडीतून रेल्वेसाठी काय मिळणार? याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत. Budget 2020 Live   महिलांशी … Read more

Live Updates : अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदी प्रताप शेळके यांची निवड झाली आहे. हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात…. भाजपा उमेदवार खेडकर व आठवले यांनी माघार घेतल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड औपचारिकताच ठरली . महाविकास आघाडीने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे … Read more

दृष्टिकोन बदलल्याशिवाय महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबणार नाही – आ. राजळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव: देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना समाजात महिला सुरक्षित नाहीत, स्त्रीमुक्तीचा जागर झाला असला तरी समाजाची महिला भगिनींकडे बघण्याची मानसिक्ता आणि दृष्टिकोन बदलल्याशिवाय महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. शेवगावच्या राजीव राजळे प्रतिष्ठानच्या वतीने विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल आ. राजळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार कोसळून आजी व नात ठार

पाथर्डी : मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेऊन मढीकडे येणाऱ्या भाविकांची होंडा कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात आजी व नात ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. मायंबा घाटात कार तीनशे फूट खोल दरीत कोसळली. तेजल सचिन वाघ (२ वर्षे) या मुलीला जखमी अवस्थेत नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा पेटणार

अहमदनगर :- जिल्ह्यातील १४ पंचायत समितींच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज सकाळी नियोजन भवनात ही सोडत काढण्यात आली. यामध्ये श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी, तर जामखेडचे सभापतीपद अनूसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचेही राजकारण जिल्ह्यात तापणार आहे. सध्या … Read more

महानगरपालिकेच्या तीन जागांसाठी 11 अर्ज

अहमदनगर:  जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून महापालिकेच्या तीन जागांसाठी बुधवारी  11 जणांनी अर्ज नेले आहेत. नगरपालिकेसाठी एक जागा असून, त्यासाठी याआधी दोघांनी आणि  बुधवारी  तिघांनी अर्ज नेले आहेत.  जिल्हा परिषदेसाठी अर्थात ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून एक जागा असून, त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य धनराज शिवाजी गाडे यांनी एकमेव अर्ज दाखल केला आहे. ही जागा बिनविरोध … Read more

वेबसाईटवर खोटी माहिती देऊन फसवणूक

अहमदनगर : हॉटसअप, मेल आयडीवर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्याची खोटी माहिती देवुन, फसवणूक केल्याची ब्रजेश प्रेमशंकर तिवारी यांनी हरीषचंद्र गोपाळ बेलवले याच्याविरूध्द जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, बेलवले याने फिर्यादी तिवारी यांच्या मेलआयडी वर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्ड … Read more

Maharashtra Politics Live Updates : फडणवीस सरकारला दिलासा !

मुंबई : महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता वेगळं वळण घेत आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कोर्टात आहे. शनिवारी झालेल्या शपथविधीविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सोमावरी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे  Live Updates जवळपास दीडतास युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला विश्वासदर्शक ठराव तातडीने … Read more

जीवघेण्या हल्ल्यानंतरही आरोपीवर कारवाई नाही,पाचपुतेंची तक्रार

अहमदनगर :- नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील हॉटेलमध्ये मी झोपलेलो असताना अज्ञात व्यक्तीने खुनी हल्ला केला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला होतानाचे चित्रीकरण पोलिसांना दिले आहे, पण गुन्हा घडून २२ दिवस झाले, तरी कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. या घटनेुळे आमचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून चौकशी करण्यास गेल्यास पोलिस … Read more

Live Updates : पारनेरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके विजयी !

1.54 : पारनेरमध्ये पंधरा वर्षानंतर परिवर्तन,निलेश लंके विजयी ! वाचा सविस्तर बातमी लिंकवर http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/10/24/news-241011/ 1.46 :- पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे़. विजयाच्या जवळ येताच लंके यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची जेसीबीवरुन मिरवणूक काढली़. कार्यकर्त्यांनी लंके यांच्या नावाच्या जोरदार घोषणा देत गुलालाची उधळण … Read more

Live Updates : श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे विजयी !

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा 20 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. भाऊसाहेब कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता. 4.03 :- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा १९९९४ मतांनी पराभव केला. … Read more

नेवाश्यात शंकरराव गडाख 31 हजार मतांनी विजयी !

नेवासे मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख यांचा 31 हजार मतांनी विजय झाला आहे.भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा दारुण पराभव झाला असून शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या माध्यमातून गडाखांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. गडाखांना राष्ट्रवादीने पाठींबा दिला होता.  2.58 :- शंकरराव गडाख विजयी; भाजपचे मुरकुटे पराभूत नेवासा विधानसभा मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार (अपक्ष) शंकरराव गडाख यांनी भाजपचे … Read more

Live Updates : शेवगाव पाथर्डी मतदार संघातून मोनिका राजळे 14231 मतांनी विजयी !

2.50 :- मोनिका राजळे 14231 मतांनी विजयी शेवगाव पाथर्डी मतदार संघातून मोनिका राजळे 14231 मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांचा पराभव केला. दिवंगत राजीव राजळे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होती,ह्या लढतीत अखेर मोनिका राजळे यांनी बाजी मारली. 12.34 :- शेवगाव पाथर्डी मतदार संघातून 15 फेरी अखेर भाजप च्या मोनिका राजळे 7133 … Read more

Live Updates : कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी !

4.56 :- कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला. येथील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रोहित पवार हे आघाडीवर होते. पुढे ही आघाडी वाढत गेली. 2.09 :- रोहित पवार विजयी ! 12.17 :- पालकमंत्री राम शिंदे यांनी मतमोजणी केंद्र सोडले. … Read more

संगमनेर मध्ये 61853 मतांनी बाळासाहेब थोरात यांचा विजय !

1.22 :- 61853 मतांनी बाळासाहेब थोरात यांचा विजय संगमनेर मध्ये काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा 62000 मतांनी विजय झाला असूनशिवसेनेचे साहेबराव नवले यांचा पराभव झाला आहे.  11.34 :- संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आठव्या फेरीअखेर १९ हजार मतांची आघाडी 9.06 : बाळासाहेब थोरात आघाडीवर शिवसेनेचे साहेबराव नवले पिछाडीवर विधानसभा निवडणूक २०१९चे निकाल प्रसिद्ध … Read more

श्रीगोंद्यातून 4,750 मतांनी माजीमंत्री पाचपुतें विजयी !

6.33 :- शेवटच्या फेरी अखेर पाचपुतें आघाडी घेत विजयी, एकूण 4,750 मतांनी पाचपुतें विजयी घनश्याम शेलार-97,980 बबनराव पाचपुते-1,02,403 अटीतटीच्या लढतीत भाजप च्या बबनराव पाचपुतेंचा विजय 5.10 :- अनपेक्षितपणे अतिशय चुरशीच्या झालेल्या श्रीगोंद्यातील निवडणूक निकाल थांबविला आहे,कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने ह्या मतदार संघातील अंतिम निकाल येन अद्याप बाकी आहे. 4.09 :- 22 व्या फेरीनंतर श्रीगोंद्यात माजीमंत्री पाचपुते … Read more