माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा 

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धची फौजदारी याचिका नागपूर खंडपीठाने खारीज केली. ॲड. सतीश उके यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती.   याचिकाकत्र्याच्या मते, २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन फौजदारी प्रकरणांचा नामनिर्देशपत्रात उल्लेख केला नाही. त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवली.   त्यासंदर्भात याचिकाकत्र्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार … Read more

कारच्या धडकेत दोन मित्रांचा मृत्यू 

पुणे : हडपसरमधील अमनोरा टाउनशिप शेजारील रस्त्यावर दुचाकीला भरधाव कारची धडक बसून अपघात झाला. या अपघातामध्ये दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.   हा अपघात अमनोरा टाउनशिपशेजारी सिव्हिक केंद्रासमोर गुरुवारी (दि. १४ नोव्हेंबर) सकाळी साडेनऊ वाजता झाला. कारचालकाला अटक केली असून, त्याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.   बालाजी विठ्ठल कांबळे (वय २०), यश महादेव … Read more

धक्कादायक ‘कंसमामा’ने दाबला दहा वर्षीय भाच्याचा गळा !

सोलापूर : पतंग-मांजा घेऊन देतो, असे सांगून दहा वर्षीय भाच्च्यास रेवणसिध्देश्वर मंदिराच्या पाठीमागे नेऊन मामाने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. भाच्चा बेशुध्द होऊन निपचित पडल्याने तो गत:प्राण झाल्याचे समजून मामा तेथून पसार झाला. परंतु दैव बलवत्तर म्हणून भाच्चा वाचला. तो शुध्दीवर आल्यानंतर मामाच्या ‘कंसगिरी’चे बिंग फुटले. पोलिसांनी तातडीने त्या ‘कंसमामा’स ताब्यात घेतले आहे. विठ्ठल … Read more

सोलापुरात महिला, पुरुष भिक्षेकऱ्यांचे मृतदेह आढळले

सोलापूर :- सिद्धेश्वर तलावाशेजारील खंदक बागेच्या भिंतीजवळ शुक्रवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला आहे. दोघेही भिक्षेकरी असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खंदक बागेच्या भिंतीजवळच्या एका झाडाला एका ४६ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला … Read more

या कारणामुळे उदयनराजे भोसले यांनी मागितली मुस्लिम समाजाची माफी 

सातारा :- लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेत भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चुकीचे आहे. या वक्तव्याशी आपला संबंध नाही. पण तरीही आपण मुस्लिम समाजाची माफी मागत आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालतो. जातपात आपण कधीच मानत नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी देत ‘मी सॉरी म्हणायला … Read more

अजित पवारांवर गुन्हा कधी दाखल होणार ?

वृत्तसंस्था :-  सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटदारांना बेकायदा निधी मंजूर करणे, निविदांचे दर अवैधरीत्या वाढवण्यात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे.  मात्र तरीही त्यांच्याविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ताे कधी दाखल करणार, अशी विचारणा याचिकाकर्त्यांनी नागपूर खंडपीठाकडे केली आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामाची … Read more

सत्ता स्थापनेचा वाद ;  तिन मित्रांच्या भांडणात एकाचा कान तुटला !

लातूर: विधानसभा निवडणुक निकाल लागून महिना होत आला तरी राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये.  दररोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याने आता कोणाचं सरकार येणार यावरुन विविध चर्चा होत आहेत. अशाच प्रकारे सुरु असलेल्या चर्चेत एक विचित्र घटना घडली आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राचा चक्क कानच तोडल्याचा प्रकार समोर … Read more

अखेर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळणार !

मुंबई :- शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्रृत्वात सरकार स्थापन करण्याची तयारी केली असून  महाशिवआघाडीमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय.  जाणून घेऊयात या फॉर्म्युल्यानुसार कोणत्या पक्षाला कोणतं पद मिळणार? आणि खातेवाटप कसं असणार? मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवआघाडीतील सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव जवळपास निश्चित झाला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीला पाच … Read more

बालदिनीच नवजात बाळाला सोडून आईचे पलायन

सिन्नर –  सिन्नर बालदिनीच १५ दिवसांच्या नवजात पुरुष जातीच्या अर्भकास घोरवड घाटात सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.  सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात रस्त्यालगत गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या हे बालक आढळून आले आहे. घोरवड येथील एका आदिवासी समाजाच्या महिलेस हे बाळ सापडल्यानंतर तिने त्यास घरी नेऊन न्हाऊ घालून माणुसकीचे दर्शन घडवले. घोरवड येथील मथुरा … Read more

मुलाला फाशी देत आईची छताला गळफास घेऊन आत्महत्या !

नांदगाव : दीड वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईनेही घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील मणिकपुंज येथे घडली. गोरख तुकाराम मेंगाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरी करून उदरनिर्वाह करणारे गोरख आणि राहीबाई त्यांचा दीड वर्षाचा मुलगा संदीप, भाऊ शरद आणि त्याची पत्नी मंगलाबाई एकत्र मणिकपुंज … Read more

शिवसैनिक संतापला : उद्धव ठाकरे बोलत नाहीत तोपर्यंत टॉवरवरून उतरणार नाही !

नंदुरबार :- शिवसेना व भाजपला मतदारांनी जनादेश दिल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचा हा निर्णय शिवसैनिकांसह मतदारांचा अनादर करणारा आहे. ठाकरे यांनी भाजपसोबतच राज्यात सत्ता स्थापन करावी, या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यातील कार्ली गावातील तुकाराम पाटील या शिवसैनिकाने मोबाइल टॉवरवर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन सुरू … Read more

पत्नी, मुलाचा चाकूने भोसकून खून करून आत्महत्येचा प्रयत्न

माजलगाव :- पत्नी, मुलाचा चाकूने भोसकून खून करून आरोपीने नंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील मोगरा गावाजवळील रामनगर तांड्यावर बुधवारी दुपारी घडली. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. बंडू उत्तम जाधव (४०) असे आरोपीचे नाव आहे. रामनगर तांड्यावर तो वास्तव्यास आहे. बुधवारी पत्नी गंगा, मुलगा करण व मुलीसह तो शेतात कापूस वेचत … Read more

आमदार बच्चू कडू यांना अटक !

मुंबई :- प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू हे  ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा काढून जोरदार आंदोलन करणार होते. यावेळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. Maharashtra: Farmers in Mumbai staged a … Read more

शरद पवारांवर हल्ला करणाऱ्याला अटक !

नवी दिल्ली : २०११ मध्ये देशाचे तत्कालीन कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. अरविंदर ऊर्फ हरविंदर सिंग असे आरोपीचे नाव आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. नवी दिल्लीच्या एनडीएमसी केंद्रामध्ये २४ नोव्हेंबर २०११ रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तत्कालीन … Read more

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार!

मुंबई :- काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या आमदारांची हॉटेलमध्ये भेट घेतली व शिवसेनेचाच मुख्यमंत्री हाेईल, असे आश्वस्त केले. त्यांच्यासाेबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हाेते. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अरविंद सावंत यांचा ठाकरे यांनी या वेळी आमदारांच्या बैठकीत सत्कार केला. तत्पूर्वी सकाळी उद्धव यांनी रुग्णालयात जाऊन खासदार … Read more

सरकार पुन्हा येण्यासाठी हवे ते करू!

मुंबई :- महाशिवआघाडी स्थापन होण्याची चिन्हे दिसत असतानाच भाजपनेही सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली असून यासाठी मोठी जबाबदारी ही नारायण राणे यांच्यावर सोपवली आहे. स्वतः नारायण राणे यांनीच पत्रकारांना सांगितले की, ‘राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल.’ मंगळवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. यात भाजपने वेट अँड वॉचची भूमिका … Read more

कडकनाथ कोंबडी प्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा

सांगली :- कडकनाथ कोंबडी पालनातून बर्ड अग्रो प्रायव्हेट कंपनीने सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना १ कोटी ५४ लाख ६६ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.  या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्षांसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसाक पठाण यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी ‘बर्ड’चे अध्यक्ष निंबाळकर, गणेश निंबाळकर यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल … Read more

गडचिरोली जिल्ह्यात तरुणाची गळा चिरून हत्या

नागपूर :- पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.    काशीराम असे मृताचे नाव आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुका सुरळीत पार पडल्यानंतरची ही पहिलीच घटना आहे. रविवारी रात्री नक्षलवादी धानोरा तालुक्यातील रानकट्टा या गावात आले. त्यांनी काशीरामला घरातून बाहेर काढून गावाबाहेर नेले व तेथे गळा चिरून त्याची … Read more