करंजी घाटातील धोकादायक वळणावर ट्रक उलटला

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कारंजी घाटातील धोकादायक वळणावर एक ट्रक उलटल्याची घटना आज घडली आहे. दरम्यान सुदैवाने या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली आहे. मात्र या अपघातात ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईहून नागपूरकडे सुमारे वीस टन कापसाच्या गाठी घेऊन जात असलेला ट्रक … Read more

शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळेल’

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळेल, असा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी डाळिंब उत्पादकांना दिला आहे. मंत्री तनपुरे यांची तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुभाष गवळी, सरपंच अमोल वाघ, राजू शेख, अरुण वाबळे, मधुकर म्हस्के, बापू देशमुख व काही शेतकऱ्यांनी भेट घेऊन मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक डाळिंब … Read more

फुटणाऱ्या जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राष्ट्रीय महामार्गाचे काम व पालिकेच्या कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्यांमुळे पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. शहरात सध्या ठिकठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. सुमारे बावीस वर्षांपूर्वी शहरात जायकवाडी पाणी योजना कार्यान्वित झाली.त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात … Read more

फळबागधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्री तनपुरेंनी दिले मदत मिळवून देण्याचे आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या डाळिंब फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना फळपीक विम्याची रक्कम संबंधित विमा कंपन्यांकडून मिळवून देण्याचे आश्‍वासन राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे. राज्यमंत्री तनपुरे यानू नुकताच पाथर्डी तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी … Read more

लवकरच सर्वकाही सुरळीत सुरू होईल – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी लवकरच सर्वकाही सुरळीत सुरू होईल. परंतु कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वत: बरोबर आपल्या कुटुंबाची देखील कुठल्या प्रकारची गर्दी न करता काळजी घ्यावी. असे आवाहन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथे मंत्री … Read more

आ. विखे पाटील झाले आक्रमक म्हणाले सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अथक प्रयत्नानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. उच्च न्यायालयात ते मान्य करण्यात आले. पण सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नाचे सादरीकरण प्रभावीपणे करण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले. स्वतःचे अपयश झाकण्याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकारकडून लोकांची दिशाभूल सुरू … Read more

वडगांवमध्ये कटेंनमेंट झोन असतांना रेशनिंग दुकानासमोर नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायत कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केलेलं आहे. मात्र असं असतांना सुद्धा रेशन धान्य दुकानासमोर नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वडगांवमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संख्येमुळे तहसील प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व … Read more

कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा रस्ता बंद !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोना झालेल्या अपंग व्यक्तीच्या कुटुंबीयांचा वहिवाटीचा रस्ता बंद करण्याचा धक्कादायक प्रकार रूपेवाडी (ता. पाथर्डी) येथे घडला आहे. पोपट केरु शेळके या दिव्यांग व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयात वहिवाटीचा बंद करण्यात आलेला रस्ता खुला करुन देण्यासाठी निवेदन दिले आहे. अन्यथा पाथर्डी तहसील कार्यालया समोर सोमवार दि. 7 जून पासून उपोषण करण्याचा … Read more

पाथर्डीत दोन गटात सशस्त्र दंगल! सर्वत्र दगडांचा खच ; आठ मोटरसायकल फोडल्या

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून प्रत्येकजण त्यासोबत लढा देत आहे. तर दुसरीकडे काहीजण विनाकारण गोंधळ घालत आहेत. असाच प्रकार पाथर्डी शहरातील अजंठा चौकात घडला. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या शिरसाठवाडी येथील युवक विरुद्ध भिकनवाडा येथील युवकांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत आठजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन गटात तलवारीने तुंबळ हाणामारी,आठ गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-पाथर्डी शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन गटात तलवारीने आपसातील तुंबळ हाणामारीत शिरसाठवाडी व भिकनवाडा अश्या दोन्ही गटातील ८ जन गंभीर जखमी झाले असून परस्पर विरोधी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. दोन गटात झालेल्या टोळी युद्धात मोठ्या प्रमाणावर गाड्या … Read more

लॉकडाऊन न हटवल्यास मानसिक रुग्ण वाढतील !

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- पाथर्डी शहरासह तालुक्यात व्यवसायाच्या सर्वच क्षेत्रात लॉकडाऊनसह विविध अडचणींमुळे मंदीची लाट तीव्र झाली आहे. जमीन भूखंड घराच्या किमती खाली येत आहे. दुसऱ्या बाजूने गरजू ग्राहक काळ्याबाजारातील दलालांमुळे अधिक पिळला केला जात आहे. लॉकडाऊन न हटवल्यास सर्वसामान्य, गोरगरीबांसह छोट्या व्यापाऱ्यांमध्ये मानसिक आजाराचे रुग्ण येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे, ही … Read more

गुड न्यूज : अहमदनगर जिल्ह्यातील या गावात कोरोना रुग्णांचा आकडा शुन्यावर !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील कोरोना रुग्णांचा आकडा शुन्यावर पोहोचला असून, ग्रामपंचायतीद्वारे केलेल्या उपाययोजनांमुळे भोसे गाव कोरोनामुक्त झालेआहे. अशी माहिती गावचे सरपंच विलास टेमकर, उपसरपंच संदीप साळवे, युवानेते अशोक टेमकर यांनी दिली आहे. कोरोना काळात भोसे ग्रामपंचायततर्फे सरपंच विलास टेमकर यांनी गावामध्ये सॅनिटाझर फवारणी त्याचबरोबर कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना … Read more

‘त्या’ ४०० कलाकारांना धूत चॅरिटेबल ट्रस्टची मदत

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- दुसऱ्यांदा झालेल्या लॉकडाऊनमुळे कलेचे उपासक सर्व कलाकार अडचणीत आहेत. यासाठी सेठ माधवलाल धूत व रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टच्यावतीने सामाजिक दायित्व जपत प्रसिद्ध कलाकार पवन नाईक यांच्या प्रयत्नातून अन्नपूर्णा योजने अंतर्गत आर्थिक अडचणीतील सुमारे चारशे कलाकारांना किराणा कीट देवून छोटीशी मदत केली आहे. अशी माहिती संस्थेच्या जेष्ठ … Read more

शेवगाव – पाथर्डी तालुक्यासाठी ‘एवढे’ रेमडिसीवीर इंजेक्शन मिळाले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरसाठी 24 तर पाथर्डी तालुक्यातील कोविड सेंटरसाठी 23 असे 47 रेमडिसीवीर इंजेक्शन रविवार दि. 23 मे रोजीसाठी मिळाले आहेत. रेमडिसीवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत या इंजेक्शनचे वाटप करण्यात येते आहे. जिल्ह्यासाठी आलेल्या रेमडिसीवीर इंजेक्शनचे वाटप ऑक्सिजन किंवा आयसीयू बेड संख्यानुसार समप्रमाणात करण्यात येते. त्याप्रमाणे कोविड-19 … Read more

कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरलाच लावला चुना!

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोवीड सेंटरमध्ये साफसफाई करणाऱ्या दोन कामगारांनी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पाकीट चोरून३०हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. यातील रोख रकमेसह एटीएम, आधारकार्ड, ओळखपत्र असे साहित्य चोरुन नेले आहे. याप्रकरणी त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. मात्र संबंधित दोघेजण पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील … Read more

महागाईच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने; तहसिलसमोर घोषणाबाजी

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- देशात कोरोना संकटामुळे मोठी आर्थिक तूट निर्माण झाली आहे. या संकटाच्या काळात नागरिकांचा रोजगार गेला आहे, मात्र दुसरीकडे केंद्र सरकार नागरिकांना महागाईचा चटका देत आहे. यामुळे नागरिकांमधील रोष देखील वाढतो आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्राच्या निषेधार्थ निदर्शने केली. दरम्यान या वाढलेल्या महागाईला केंद्र सरकार जबादार असून त्याचा पाथर्डी … Read more

कोरोना रुग्ण व नातेवाईकांसाठी मोफत जेवण !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- करोनोबाधित व त्यांच्या नातेवाईकांना ऐनवेळी कोविड सेंटर परिसरात जेवण मिळण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. जवळचेही मदतीला येत नाहीत. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कुठेच जेवणाची व्यवस्था होत नाही. त्यामुळे माणुसकी संपली की काय? असा प्रश्न निर्माण होतो. याचा विचार करून नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील यशराज हॉटेलचे मालक राहुल जावळे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आदर्शगावात एकाचा खून, दोघांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील सुदाम विक्रम गिते (वय ३७) याने दारू पिण्यासाठी … Read more