प्लास्टिक उत्पादनावर निर्बंधासाठी अधिवेशनात प्रश्न मांडणार : आमदार जगताप

नगर : शासनाच्या धोरणानुसार प्लास्टिक बंदी कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर संबंधितांवर कारवाई होत आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने ५० मायक्रॉनच्या प्लास्टिकच्या वस्तू असूनही त्यांच्यावर कारवाई होत आहे. त्यामुळे आपण संबंधित पथकाला खातरजमा करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, तसेच दंडात्मक रकमेबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले … Read more

विकास कामात राजकारण न करता निधी आणणार : आ. जगताप

नगर : नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील विकास कामाचे नियोजन करावे. विकास कामात पक्षीय राजकारण आणणार नाही, सर्व भागाचा समतोल विकास साधावा यासाठी नगर शहरात आता मोठा निधी उपलब्ध करून देणार आहे.  उपनगराच्या विकास कामाला चालना मिळाली आहे. आता जुन्या शहरात गावठाण भागात नियोजन करून विकासकामे केली जाणार आहेत. नगर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करणार … Read more

आ. रोहित पवार यांच्याऐवजी आ.संग्राम जगताप यांना मंत्रीपद ?

अहमदनगर :- राज्यात नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्याला किती मंत्रिपदांचा लाभ होणार, याची उत्सुकता जिल्हाभरात आहे.  मंत्रिपदांच्या या शर्यतीत ज्येष्ठ नेते व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा नेते व कर्जत-जामखेडचे नवे आमदार रोहित पवार  तसेच शिवसेनेला पाठिंबा देणारे नेवाशाच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांची नावे आघाडीवर आहेत. … Read more

आमदार संग्राम जगताप मंत्रिपदाचे दावेदार

नगर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने नगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून नगरचे आमदार संग्राम जगताप यांना नक्कीच मंत्रिपद मिळेल, असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केला.   जगताप यांच्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जिल्ह्याचे मंत्रिपद निश्चित आहे. मात्र, ते कोणाला … Read more

हॉटेल सोडून जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना शिवसेना नेत्यांनी पकडले ? आणि नंतर ……

अहमदनगर :- बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडुन जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आपल्या आमदारांच्या सुरक्षीततेसाठी हे तिन्ही पक्ष सावध झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काल दिवसभर धावपळ करुन सायंकाळपर्यंत आमदार गोळा केले आहेत सध्या या आमदारांवर छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांचे विशेष लक्ष आहे. आता शिवसेनेचे आमदार मुंबईत हॉटेल ललितमध्ये आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे … Read more

नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल – आ.संग्राम जगताप

नगर: महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना रस्त्याने फिरणेही अवघड झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल. अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा येत्या मंगळवारी (२६ नोव्हेंबर) नागरिकांसह आंदोलन करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. शहरातील नागरी प्रश्नांबाबत आमदार जगताप यांनी … Read more

अहमदनगर मध्येही महाशिवआघाडी : आ. संग्राम जगताप व माजी आ.अनिल राठोड येणार एकत्र ?

अहमदनगर :- राज्य स्तरावर महाआघाडी समीकरण यशस्वी होत असून यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे नेते एकत्र काम करताना दिसणार आहेत. यामुळे नगर शहराच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप व माजी आ. राठोड यांच्या समन्वय करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यात यश येईल, असा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी रविवारी केला आहे. राज्यातील बदलत्या … Read more

…तर आ.शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात,रोहीत पवार,संग्राम जगताप होणार मंत्री !

अहमदनगर :- मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.  राज्यात शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे महाशिवआघाडी … Read more

जे प्रेम दिले त्याबद्दल मी ऋणी राहील : आ. जगताप

नगर – कुंदनलाल गुरुद्वारा या ठिकाणी भाविकांनी जे प्रेम दिले त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील, तसेच या ठिकाणाच्या कामासाठी भविष्यात भरीव मदत उभी करून देऊन सदरच्या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकणासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली. आमदार जगताप हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी येथील कुंदनलाल गुरुद्वारा या ठिकाणी भेट … Read more

नगरच्या तरुणांना इस्त्रोची संधी उपलब्ध करणार – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- विविध संशोधनांमुळे तंत्रज्ञानात मोठे बदल घडत आहेत. विज्ञानातील विविध पैलूंची सखोल माहिती तरुण पिढीला होणे आवश्यक आहे. तरुणांना वैज्ञानिक क्षेत्रात गरुडभरारी घेता यावी, यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्र आयोजित करणार असून नगरमधून जास्तीत जास्त तरुण इस्त्रोमध्ये कसे जाऊ शकतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. सावेडीतील प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रात … Read more

नगरकरांचा विश्वास उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारा ठरेल : जगताप

नगर –  मोठ्या मताधिक्याने माझी आमदारपदी पुन्हा एकदा निवड करून, आपण माझ्या विकासकामरुपी प्रयत्नांच्या प्रकाशाला साथ दिली आहे.  मतदानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास, नगर शहराच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.  स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र देऊन आमदार जगताप यांचा सत्कार … Read more

शहर विकासासाठी सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे : आ. जगताप

अहमदनगर :- हे शहर माझे आणि आणि मी या शहराचा एक घटक आहे,असे मानले तरच आपण शहरचा चेहरा मोहरा बदलू शकतो. शहराचा विकास साधायचा असेल तर सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने नुकतीच महनगरपालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहराच्या विकासासाठी … Read more

अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करू : आ. जगताप

अहमदनगर : नगर – मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, जर कामास विलंब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास बांधकाम विभागाला दोषी धरून अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. नगर शहराच्या हद्दीतून … Read more

नगर शहराला महानगर बनवणार : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर :- नगर शहर विकासाच्या संकल्पनेतून नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान केले. माझ्यावर आता शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. नागरिकांना बरोबर घेऊन मी शहर विकासाला चालना देणार आहे. उपनगरांच्या विकासाबरोबरच मध्यवर्ती शहराचे प्रश्न सोडवणार आहे.  विकासकामांबरोबर रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुकुंदनगरच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे … Read more

नगर विकासाचे नवे धोरण राबविणार – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- प्रामाणिक पणे कार्य केले तर जनतेची साथ भेटतेच, नगरचा सर्वागीण विकास हेच स्वप्न बाळगून या पुढे कार्य करणार असून जितोच्या ट्रेड फेअरने नगरच्या उद्योजकांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून राज्यात नावलोकिक प्राप्त केले. प्रथमच अतिशय भव्य असा ट्रेडफेअर उत्तम नियोजनामुळे यशस्वी झाला असून जितो संघटनेच्या सहकार्याने नगर विकासाचे नवे धोरण राबविणार असल्याचे मत नवनिर्वाचित … Read more

निकालानंतर आ.संग्राम जगताप यांनी घेतली गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची. केडगाव हत्याकांडात … Read more