अण्णा हजारे म्हणाले…आमदार लंकेच्या जीवन चरित्राचा संपूर्ण खर्च मी देईल

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-समाजकार्यापायी आमदार निलेश लंके यांना स्वतःच्या कुटूंबाकडेही लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीकडून केली जाते. आ. लंके यांचा हा त्याग मोठा आहे. समाजकार्याचं त्यांना वेड लागलं आहे. त्यांच्या जिवन चरित्र कोणी लिहिलं तर मी त्याचा संपूर्ण खर्च देईल असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. ४१ व्या वाढदिवसानिमित्त … Read more

शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार लंकेनी 10 वर्षांनंतर पुन्हा हाती घेतले हे काम

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-पारनेर तालुका दूध संघाची लढाई आम्ही आता जिंकली आहे. आता दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुका दूध संघ तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा सुरू करीत आहोत. आम्ही एक लढाई जिंकली, आता पुढची लढाई तालुक्‍याची कामधेनू असलेला पारनेर तालुका सहकारी कारखाना पुन्हा शेतकऱ्यांना परत मिळविण्यासाठीची असेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. तालुका … Read more

आनंदाची बातमी : ह्या ठिकाणी सुरु झाला जिल्ह्यातील पहिला सीएनजी गॅस पंप !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-नगर-पुणे मार्गावरील सुपे औद्योगिक वसाहतीत म्हसणेफाटा येथील जिल्ह्यातील पहिल्या सीएनजी पंपाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. सुपे औद्योगिक वसाहतीबरोबरच पारनेर शहराला पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना केली. उद्योजक कैलास गाडीलकर यांचा हा पंप आहे. डिझेल डोअर … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी केले ‘हे’ आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:ची काळज़ी घ्यावी, असे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले. आरोग्य सेवा आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत कॅरियर, माय आयडिया कंपनी व स्नेहालय संस्थेच्या वतीने हंगा येथे आयोज़ित मोफत सर्वरोग तपासणी शिबिराप्रसंगी आ. लंके बोलत होते. समुदाय अरोग्यवर्धिनी उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणीत बी. पी. शूगर, … Read more

आ. निलेश लंके म्हणाले शिवाजी महाराजांचे हे कौशल्य आत्मसात करा..

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थान कौशल्य तरुणांनी आत्मसात करावे, असे आव्हान आमदार नीलेश लंके यांनी केले.कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३९१ वा शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कुठलीही गोष्ट करण्यासाठी व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. महाराजांनी एवढे मोठे विश्व … Read more

जिल्हा बँक निवडणूक : १०५ पैकी तब्बल ९३ मतदार आमदार नीलेश लंकेनी आणले आणि….

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्था मतदार संघात १०५ पैकी तब्बल ९३ मतदार आमदार नीलेश लंके तसेच माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी मतदानाला आल्याने उमेदवार उदय शेळके यांचा एकतर्फी विजय निश्‍चित झाला आहे. बिगरशेती मतदार संघातही प्रशांत गायकवाड यांना एकूण मतदानापैकी ९५ टक्के मतदारांनी कौल दिल्याचे चित्र आहे. … Read more

शरद पवारांसाठी आमदार लंकेनी टीकाकारांना केली ‘ही’ नम्र विनंती

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जेजुरी येथील भाषणावरून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी टीका केली होती. या मुद्द्यावरून कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना शाब्दिक उत्तर देखील दिले होते. आता याच प्रकरणावरून पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्येष्ठ … Read more

आमदार निलेश लंके यांच्या साधेपणाचे पुन्हा दर्शन आ. लंके जमिनीवर तर कार्यकर्ते…

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- आमदार निलेश लंके यांचा साधेपणा समस्त महाराष्ट्राला परिचित आहे. बुधवारी आमदार निवासात आ. लंके जमिनीवर तर कार्यकर्ते पलंगावरील गादीवर झोपल्याचे दृश्य एका कार्यकर्त्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात बंदिस्त केले. केवळ पारनेर नगर मतदारसंघातील नाही तर राज्यभरातील अनेक जण या ठिकाणी मुक्कामी येतात. सर्वसामान्यांना आश्रय आणि आधार देणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची … Read more

साई संजीवनी प्रतिष्ठान नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने पद्मश्री पवार व आमदार लंके यांचा जाहीर सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना व योग्य दिशा मिळते. राजकारणात बदल घडत असतात. नव्याने नेतृत्व उदयास येऊन नवीन कार्यकर्ते घडत असतात. मात्र गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. सरपंचांनी आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावे. ग्रामपंचायतच्या निवडणुका संपल्या असून, सर्व हेवेदावे सोडून गावाच्या विकासासाठी … Read more

आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात सरपंच निवडीतुन एकावर हल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून अनेक ठिकाणी सरपंच तसेच उपसरपंच पदांची घोषणा देखील झाली आहे. मात्र राजकीय मतभेदातून आजही काही ठिकाणी निवडणुकांनंतर वाद , हाणामारी, जीवघेणे हल्ले अशा घटना घडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे. भाळवणी सरपंच निवडीच्या वादातून दोघांनी एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची … Read more

आमदार निलेश लंकेंनी राममंदिरासाठी दिली ‘इतकी’ देणगी !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- अयोध्याच्या पावनभूमीत भव्य राम मंदिराची उभारणी होत आहे. व प्रसारमाध्यमांवर प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिरास स्वच्छेने देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार निलेश लंके यांनी राममंदिर उभारणीसाठी १ लाख ३३३ रूपयांच्या देणगीचा धनादेश दिला. रविवारी पारनेर-नगर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर … Read more

अजितदादा, आ. लंके यांच्या आग्रहाखातर ‘मी’ निवडणूक रिंगणात!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-आजवर आपण स्व. गुलाबराव शेळके यांच्या आदर्शावर वाटचाल करून शेतकरी, कर्मचारी यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अजितदादा, आ. लंके यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढविणार असून सर्वांनी सहकार्य करा. असे आवाहन उदय शेळके यांनी केले. शुक्रवारी उदय शेळके यांनी मांडओहळ येथे आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी १०५ मतदारांपैकी … Read more

पालकमंत्री म्हणतात ‘या’ आमदाराच्या पाठीमागे ‘मी’ हिमालयासारखा उभा राहील!

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- पारनेर हा सातत्याने दुष्काळी असणारा तालुका पाण्यापासून वंचित राहिला आहे. या तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी व विविध विकास कामांसाठी आमदार निलेश लंके यांनी ‘मास्टर प्लॅन’ तयार करावा,त्यांच्यामागे हिमालयासारखा उभा राहणार असल्याचे सांगतानाच आ. लंके यांच्या मतदारसंघात इतर आमदारांपेक्षा दुप्पट निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तालुक्यातील भाळवणी … Read more

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत आमदार लंके ….

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीचे प्रनेते समजले जाणारे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ८८ जागांपैकी ७० जागांवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व मिळवत मतदार संघासह महाराष्ट्रात अनोखे वेगळेपण निर्माण केले. एकुण८८ ग्रामपंचायत पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ७० ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवता आले तर संमिश्र स्वरूपात सहा ग्रामपंचायत असून इतर पक्ष १० ग्रामपंचायती पैकी … Read more

VRDE प्रश्नी आमदार लंके संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-देशाच्या स्वातंत्र्यानंतर नगर येथे स्थापन झालेल्या VRDE या संस्थेच्या देशभरात सध्या 52 शाखा आहेत. या संस्थेने आजवर देशासाठी अनेक उपयुक्त संशोधने केलेली असून नगरच्या संस्थेची देशासह जगभरात वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. नगर जिल्ह्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ती आठवण आहे. सध्या ही संस्था नगर येथून चेन्नई येथे हालविण्याच्या हालचाली सुरू … Read more

व्हीआरडीई देशाच्या स्वातंत्र्याची आठवण : संस्था हालवू देणार नाही आमदार नीलेश लंके यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-देशाची फाळणी झाली त्यावेळी सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीजवळील चखलाला प्रांतातून व्हिआरडीईचे नगरमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. माझ्या नगर जिल्हयासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ती आठवण आहे. सध्या ही संस्था नगर येथून चेन्नई येथे हालविण्याच्या हालचाली सुरू असून त्यास आपला ठाम विरोध आहे. यासंदर्भात आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेउन … Read more

बिनविरोधासाठी प्रलोभने दाखविणाऱ्या आमदारांवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी निवडणूक या होणारच आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकांमध्ये बिनविरोधासाठी लोकप्रतिनिधींनी मोठी धावपळ केली. तसेच याप्रसंगी गावकऱ्यांना आर्थिक प्रलोभने देखील दाखवली यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 25 … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आमदार लंकेचे कौतुक

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. यातच जिल्ह्यातील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी आवाहन केले होते. याला सकरात्मक प्रतिसाद देखील मिळालेला पाहायला मिळाला.पारनेर मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करताना २२२ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध करण्यात आ.निलेश लंके यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री … Read more