सरपंचपदाचे आरक्षण निघाले मात्र त्या प्रवर्गातील उमेदवारच नाही!!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव येथील सरपंचपद अनुसुचीत जातीच्या महीलेसाठी आरक्षीत झाले आहे. मात्र येथे अनुसुचीत जातीची महीला उमेदवार नसल्याने हे आरक्षण इतरजातीचया महीलेसाठी आरक्षीत करुन मिळावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर व ग्रामपंचायत सदस्य सचिन कोलते यांनी तहसिलदार शाम वाडकर यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचे … Read more

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. पुन्हा एकदा कारखाना सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे व आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर विश्वास टाकला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये साहेबराव गोपीनाथ सातपुते, यशवंतराव गवळी, बाळासाहेब गोल्हार, शेषराव ढाकणे, काकासाहेब … Read more

पोपटराव पवार म्हणतात तुम्हीही पद्मश्री होऊ शकता ! पण त्यासाठी …

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- देशासह राज्याच्या राजकारणात आता तरुण पिढी उतरली असून, सरपंच पदाच्या माध्यमातून गावात चांगली विकासाभिमुख कामे केल्यास सरपंचालादेखील पद्मश्री पुरस्काराचे मानकरी होऊ शकतात, त्या दृष्टीने प्रत्येक सरपंचाने यापुढील काळात काम करण्याची गरज आहे. गावात एकमेकांची जिरवाजिरवी करणे अथवा गावातील विकासकामे हाणून पाडण्यासाठी राजकारण करू नये, असे आवाहन आदर्शगाव हिवरे … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात बर्ड फ्लूचे संकट घोंगावतय

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-सध्या राज्यात करोनाबरोबरच बर्ड फ्लूने डोके वर काढले असून नगर जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आला असल्याची माहिती समोर येत आहे. पाथर्डी तालुक्यानंतर राहुरी मध्ये बर्ड फ्लूने एंट्री केली होती यामुळे अनेक कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या. आता जिल्ह्यातील आणखी एका तालुक्यात बर्ड फ्लू ने प्रवेश केला आहे. संगमनेर … Read more

जोरदार शक्तीप्रदर्शन करत ‘या’ आमदारांचा जिल्हा बँकेसाठी अर्ज

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-जिल्हा सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखलची प्रक्रीया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखलकरण्याअगोदर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात मतदारांशी संवाद साधला. यावेळी तालुक्यातील ७९ मतदारांपैकी ७१ मतदार उपस्थित होते. त्यानंतर … Read more

शेतकऱ्यांचा महावितरणच्या वसुली मोहिमेस विरोध

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- थकित वीजबिले वसुलीसाठी महावितरणने आक्रमक भूमिका घेतली आहे. महावितरण कंपनीने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. प्रत्येक शेतीपंपधारकाने पाच हजार रुपये भरावेत व वीजरोहित्रावरील सर्व शेतकरी ग्राहकांनी पैसे भरले तरच रोहित्राचा वीजपुरवठा सुरू करू, असा निर्णय वीजवितरण कंपनीने घेतला आहे. यामुळे पाथर्डी तालुक्यातील शेतकरी महावितरणच्या कारभारावर नाराज झाले आहे. … Read more

खून प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पाथर्डी येथील आयुब उस्मान सय्यद यांच्या खून प्रकरणी आरोपी समद सालार सय्यद (वय 23 रा. पाथर्डी) याला जन्मठेपची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पाथर्डी शहरातील आयुब सय्यद व त्यांचा भाचा गफूर उस्मान सय्यद यांच्यात जानपिरबाबा दर्गा येथील पुजा करण्याच्या कारणावरून जुने वाद होते. यावरून गफूर … Read more

महाआघाडी सरकारने शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय जनतेला भावले म्हणून महाआघाडीला कौल !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असून, ३६ गावांत महाआघाडीला यश मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी केला आहे. बिनविरोध पार पडलेल्या खेर्डे व सोमठाणे खुर्द ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचे पत्रक ढाकणे यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी … Read more

विकासकामांसाठी खा. विखेंच्या निधीतून ८६ लाख मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पाथर्डी शहरातील फुलेनगर भागातील पेव्हिंग ब्लॉक, माणिकदौंडी चौक ते भगवाननगर रस्ता काँक्रिटीकरण, भगवाननगर येथील पगारेवस्तीवरील पुलाच्या कामासाठी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या निधीतून ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिली. शहरातील विकास कामांची माहिती देताना पत्रकार परिषदेत आव्हाड म्हणाले, शहरातील फुलेनगर भागातील … Read more

निवडणूक रणांगण ! जिल्ह्यातील ‘या’ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-  जिल्ह्यात 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर आज 18 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. जिल्ह्यात अनेक दिग्गजांनी आपली जादू दाखवत ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केले. दरम्यान जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायतीत एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागांवर … Read more

निवडणूक रणांगण ! गिते यांच्या गटाने सत्ता कायम राखली

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होता आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहे. नुकतेच पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. 9 पैकी पाच जागांवर गिते यांच्या गटाने विजय मिळवला आहे. लोहसर ग्रामपंचायतीत अनिल गिते यांना … Read more

धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून, या षड्यंत्राविरोधात त्यांचे सर्व समर्थक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगत मंत्री मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कदापिही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी व्यक्त केली आहे. मंत्री धनंजय … Read more

‘त्या’ ५० कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यात सहा दिवसापूर्वी भानगाव येथे आढळून आलेल्या मृत कावळ्याचा अहवाल शनिवारी प्रशासनाला प्राप्त झाला असून, भानगावचा बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगरमध्ये बर्ड फ्लू दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथील मृत ५० कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पशुसंवर्धन विभागाने बर्ड … Read more

जिल्ह्यातील त्या मृत पक्षांचा अहवाल प्राप्त; धोका वाढला

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- देशासह जिल्हयात देखील बर्ड फ्ल्यू चे संकट आले असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे अनके कोंबड्या मृत पावल्या होत्या, यामुळे नगरकरांची धाकधूक वाढली होती. मात्र मिडसांगवी येथे मृत आढळलेल्या कोंबड्याचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, श्रीगोंदा शहर आणि … Read more

वीजपुरवठा खंडित झाल्याने बळीराजा सापडला संकटात

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-गेल्या दहा दिवसांपासून कृषिपंपाच्या विद्युत रोहित्राची मुख्य केबल जळाल्याने पाथर्डी शहरातील चांदगाव रोड येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जळालेली मुख्य केबल तातडीने बदलून मिळावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली विद्युत विभागाचे शहर अभियंता मयूर जाधव यांना देण्यात आले. विशेष म्हणजे मागील महिन्यामध्ये येथील विद्युत … Read more

आता तर यांनी हद्दच केली! या उमेदवाराने दिले चक्क पाऊस पाडण्याचे आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-निवडणुका म्हटलं की सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यातून रस्ते, वीज, पाणी, शासकीय योजना राबवण्याच्या यासंदर्भात मतदारांना विविध प्रकारचे आश्वासने देतात. परंतु पाथर्डी तालुक्यातील शिरापूर करडवाडी या ग्रुप ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जय भोलेनाथ ग्राम विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरनाम्याद्वारे पाच वर्षाच्या कार्यकाळात जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला, तर होम … Read more

शेवटच्या दिवशी १२० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १९ जागेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. दरम्यान या सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी १७८ अर्जांची विक्री झाली. विद्यमान संचालक मंडळासह तब्बल १२० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच ओळखीच्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे दुष्कर्म केल्याचे अनेक प्रकार घडले आहे. नुकतेच पाथर्डी तालुक्यात महिला अत्याचाराची घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात एका महिलेस हरबऱ्याच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. तसेच सदर नराधमाने घडलेला प्रकार … Read more