काँग्रेसचा मोठा आरोप, मोदींचे अपयश लपवण्यासाठी राज ठाकरे…

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra Politics : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसंबंधी आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला आलेले अपयश लपविण्यासाठी भाजपकडून राज ठाकरे यांचा वापर करून घेतला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यासंबंधी पटोले यांनी म्हटले आहे की, भोंग्याचा … Read more

BIG News | भोंग्यांचा विषयही आता केंद्राच्या कोर्टात, बैठकीत असं ठरलं

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंबंधी नियम करण्याचा विषयही आता केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीत यासंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. … Read more

भोंग्याच्या बैठकीकडे राज ठाकरेंची पाठ, अंदाज खरा ठरला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंबंधी नियमावली करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. हा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ठाकरे स्वत्: बैठकीला उपस्थित न राहता त्यांचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित … Read more

तेव्हा याच नवनीत राणा आमच्यावर हसत होत्या, तृप्ती देसाईंनी साधला निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics  :- ‘महिलांना प्रार्थनेचा समान हक्क मिळावा यासाठी जेव्हा आम्ही शनिशिंगणापूर, हाजी अली दर्गा, त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करीत होतो, तेव्हा खासदार नवनीत राणा कुठे होत्या?’ असा सवाल भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्यावेळी महिलांच्या हक्कासाठीच्या आंदोलनांना पाठिंबा देणे तर दूरच हेच राणा दाम्पत्य आमच्यावर हसत … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ती’ आमची चूकच झाली!

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मुंबईत शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य यांच्यात घमासान सुरू आहे. त्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या पाठबळामुळेच राणा दाम्पत्य असे धाडस करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र खासदार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबाव्यावरच निवडून आल्या आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. … Read more

Maharashtra Politics | सरकारची सेफखेळी, भोंग्याच्या प्रश्नी उचललं हे पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मशिदीवरील भोंग्यांचं काय करायचं यावर निर्णय घेताना महाविकास आघाडीच्या सरकारनं सेफ खेळी खेळायचं ठरविल्याचं दिसून येतं. कोणताही निर्णय एकतर्फी घेण्यापेक्षा यामध्ये विरोधी पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी सोमवारी (२५ एप्रिल) मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच यासंबंधी … Read more

रोहित पवार म्हणाले, कोणाला वाटत असेल ‘ती’ माणुसकी…

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 maharashtra politics :  महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी केल्यानंतर राज्यात वातावरण तापले आहे. गेल्यावर्षी याच काळात करोनाची दुसरी लाट तीव्र होती. त्यामुळे सर्वांचीच सर्व भेद विसरून जगण्याची धडपड सुरू होती. यावर्षी त्याच काळात वातावरण वेगळ्याच मुद्द्यावरून कलुषित झाले आहे. यावरून आता सोशल … Read more

३ मे रोजी मनसे काय करणार? नितीन सरदेसाई यांनी केलं जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics : मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे ही अंतिम मुदत दिली आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे, सोबतच अक्षय तृतीया हा सणही आहे. राज्य सरकारकडून लाऊडस्पीकरसाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरू असतानाच मनसेने ३ मे साठी मोठी घोषणा केली … Read more

राज ठाकरे यांचे जुने व्यंगचित्र काँग्रेसकडून व्हायरल, केला हा सवाल

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावरून त्यांच्या बदलत्या भूमिकेसंबंधी टीका सुरू झाली आहे. काँग्रेसने ठाकरे यांनी पूर्वी काढलेले एक व्यंगचित्र व्हायरल करून सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत ठाकरे यांचे जुने … Read more

शिवसेना-राष्ट्रवादीचं हे ठरतंय, काँग्रेसचं काय?

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Maharashtra politics : देशभरात भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाराष्ट्रातही आघाडी करण्याचे ठरविले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढविण्याचे ठरत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, महाविकास आघाडीचा तिसरा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसची या संबंधीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. … Read more

होय, मी खोटं बोललो! पण…, खुद्द शरद पवारांनीच दिलीय कबुली

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सध्या विरोधकांनी टार्गेट करून टीका सुरू केली आहे. एक तर पवार खोटं बोलतात असा त्यांच्यावर आरोप होतो, आता पवार यांच्यामुळंच जातीयवाद पसरला, असाही आरोप केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथनपर पुस्तकातील एक … Read more

रोहित पवार विरोधकांवर भडकले, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Maharashtra politics : राज्यातील विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विविध माध्यमातून टीका सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर जातीयवाद पसरवित असल्याचा आरोप केला. त्यापाठोपाठ विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काही उदाहरणं देत या आरोपांना दुजोरा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित … Read more

तेव्हा सदावर्ते झोपले होते का? रोहित पवारांचा सवाल

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 maharashtra Politics :- “यापूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना जेव्हा जेव्हा पगारवाढ मिळाली आहे, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीच मध्यस्थी केली होती. पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार केवळ ४५० रुपयांनी वाढला. तेव्हा अड. गुणरत्न सदावर्ते झोपले होते का?,” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार … Read more

छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!! केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे बळीराजा देशोधडीला

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महा विकास आघाडी सरकारमध्ये अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food Supply Minister Chhagan Bhujbal) यांनी नुकताच केंद्राच्या मोदी सरकारवर घणाघात केला आहे. भुजबळ (Bhujbal) यांनी सांगोल्यातील (Sangola) मौजे महूद या ठिकाणी शेतकरी परिषदेत (Farmers Council) बोलताना मोदी सरकार वर चांगलेच … Read more

शरद पवारांसाठी अजितदादांना दिला होता राजीनामा…

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काका-पुतण्यांची जोडी राजकारणात प्रसिद्ध आहे. काकांचा हात धरून पुतण्याचे राजकारण चालत असल्याचे सर्वजण मानतात. मात्र, एकदा अजितदादांनी आपल्या काकांसाठी सहा महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला होता. ही राजकीय सोय काय होती, कोणाच्या सांगण्यावरून केली, … Read more

राज ठाकरेंच्या भाषानंतर पहिलीच कृती आणि कारवाईही!

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Maharashtra Politics  :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुडीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर त्यांच्या आवाहनानुसार कार्यकर्त्यांनी मुंबईत पहिली कृती केली. मात्र, पोलिसांनीही तेवढ्याच तत्परतने कारवाई केली. आता या कारवाईचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंग्यावर भाष्य केले होते. हे भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे … Read more

‘एमआयएम’च्या प्रस्तावावर भाजप-शिवसेनेची सडेतोड प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra Politics :- महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र शिवसेना व भाजपनेही यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, ’जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतो. तो शिवसेना, महाराष्ट्र आणि … Read more

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री, तनपुरे झाले पालकमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra Politics :- मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत. अटकेत असले तरी त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, असा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, त्यांच्याकडील खाती आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून इतर मंत्र्यांना देण्यात आली. त्यामुळे … Read more